Google Docs मध्‍ये संपादने सुचवा


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

तुम्‍ही मूळ मजकूर न बदलता दस्‍तऐवजामध्ये बदल सुचवू शकता. मालकाने तुमच्‍या सूचना मंजूर केल्‍यास, ते मूळ मजकूर बदलतील.

फाइलमधील बदल सूचवा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Docs वर दस्तऐवज उघडा.
    • तुम्हाला बदलायचा असलेला मजकूर निवडा. उजवीकडील समासात बटण दिसते. संपादने सुचवा add suggestion वर क्लिक करा.
    • तुम्हाला टूलबारवर, सुचवत आहे add suggestion न दिसल्यास, पुढीलपैकी पर्याय निवडा:
      • सर्वात वरती उजवीकडे, संपादित करत आहे edit वर क्लिक करा.
      • ड्रॉप-डाउनमधून, सुचवत आहे add suggestion निवडा.
      • संपादन अ‍ॅक्सेसची विनंती करा वर क्लिक करा.
      • फाइल मालकाला टिप्पणी करणारी व्यक्ती किंवा संपादक म्हणून तुमच्यासोबत दस्तऐवज शेअर करण्यास सांगा.
  2. दस्‍तऐवज संपादित करा.
    • तुम्‍हाला तुम्ही केलेला बदल नवीन रंगात दिसेल. तुम्‍ही हटवलेले काहीही क्रॉस आउट होईल.
    • आणखी तपशील जोडण्‍यासाठी, तुमच्‍या सूचनेवर क्लिक करा आणि टिप्‍पणी टाइप करा. त्यानंतर उत्तर द्या वर क्लिक करा.
  3. फाइलच्‍या मालकाला तुमच्‍या सूचनांबद्दल ईमेल मिळेल आणि त्‍या ठेवायच्‍या की नाही याबद्दल तो ठरवू शकेल.

Google Docs, Sheets किंवा Slides मध्‍ये टिप्‍पणी कशी जोडायची ते जाणून घ्‍या.

सूचना स्‍वीकारा किंवा नाकारा

एकामागून एक सूचना स्‍वीकारा

  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, docs.google.com मधील दस्‍तऐवज उघडा.
  2. टिप्‍पणी निवडा.
  3. स्‍वीकारा  ​ किंवा नाकारा वर क्लिक करा.

सर्व संपादने पाहण्‍यासाठी, अगदी वर उजवीकडे जा आणि टिप्‍पण्‍या वर‍ क्लिक करा.

सर्व सूचना स्‍वीकारा किंवा नाकारा

  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, docs.google.com मधील दस्‍तऐवज उघडा.
  2. टूल आणि त्यानंतर सूचित संपादनांचे परीक्षण करा वर क्लिक करा.
  3. बॉक्‍स वर उजवीकडे दिसून येईल.
  4. तुमचे दस्‍तऐवज बदलांसह किंवा त्‍याशिवाय कसे दिसेल याचे पूर्वावलोकन करण्‍यासाठी, डाउन अ‍ॅरोवर क्लिक करा डाउन अ‍ॅरो आणि पर्याय निवडा.
  5. सर्व स्‍वीकारा किंवा सर्व नाकारा वर क्लिक करा.

तुमच्या सूचना व्यवस्थापित करा

इतरांंना बदल सुुुुुचवू द्या

तुमच्‍या दस्‍तऐवजावर टिप्‍पणी करण्‍यासाठी किंवा ते संपादित करण्‍यासाठी तुम्‍ही त्‍यांना परवानगी दिल्‍यावर, लोक संपादने सुचवू शकतात.

तुमची फाइल कशी शेअर करायची ते जाणून घ्‍या.

मागोवा घेतलेल्‍या बदलांसह दस्‍तऐवज आयात करा

Google Docs संपादक आणि Microsoft Office दरम्‍यानच्‍य फायली तुम्‍ही रूपांतरित केल्‍यावर:

  • Microsoft Office मधील मागोवा घेतलेले कोणतेही बदल Google Docs संपादकमध्‍ये सूचन बनतील.
  • Google Docs संपादकमधील कोणत्‍याही सूचना Microsoft Office मध्‍ये मागोवा घेतलेले बदल बनतात.

संबंधित लेख

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12262735927017276928
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false