Google Docs, Sheets, Slides आणि Drawings सह ब्रेल डिस्प्ले वापरणे

तुम्ही Google Docs, Sheets, Slides आणि Drawings वर फाइल वाचण्यासाठी व संपादित करण्यासाठी ब्रेल डिस्प्ले वापरू शकता.

शिफारस केलेला ब्राउझर आणि स्क्रीन रीडर

Docs संपादक Chrome आणि पुढील गोष्टींची शिफारस करतात:

  • Windows वर NVDA किंवा JAWS
  • ChromeOS वर ChromeVox
  • macOS वर VoiceOver

ब्रेल सपोर्ट सुरू करा

  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर दस्‍तऐवज, स्‍प्रेडशीट, प्रेझेंटेशन किंवा ड्रॉइंग उघडा.
  2. टूल मेनूमध्‍ये, अ‍ॅक्‍सेसिबिलिटी सेटिंग्‍ज निवडा.
  3. स्‍क्रीन रीडर सपोर्ट चालू करा निवडा.
  4. ब्रेल सपोर्ट सुरू करा निवडा.

टीप: तुम्ही शॉर्टकटदेखील वापरू शकता:

  • Windows/Chrome OS वर: Ctrl + Alt + h
  • Mac वर: ⌘ + Option + h

ब्रेल सपोर्टसोबत फाइल वापरा

तुम्ही ब्रेल सपोर्ट सुरू केल्यानंतर, तुम्हाला पुढील सुधारणा दिसतील:

  • तुम्‍ही कर्सर हलवण्‍यासाठी तुमच्‍या ब्रेल डिस्प्लेवरील कर्सर राउटिंग बटणे वापरू शकता.
  • कीबोर्ड शॉर्टकट याव्‍यतिरिक्‍त, तुम्ही तुमचे नेहमीचे अनेक स्क्रीन रीडर शॉर्टकट वापरू शकता.
  • अधिक जलद स्‍क्रीन रीडर टायपिंग इको.
  • तुम्‍ही वर्णानुसार नेव्हिगेट केल्‍यावर अधिक जलद स्‍क्रीन रीडर नेव्हिगेशन हँडलिंग.
  • विरामचिन्‍ह आणि व्‍हाइटस्‍पेसच्‍या अधिक चांगल्‍या स्‍क्रीन रीडर घोषणा.
  • तुमचा स्‍क्रीन रीडर हा तुम्‍ही टाइप करत असताना नेहमी वर्णांना इको करण्‍याऐवजी वर्ण इको आणि शब्‍द इकोची त्याची सेटिंग्‍ज वापरतो.

ब्रेल सपोर्ट बंद करा

  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर दस्‍तऐवज, स्‍प्रेडशीट, प्रेझेंटेशन किंवा ड्रॉइंग उघडा.
  2. टूल मेनूमध्‍ये, अ‍ॅक्‍सेसिबिलिटी सेटिंग्‍ज निवडा.
  3. ब्रेल सपोर्ट सुरू करा ची निवड रद्द करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18211019637138106217
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false