तुम्ही तुमच्या Google Slides प्रेझेंटेशनमध्ये कधीही प्रश्नोत्तरांचे लाइव्ह सेशन सुरू करू शकता आणि प्रश्न प्रेझेंट करू शकता. दर्शक कोणत्याही डिव्हाइसवरून प्रश्न विचारू शकतात.
प्रश्नोत्तरांचे सेशन सुरू करा
प्रेक्षकांचे प्रश्न स्वीकारा
- Google Slides प्रेझेंटेशन उघडा.
- सर्वात वरती, स्लाइडशो , च्या शेजारी, डाउन अॅरो वर क्लिक करा.
- प्रेझेंटर दृश्य वर क्लिक करा.
- नवीन विंडोमध्ये, प्रेक्षक टूल वर क्लिक करा.
- नवीन सेशन सुरू करण्यासाठी, नवीन सुरू करा वर क्लिक करा.
- अलीकडील सेशन पुन्हा सुरू करण्यासाठी, अलीकडील सेशन पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा
- प्रश्नोत्तरे संपवण्यासाठी, प्रश्नोत्तरे विंडोमध्ये सुरू करा/बंद करा स्विचवर क्लिक करा.
- टीप: तुम्ही प्रश्नोत्तरे बंद केली नाहीत, तरीही तुम्ही तुमचे Google Slides प्रेझेंटेशन संपवल्यानंतर थोड्याच वेळात प्रश्नोत्तरे दृश्य बंद होते.
टीप: तुम्ही तुमच्या ऑफिसद्वारे, शाळेद्वारे किंवा इतर संस्थांद्वारे Google वापरत असल्यास, प्रश्न कोण सबमिट करू शकते हे तुम्ही निवडू शकता:
- "प्रेझेंटर दृश्य" विंडो मध्ये, प्रेक्षक टूल वर क्लिक करा आणि "यांच्याकडून प्रश्न स्वीकारत आहे…" हे बदला
प्रेक्षकांचे प्रश्न दाखवा
प्रेझेंटर हे प्रेझेंटेशनमध्ये प्रेक्षकांचे प्रश्न दाखवू शकतात:
- "प्रेक्षक टूल" या अंतर्गत, दाखवण्यासाठी प्रश्न शोधा.
- प्रेझेंट करा वर क्लिक करा.
- प्रश्न बदलण्यासाठी, वेगळा प्रश्न शोधा आणि प्रेझेंट करा वर क्लिक करा.
- प्रश्न लपवण्यासाठी, लपवा वर क्लिक करा.
अलीकडील सेशनचे पुनरावलोकन करा
प्रेझेंटर हे अलीकडील प्रश्नोत्तरांच्या सेशनमधील प्रश्न पाहू शकतात:
- Slides चे प्रेझेंटेशन उघडा.
- सर्वात वरती, टूल प्रश्नोत्तरांचा इतिहास वर क्लिक करा.
- अलीकडील सेशन उजवीकडे दिसतात.
प्रश्न विचारा
प्रेझेंटेशनमध्ये प्रेक्षक सदस्य प्रश्न विचारू शकतात:
- प्रेझेंटेशनच्या सर्वात वरती असलेल्या लिंक वर जा.
- प्रश्न विचारा … वर क्लिक करा आणि प्रश्न टाइप करा.
- "निनावीपणे विचारा" या चौकटीत प्रेक्षक सदस्य हे पर्याय म्हणून खूण करू शकतात.
- सबमिट करा वर क्लिक करा.
प्रश्नांवर मत द्या
उत्तर देण्याच्या प्रश्नांवर प्रेक्षक सदस्य मत देऊ शकतात
- स्लाइडवर दाखवलेल्या प्रश्नोत्तरांच्या लिंकवर जा.
- तुम्हाला ज्या प्रश्नावर मत द्यायचे आहे त्याच्या खाली, बाजूने मत द्या किंवा विरोधात मत द्या वर क्लिक करा.