जेव्हा उजवे-ते डावे मजकूरासह दस्तावेज,स्प्रेडशीट किंवा सादरीकरण आपण उघडता किंवा आपण उजवे-ते-डावे भाषेतील मजकूर जोडता, तेव्हा उजवी-ते-डावी नियंत्रणे आपोआप सुरू होतात. आपण उजवी-ते -डावी नियंत्रणे हाताने(मॅन्युअली) सुध्दा सुरू करू शकता.
उजवी-ते- डावी नियंत्रणे सुरू करा.
आपण लिहू शकाल त्या आधी , व्ह्यू आणि उजवे-ते-डावे संपादन करण्यासाठी ,ते आपण आपल्या कॉंप्युटरवर ऑन करणे आवश्यक आहे.
उजवी-ते-डावी भाषा नियंत्रणे वापरा.
आपण उजवी-ते-डावी नियंत्रणे चालू करता, तेव्हा आपण उजवे-ते -डावे मजकूर असणार्या दस्तावेजांचा लेआऊट बदलू शकता. दस्तावेजात उजवा-ते-डावा भाषा मजकूर नसेल ,तर आपण ही नियंत्रणे पाहू शकणार नाही.
परिच्छेदाची दिशा बदला
- आपल्या ॲंड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटवरGoogle Docs app उघडा .
- उजवा-ते-डावा मजकूर भाषेतील मजकूर असणारा एक दस्तावेज उघडा.
- वर टॅप करा.
- फॉर्मॅट परिच्छेदावर्टॅप करा.
- परिच्छेदाची दिशा बदलण्यासाठी,परिच्छेद दिशेवरटॅप करा.
टीप:त्यांच्या फोनची भाषा सेटिंग उजवी-ते-डावी असणार्या वापरकर्त्यांसाठी ,उजवी-ते-डावी नियंत्रणे देखील आपोआप चालू होतील.
Google Sheets
ठराविक पत्रकासाठी स्तंभांची दिशा बदला
- आपल्या ॲंड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटवर Google Sheets उघडा .
- उजवा-ते-डावा मजकूर भाषेतील मजकूर असणारा एक दस्तावेज उघडा.
- खालच्या बाजूस Sheetटॅब वर ,डाऊन ॲरोवर टॅप करा.
- स्प्रेडशीट GRid ची दिशा बदाल्ण्यासाठी उजवे-ते-डावे वर टॅप करा.
टीप: हा बदल केवळ सध्याच्या शीटलाच लागू असेल , स्प्रेडशीटमधील सर्व शीट्सना नाही.
परिच्छेदाची दिशा बदला
- आपल्या ॲंड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटवर Google Slides ॲप उघडा .
- उजवा-ते-डावा मजकूर भाषेतील मजकूर असणारे एक सादरीकरण उघडा.
- तुम्हाला बदलायच्या असलेल्या मजकूराला निवडा.
- फॉर्मॅट परिच्छेदावरटॅप करा.
- परिच्छेदाची दिशा बदलण्यासाठी,परिच्छेद दिशेवरटॅप करा.
टीप:त्यांच्या फोनची भाषा सेटिंग उजवी-ते-डावी असणार्या वापरकर्त्यांसाठी ,उजवी-ते-डावी नियंत्रणे देखील आपोआप चालू होतील.