टिप्पण्या, अ‍ॅक्शन आयटम आणि इमोजी प्रतिक्रिया वापरणे


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

पुढील गोष्टी करण्यासाठी तुम्ही Google Docs, Sheets आणि Slides वर इतरांसोबत सहयोग करू शकता:
  • टिप्पण्या जोडणे, संपादित करणे, त्यांना उत्तर देणे, त्या फिल्टर करणे किंवा हटवणे
  • टास्क आणि अ‍ॅक्शन आयटम असाइन करणे
  • इमोजी प्रतिक्रिया जोडणे

टिप्पणीचे पर्याय

सर्व टिप्पण्या पहा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर Google Docs, Sheets किंवा Slides ॲपमध्ये फाइल उघडा.
  2. सर्वात वरती, टिप्पणी टिप्पणी करा वर टॅप करा.
  3. चर्चा थ्रेडध्ये हलवण्यासाठी डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा.
टिप्पण्या जोडा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर Google Docs, Sheets, किंवा Slides ॲपमध्ये फाइल उघडा.
  2. सेल किंवा मजकूर निवडा.
  3. आणखी अधिक वर टॅप कराआणि त्यानंतर टिप्पणी जोडा.
  4. तुमचा मजकूर जोडा.
  5. पाठवा पाठवा वर टॅप करा.
टिप्पण्यांवर प्रतिसाद द्या

एक विशिष्ट टिप्पणी टॅप केल्यानंतर तुम्ही पुढील गोष्टी करू शकाल:

  • टिप्पणी संपादित करा: आणखीअधिक वर टॅप कराआणि त्यानंतर संपादित करा संपादित करा. तुम्हाला हवे असलेले बदल करा नंतर सेव्ह करावर टॅप करा.
  • टिप्पणीला उत्तर द्या: तळाशी, उत्तर जोडा वर टॅप करा.
  • टिप्पणीचे निराकरण करा: टिप्पणीच्या वरती निराकरण करा वर टॅप करा.
  • टिप्पण्यांच्या दरम्यान हलवा: डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा.
  • टिप्पणी हटवा: अधिक अधिक आणि त्यानंतर हटवा वर टॅप करा.
  • संपादन व्ह्यूवर परत जा: बंद करा बंद करा वर टॅप करा.
एका विशिष्ट व्यक्तीला टिप्पणी पाठवा

एखाद्या व्यक्तीने टिप्पणी पाहावी याची खात्री करण्यासाठी तुम्ही त्यावर त्यांना टॅग करू शकता. त्यांना तुमच्या टिप्पणीसोबत इमेल सूचना मिळेल.

  1. आपल्या ॲंड्रॉइड फोन किंवा टॅबलेट वर Google Docs, Sheets, किंवा Slides ॲप मध्ये फाइल उघडा.
  2. टिप्पणी घाला आणि टाइप करा.
  3. तुमच्या टिप्पणीच्या डावीकडे, @ वर टॅप करा, नंतर तुम्हाला ही टिप्पणी ज्या व्यक्तीने पाहायला हवी आहे त्या व्यक्तीचे नाव किंवा ईमेल ॲड्रेस एंटर करा. योग्य व्यक्ती सुचवली जाते तेव्हा त्यांच्या नावावर टॅप करा.
  4. पाठवा पाठवा वर टॅप करा.
सुचवलेले संपादन स्वीकारा किंवा नाकारा

तुमच्या मालकीच्या दस्तऐवजामध्ये एखाद्या व्यक्तीने संपादन सुचवल्यास, तुम्ही ते स्वीकारू किंवा नाकारू शकता. हे फक्त Google Docs मध्ये उपलब्ध आहे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Docsॲपमध्ये दस्तऐवज उघडा.
  2. सूचना पाहाण्यासाठी, सूचना वर टॅप करा.
  3. स्वीकारा किंवा नाकारा वर टॅप करा.

टीप: तुम्ही स्वीकारलेली सूचना नंतर तुम्हाला आवडली नाही तर पहिल्यासारखे करा वर टॅप करा.

Microsoft® Office फाइलमध्ये टिप्पण्या जोडा

Google Docs ॲपमधील Microsoft Office फाइलवर टिप्पण्या जोडण्यासाठी, ती फाइल एका Google Docs फाइल मध्ये बदला.

क्रिया आयटम वापरा आणि फॉलो अप करा

तुमच्या ऑफिस किंवा शाळा खात्यामध्ये कामे किंवा क्रिया आयटम असाइन करण्यासाठी टिप्पण्या वापरा.

टिप्पणीमध्ये एक क्रिया आयटम असाइन करा
  1. आपल्या ॲंड्रॉइड फोन किंवा टॅबलेट वर Google Docs, Sheets, किंवा Slides ॲप मध्ये फाइल उघडा.
  2. तुम्हाला ज्यामध्ये टिप्पणी करायची आहे तो मजकूर, सेल किंवा स्लाइड हायलाइट करा.
  3. टिप्पणी जोडण्यासाठी आणखी वर टॅप करा अधिक आणि त्यानंतर टिप्पणी जोडा.
  4. तुमची टिप्पणी टाइप करा.
  5. तुमच्या टिप्पणीच्या डावीकडे @ वर टॅप करा आणि त्या व्यक्तीचे नाव किंवा ईमेल ॲड्रेस एंटर करा.
  6. "[नाव] यांना असाइन करा" च्या बाजूच्या बॉक्सवर टॅप करा आणि त्यानंतर असाइन करा.

टीप: तुम्ही ज्या व्यक्तीला क्रिया आयटम असाइन केला आहे तिला ईमेल सूचना मिळेल.

क्रिया आयटम पुन्हा असाइन करा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर Google Docs, Sheets, किंवा Slides ॲपमध्ये फाइल उघडा.
  2. टिप्पणीसह मजकूर आणि त्यानंतर वर टॅप करा टिप्पणी पाहा आणि त्यानंतर उत्तर जोडा.
  3. तुमची टिप्पणी टाइप करा.
  4. तुमच्या टिप्पणीच्या डावीकडे @ वर टॅप करा आणि त्या व्यक्तीचे नाव किंवा ईमेल ॲड्रेस एंटर करा.
  5. "[नाव] यांना पुन्हा असाइन करा" च्या बाजूच्या बॉक्सवर टॅप कराआणि त्यानंतर पाठवा पाठवा.

टीप: तुम्ही ज्या व्यक्तीला क्रिया आयटम असाइन केला आहे तिला ईमेल सूचना मिळेल.

क्रिया आयटमवर पूर्ण झाला अशी खूण करा
  1. आपल्या ॲंड्रॉइड फोन किंवा टॅबलेट वर Google Docs, Sheets, किंवा Slides ॲप मध्ये फाइल उघडा.
  2. टिप्पणीच्या वर उजव्या कोपऱ्यामध्ये, पूर्ण झाले अशी खूण करा वर टॅप करा.
दस्तऐवजावरील फॉलो अप पाहा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Docs, Sheets किंवा Slides ॲप उघडा.
  2. वरती उजवीकडे, नंबरवर टॅप करा.
    • तुम्हाला एखादी संख्या दिसत नसल्यास, तुमच्याकडे त्या दस्तऐवजाशी संबंधित कोणतेही फॉलो अप नाहीत.
  3. तुम्ही फॉलो अप घ्यायच्या असलेल्या पुढील गोष्टींची संख्या पाहू शकता:
    • क्रिया आयटम
    • सूचना
  4. पहिल्या क्रिया आयटमवर किंवा सूचनेवर जाण्यासाठी सूचीमधील एका पर्यायावर टॅप करा.
  5. मेनू बंद करण्यासाठी संख्येवर टॅप करा.

Google Docs मध्ये इमोजी प्रतिक्रिया वापरा

तुमच्याकडे Google दस्तऐवज मध्ये टिप्पणी करण्याचा किंवा संपादनाचा अ‍ॅक्सेस असल्यास, तुम्ही हायलाइट केलेल्या आशयामध्ये इमोजी प्रतिक्रिया जोडू शकता.

इमोजी प्रतिक्रिया जोडणे
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Docs अ‍ॅप मध्ये फाइल उघडा.
  2. तुम्हाला ज्या मजकुरावर प्रतिक्रिया द्यायची आहे तो निवडा. 
  3. आणखी आणखी आणि त्यानंतर इमोजी प्रतिक्रिया जोडा वर टॅप करा.
  4. तुम्हाला कोणता इमोजी जोडायचा आहे तो निवडा.

टीप: Android फोन किंवा टॅबलेटवर, इमोजी प्रतिक्रिया या इतर टिप्पण्यांसह दिसतात. तुम्ही त्याच मजकुरामध्ये एकाहून अधिक इमोजीदेखील जोडू शकता.

इमोजी प्रतिक्रिया संग्रहित करणे
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Docs अ‍ॅप मध्ये फाइल उघडा.
  2. टिप्पणीच्या वर उजव्या कोपऱ्यामध्ये, पूर्ण झाले अशी खूण करा वर टॅप करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12689347720400044130
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false