सेल्सच्या रेंजला नाव द्या

त्यांचा अधिक चांगला माग घेण्यासाठी आणि अधिक स्वच्छ सूत्रे तयार करण्यासाठी आपण Google Sheets मध्ये रेंजेसना नाव देऊ शकता.

उदाहरणार्थ, सेलच्या एक रेंजचे वर्णन करण्यासाठी "A1:B2" वापरण्या ऐवजी,आपण त्या रेंजचे नाव "बजेट टोटल" असे ठेवू शकता. अशा प्रकारे ,"=SUM(A1:B2, D4:E6)" सारखे सूत्र "=SUM(budget_total, quarter2)" असे लिहिले जाऊ शकते.

रेंजला नाव द्या

  1. Google Sheets मधे एक स्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्हाला नाव द्यायचे आहेत ते सेल्स निवडा.
  3. डेटा आणि त्यानंतर नाव दिलेली रेंजवर क्लिक करा. उजवीकडे एक मेनू उघडेल.

    टीप: हा मेनू झटपट उघडण्यासाठी, सर्वात वरती डावीकडील रेंज बॉक्समध्ये, ड्रॉप-डाउन मेनू डाउन ॲरो >  नाव दिलेल्या रेंज व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
     
  4. तुम्हाला हवे असलेले रेंज नाव टाइप करा.
  5. रेंज बदलण्यासाठी स्प्रेडशीट वर, क्लिक करा ग्रिड.
  6. स्प्रेडशीटम्ध्ये एक रेंज निवडा किंवा मजकूर Box मध्ये एक नविन रेंज टाइप करा ,नंतर ओकेक्लिक करा.
  7. पूर्ण झाले वर क्लिक करा.

रेंज नावे

  • कृपया फक्त अक्षरे, संख्या आणि अंडरस्कोअर असावेत
  • संख्या किंवा "ट्रु/सत्य" किंवा "फॉल्स/असत्य" यांनी सुरू होऊ शकत नाही.
  • स्पेसेस किंवा विरामचिन्हांकन समाविष्ट असू शकत नाही.
  • 1–250 वर्ण असणे आवश्यक आहे.
  • A1 किंवा R1C1 वाक्यरचना असू शकत नाही. उदाहरणार्थ, आपण "A1:B2" or "R1C1:R2C2."असे नाव आपल्या रेंजला दिले तर आपल्याला एक एरर येऊ शकतो.

नाव दिलेली रेंज संपादित करा किंवा हटवा.

  1. Google Sheets मधे एक स्प्रेडशीट उघडा.
  2. डेटा आणि त्यानंतर नाव दिलेली रेंजवर क्लिक करा.
  3. आपण नाव दिलेली रेंज आपल्याला संपादित करायची किंवा हटवायची असल्यास ,संपादन संपादित करावर क्लिक करा.
  4. रेंज संपादित करण्यासाठी नवे नाव किंवा रेंज प्रविष्ट करा,नंतर डन/केलेवर क्लिक करा.
  5. नाव दिलेली रंज हटवण्यासाठी ,नावाच्या बाजूला,रेंज हटवा हटवा वर क्लिक करा.
  6. उघडणार्‍या मेन्य़ुतून काढून टाकावर क्लिक करा.

टीप:आपण जेव्हा नाव दिलेली रेंज हटवता, तेव्हा संदर्भ देणारी कोणतीही सूत्रे या पुढे काम करणार नाहीत. नाव दिलेल्या रेंजचा संदर्भ देणार्‍या संरक्षित रेंज सेल मूल्य वापरतील व काम करत राहतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12125661527734266820
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false