टिप्पण्या, अ‍ॅक्शन आयटम आणि इमोजी प्रतिक्रिया वापरणे


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

पुढील गोष्टी करण्यासाठी तुम्ही Google Docs, Sheets आणि Slides वर इतरांसोबत सहयोग करू शकता:
  • टिप्पण्या जोडणे, संपादित करणे, त्यांना उत्तर देणे, त्या फिल्टर करणे किंवा हटवणे
  • टास्क आणि अ‍ॅक्शन आयटम असाइन करणे
  • इमोजी प्रतिक्रिया जोडणे

टिप्पण्या जोडा, संपादित करा, पहा, फिल्टर करा किंवा हटवा

टिप्पणी जोडा
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  2. आपल्याला ज्यात टिप्पणी करायची आहे ते मजकूर सेल्स किंवा स्लाईड्स हायलाइट करा.
  3. टूलबारमध्ये एक टिप्पणी जोडण्यासाठी टिप्पणी जोडाटिप्पणी जोडावर क्लिक करा.
  4. आपली टिप्पणी टाईप करा.
  5. टिप्पणी द्या वर क्लिक करा.
टिप्पण्या दाखवणे, लपवणे किंवा लहान करणे
  1. तुमच्या काँप्युटरवर, दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  2. टिप्पण्यांचे पॅनल उघडण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी, सर्वात वरती उजवीकडे, सर्व टिप्पणी दाखवा टिप्पण्या उघडा वर क्लिक करा.
  3. तुमच्या दस्तऐवजाच्या बाजूला असलेल्या टिप्पण्या लपवण्यासाठी, लहान करण्यासाठी किंवा त्यांचा विस्तार करण्यासाठी, पहा आणि त्यानंतर टिप्पण्या वर क्लिक करा.
    • टिप्पण्या लपवा: यामुळे सर्व टिप्पण्या लपवल्या जातात आणि उघडे असलेले कोणतेही टिप्पण्या पॅनल बंद केले जाते.
    • टिप्पण्या लहान करा: यामुळे Docs आणि Sheets मधील टिप्पण्या कमी करून आयकन म्हणून दाखवल्या जातात, ज्यांवर तुम्ही पूर्वावलोकन करण्यासाठी कर्सर फिरवू शकता आणि आणखी पाहण्यासाठी क्लिक करू शकता.
    • टिप्पण्यांचा विस्तार करा: यामुळे संपूर्ण टिप्पण्या आणि उत्तरे दाखवली जातात, ज्यांवर तुम्ही उत्तरे देण्यासाठी किंवा इतरांना जोडण्यासाठी क्लिक करू शकता.
टिप्पण्या शोधणे
  1. तुमच्या काँप्युटरवर, दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडा.

  2. सर्वात वरती उजवीकडे, सर्व टिप्पण्या दाखवा टिप्पण्या उघडा वर क्लिक करा.
  3. टिप्पणीचे स्थान पाहण्यासाठी तिच्यावर क्लिक करा.

तुम्ही कीवर्ड किंवा वापरकर्ता नाव वापरून टिप्पणी शोधूदेखील शकता:

  1. तुमच्या काँप्युटरवर, दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडा.

  2. सर्वात वरती उजवीकडे, सर्व टिप्पण्या दाखवा टिप्पण्या उघडा वर क्लिक करा.
  3. टिप्पण्या पॅनलच्या उजवीकडे, सर्व टिप्पण्या शोधा Filter comments by keyword वर क्लिक करा.
  4. टिप्पणी किंवा व्यक्ती शोधण्यासाठी कीवर्ड एंटर करा.

Google Sheets मध्ये टिप्पणीचे स्थान शोधणे

Google Sheets मध्ये, तुम्ही अ‍ॅक्टिव्ह शीटवरील टिप्पणीची स्थाने शोधू शकता.

  1. अ‍ॅक्टिव्ह शीटच्या तळाशी, टॅबवरील टिप्पणी सूचना वर पॉइंट करा.
  2. दिसणाऱ्या टूलबारमध्ये, हायलाइट केलेले सेल आणि टिप्पणीवर जाण्यासाठी सेलच्या स्थानावर क्लिक करा.
टिप्पण्या फिल्टर करणे

तुम्ही Google Docs, Slides आणि Sheets मध्ये टिप्पण्या फिल्टर करू शकता.

  1. दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशनमध्ये, सर्व टिप्पण्या दाखवा टिप्पण्या उघडा वर क्लिक करा.
  2. सर्व टिप्पण्या किंवा तुमच्यासाठीच्या टिप्पण्या दाखवण्यासाठी, टॅब निवडा.
  3. उघडलेल्या आणि निराकरण केलेल्या टिप्पण्या दाखवण्यासाठी, सर्व प्रकार वर क्लिक करा.
  4. (पर्यायी) Google Sheets मध्ये, तुम्ही शीटनुसार टिप्पण्या फिल्टर करू शकता. फिल्टर सध्याच्या शीटवर बदलण्यासाठी, "टिप्पण्या" विंडोच्या उजवीकडे, सर्व शीट डाउन अ‍ॅरो वर क्लिक करा.
  5. त्या वर्गवारीमधील सर्व टिप्पण्या विंडोमध्ये दिसतील.
टिप्पणी संपादित करणे किंवा हटवणे
  1. तुमच्या काँप्युटरवर, दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  2. आपण संपादित किंवा हटवू इच्छिता त्या टिप्पणीवर अधिक आणखी वर क्लिक करा.
  3. संपादित करा किंवा हटवावर क्लिक करा.
एका विशिष्ट व्यक्तीला टिप्पणी पाठवा

तुमची टिप्पणी एखाद्या व्यक्तीसाठी दृश्यमान करण्याकरिता, तुम्ही त्यांना टिप्पणीमध्ये जोडू शकता. त्यांना तुमच्या टिप्पणीसह ईमेल सूचना मिळेल.

टीप: एखाद्या व्यक्तीने त्यांचे स्टेटस “ऑफिसमध्ये नाही” असे सेट केले असल्यास आणि तुम्हाला त्यांचे कॅलेंडर पाहण्याची परवानगी असल्यास, तुम्ही त्यांना जोडताच तुम्हाला टिप्पणीमध्ये सूचना मिळेल.

  1. तुमच्या काँप्युटरवर, दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  2. टिप्पणी घाला आणि टाइप करा.
  3. तुमच्या टिप्पणीमध्ये कुठेही, "@" आणि त्यांचे नाव किंवा ईमेल ॲड्रेस एंटर करा. योग्य व्यक्ती सुचवली गेल्यावर त्यांच्या नावावर क्लिक करा.
  4. टिप्पणी वर क्लिक करा.

टीप: फाइल पाहण्याची परवानगी नसलेल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही जोडल्यास, तुम्हाला फाइल शेअर करणे हे करण्यास सांगितले जाईल.

टिप्पणीची मर्यादा गाठल्यानंतर आणखी टिप्पण्या जोडणे

तुम्हाला तुमच्या Google दस्तऐवजावर, शीटवर किंवा स्लाइडवर "तुम्ही दस्तऐवजाची टिप्पण्यांसाठीची मर्यादा गाठली आहे. नवीन कॉपीवर टिप्पणी देणे पुढे सुरू ठेवण्यासाठी, कृपया निराकरण केलेल्या टिप्पण्यांशिवाय दस्तऐवजाची एक कॉपी तयार करा" अशी सूचना दिसू शकते.

तुमच्या फाइलमध्ये आणखी टिप्पण्या जोडण्यासाठी:

  1. ॲक्टिव्ह नसलेल्या टिप्पण्यांचे निराकरण करा.
  2. फाइल आणि त्यानंतर तुमच्या दस्तऐवजाची, स्प्रेडशीट किंवा डेकची कॉपी तयार करा वर करा.
  3. पॉप-अप विंडोमध्ये, टिप्पण्या आणि सूचना कॉपी करा वर क्लिक करा.
  4. काम करणे पुढे सुरू ठेवण्यासाठी कॉपी वापरा.

टीप: निराकरण केलेल्या टिप्पण्या तुमच्या मूळ दस्तऐवजामध्ये अ‍ॅक्सेस करता येण्यायोग्य राहतील.

टिप्पण्यांना उत्तर देणे किंवा त्या बंद करणे

आपल्याकडे फाइल संपादित करण्याची किंवा टिप्पणी परवानगी असल्यास आपण टिप्पण्यांना उत्तर देऊ शकता. एकदा चर्चा संपली की आपण ती बंद करण्यासाठी एक टिप्पणीचे निराकरण देऊ शकतो.

टीप: तुम्ही थेट तुमच्या ईमेलमधूनदेखील टिप्पण्यांना उत्तर देऊ शकता किंवा त्या बंद करू शकता. Gmail मध्ये टिप्पण्यांसह कसे काम करावे हे जाणून घ्या.

टिप्पणीला उत्तर देणे

दस्तावेज किंवा सादरीकरणातील टिप्पण्यांना उतर द्या

  1. आपल्या कॉंप्युटरवर दस्तावेज किंवा सादरीकरण उघडा.
  2. टिप्पणीवर क्लिक करा.
  3. उत्तर द्यावर क्लिक करा आणि आपले उत्तर टाईप करा.
  4. सेव्ह करण्यासाठी, उत्तर द्या वर क्लिक करा.

टीप: Google Docs मध्ये, टेक्स्ट बॉक्सच्या तळाशी, तुम्ही स्मार्ट उत्तर वर क्लिक करू शकता.

स्प्रेडशीटमधील टिप्पण्यांना उत्तर देणे

  1. आपल्या काँप्युटरवर, स्प्रेडशीट उघडा.
  2. Sheet टॅब वर टिप्पणी जोडा वर क्लिक कराटिप्पणी जोडा.
  3. आपण ज्यास उत्तर देऊ इच्छिता त्या टिप्पणीवर क्लिक करा.
  4. उत्तर द्यावर क्लिक करा आणि आपले उत्तर टाईप करा.
  5. सेव्ह करण्यासाठी, उत्तर द्या वर क्लिक करा.

टीप: एखाद्या व्यक्तीने त्यांचे स्टेटस “ऑफिसमध्ये नाही” असे सेट केले असल्यास आणि तुम्हाला त्यांचे कॅलेंडर पाहण्याची परवानगी असल्यास, तुम्ही त्यांना उत्तर देताना तुम्हाला टिप्पणीमध्ये सूचना मिळेल.

टिप्पणी बंद करणे किंवा पुन्हा उघडणे
  1. तुमच्या काँप्युटरवर, दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  2. आपण बंद करू इच्छिता त्या टिप्पणीवर क्लिक करा
  3. टिप्पण्यांच्या वर उजव्या कोपऱ्यात निराकरणवर क्लिक करा.

आपण बंद केलेली टिप्पणी पाहण्यासाठी, विंडोच्या वरच्या बाजूसटिप्पण्यावर, क्लिक करा. बंद केलेली टिप्पणी पुन्हा उघडण्यासाठी, टिप्पणीच्या सर्वात वरच्या उजव्या कोपऱ्यात पुन्हा उघडा वर क्लिक करा.

क्रिया आयटम वापरणे आणि त्यांचा फॉलो अप घेणे

आपल्या ऑफिस किंवा शाळा खात्यात कामे सुपूर्द करण्यासाठी किंवा क्रिया आयटम्स साठी टिप्पण्या वापरा. आपल्या फाइलमधील आशयाच्या आधारे सुचवलेले क्रिया आयटम्स दिसतील.

एका टिप्पणीत एक क्रिया आयटम सुपूर्द करा
  1. आपल्या कॉम्प्युटरवर एक Google फाइल उघडा.
  2. आपल्याला ज्यात टिप्पणी करायची आहे ते मजकूर सेल्स किंवा स्लाईड्स हायलाइट करा.
  3. एक टिप्पणी जोडण्यासाठी टूलबार वर जा आणि टिप्पणी जोडाटिप्पणी जोडावर क्लिक करा.
  4. आपली टिप्पणी टाईप करा.
  5. आपल्या टिप्पणीत कोठेतरी, ज्या माणसाला आपण सुपुर्द करायचे आहे त्याच्या इमेल पत्त्या पुढे:@ सह किंवा + in लाऊन तो जोडा.
  6. "[नाव]ला सुपूर्द करा" पुढे क्लिक करा.
  7. सुपूर्द करावर क्लिक करा. तुम्ही अ‍ॅक्शन आयटम असाइन केलेल्या व्यक्तीला इमेल मिळेल.

टीप: एखाद्या व्यक्तीने त्यांचे स्टेटस “ऑफिसमध्ये नाही” असे सेट केले असल्यास आणि तुम्हाला त्यांचे कॅलेंडर पाहण्याची परवानगी असल्यास, तुम्ही त्यांना तो असाइन करताच तुम्हाला टिप्पणीमध्ये सूचना मिळेल.

अ‍ॅक्शन आयटम पुन्हा असाइन करणे
  1. आपल्या कॉम्प्युटरवर एक Google फाइल उघडा.
  2. टिप्पणीवर क्लिक करा.
  3. उत्तर द्यावर क्लिक करा.
  4. आपली टिप्पणी टाईप करा.
  5. आपल्या टिप्पणीत कोठेतरी, ज्या माणसाला आपणास पुन्हा सुपुर्द करायचे आहे त्याच्या इमेल पत्त्या पुढे:@ सह किंवा + in लाऊन तो जोडा.
  6. "[नाव]ला पुन्हा सुपूर्द करा" पुडील चौकटीत क्लिक करा.
  7. पुन्हा सुपूर्द करावर क्लिक करा. तुम्ही अ‍ॅक्शन आयटम असाइन केलेल्या व्यक्तीला इमेल मिळेल.
क्रिया आयटम पूर्ण झाला म्हणून मार्क करणे
  1. आपल्या कॉम्प्युटरवर एक Google फाइल उघडा.
  2. टिप्पणीच्या उजव्या कोपऱ्यात केले/डन पूर्ण झालेवर क्लिक करा
एका दस्तावेजावरील पाठपुरावा पहा
  1. आपल्या कॉम्प्युटरवर, Google Docs, Sheets, किंवा Slides होम स्क्रीन Google Drive उघडा.
  2. दस्तावेजाच्या वर उजव्या कोपऱ्यात संख्येवर टॅप करा. तुम्हाला कोणतीही संख्या दिसत नसल्यास, त्या दस्तऐवजासाठी कोणतेही फॉलो-अप नाहीत.
  3. तुम्ही पुढील गोष्टींसाठी उपलब्ध फॉलो-अपची संख्या पाहू शकता:
    • ॲक्शन आयटम
    • सूचना
  4. पहिल्या क्रिया आयटम किंवा सूचनेवर जाण्यासाठी, सूचीतील एका पर्यायावर क्लिक करा.
  5. मेनू बंद करण्यासाठी, संख्येवर क्लिक करा.

Google Docs, Sheets आणि Slides मध्ये इमोजी प्रतिक्रिया वापरणे

तुम्ही दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशनवर टिप्पणी देऊ शकत असल्यास अथवा ते संपादित करू शकत असल्यास, Docs किंवा Sheets मधील टिप्पण्यांवर अथवा तुम्ही हायलाइट केलेल्या Docs किंवा Slides मधील आशयावर इमोजी प्रतिक्रिया जोडू शकता.

इमोजी प्रतिक्रिया जोडणे

टीप: कोलॅबोरेटरने आधीपासून इमोजी प्रतिक्रिया जोडलेली असल्यास, तुमची प्रतिक्रिया जोडण्यासाठी तुम्ही इमोजीवर क्लिक करू शकता. निवडलेल्या त्याच मजकूर किंवा टिपेमध्ये तुम्ही एकाहून अधिक इमोजी जोडू शकता.

Google Docs मधील हायलाइट केलेल्या आशयामध्ये इमोजी प्रतिक्रिया जोडणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google दस्तऐवज उघडा.
  2. तुम्हाला ज्या मजकुरावर प्रतिक्रिया द्यायची आहे तो निवडा.
  3. पर्याय निवडा:
    • उजवीकडील समासात, इमोजी प्रतिक्रिया जोडा Add Emoji Reaction वर क्लिक करा.
    • घाला आणि त्यानंतर इमोजी प्रतिक्रिया वर जा.
  4. पर्याय निवडा:
    • तुम्हाला जोडायचा असलेला इमोजी निवडा.
    • तुम्ही इमोजीसाठी शोध संज्ञादेखील एंटर करू शकता.

टिप्पण्यांमध्ये इमोजी प्रतिक्रिया जोडा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google दस्तऐवज, Google शीट किंवा Google स्लाइड उघडा.
  2. तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची आहे त्या टिप्पणीवर कर्सर फिरवा.
  3. इमोजी प्रतिक्रिया जोडा Add Emoji Reaction वर क्लिक करा.
  4. पर्याय निवडा:
    • तुम्हाला जोडायचा असलेला इमोजी निवडा.
    • तुम्ही इमोजीसाठी शोध संज्ञादेखील एंटर करू शकता.
इमोजी प्रतिक्रिया काढून टाकणे किंवा त्यांचे निराकरण करणे

Google Doc, Sheet किंवा Slides अथवा हायलाइट केलेल्या आशयामधील टिप्पण्यांमधून तुमच्या प्रतिक्रिया काढून टाकण्यासाठी, Google Doc मध्ये इमोजीवर पुन्हा क्लिक करा.

टीप: तुम्ही तुमची प्रतिक्रिया काढून टाकल्यास, ते इतर कोलॅबोरेटरच्या प्रतिक्रिया काढून टाकत नाही.

Google Doc मधील हायलाइट केलेल्या आशयावरील प्रतिक्रियांचे निराकरण करण्यासाठी:

  1. इमोजी प्रतिक्रियेवर क्लिक करा.
  2. निराकरण करा वर क्लिक करा.
    • टीप: निराकरण केलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी, सर्वात वर उजवीकडे, टिप्पण्या टिप्पणी करा वर क्लिक करा.

टिप्पण्यांदरम्यान नेव्हिगेट करण्यासाठी आणि त्यांना उत्तर देण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट वापरा

तुम्ही टिप्पणी निवडू शकता आणि हे करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट वापरू शकता:

  • टिप्पण्यांदरम्यान नेव्हिगेट करणे.
  • टिप्पण्यांना उत्तर देणे.
  • टिप्पण्या लपवणे किंवा दाखवणे.

निवडलेल्या टिप्पण्यांवर कीबोर्ड शॉर्टकट वापरा

सध्याच्या टिप्पणीला उत्तर द्या R
पुढील टिप्पणीवर जा J
मागील टिप्पणीवर जा K
सध्याच्या टिप्पणीचे निराकरण करा E
सध्याच्या टिप्पणीमधून बाहेर पडा U
टिप्पणी लपवणे

Windows, Chrome OS साठी: Ctrl + Alt + Shift + n 

Mac साठी: ⌘ + Alt + Shift + n

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17080310870485865999
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false