तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?
आजच Google Workspace वापरून पहा!
तुम्ही Android साठी Google Sheets अॅप सह Google स्प्रेडशीट तसेच Microsoft Excel® फायली तयार करू शकता, पाहू शकता आणि संपादित करू शकता. तुम्हाला अॅप वापरण्यात मदत होऊ शकेले अशा काही गोष्टी येथे आहेत:
१ली पायरी: Google Sheets अॅप डाउनलोड करा
- Play Store मध्ये Google Sheets उघडा.
- इंस्टॉल करा वर टॅप करा. तुमच्या होम स्क्रीनवर Google Sheets अॅप दिसून येईल.
२री पायरी: स्प्रेडशीट तयार करा किंवा संपादित करा
विविध फाइल फॉरमॅटमध्ये काम करा
तुम्ही Android साठी Google Sheets अॅपसह फायली अपलोड आणि डाउनलोड करू शकता.
- आयात करा: तुम्ही XLS, XLSX, XLSM, CSV, ODS आणि TSV फायली उघडू आणि संपादित करू शकता.
- निर्यात करा: तुम्ही XLSX, ODS, PDF आणि वेब पेज म्हणून निर्यात करू शकता (ZIP म्हणून HTML). तुम्ही एकेरी पत्रक CSV किंवा TSV फाइल म्हणून देखील निर्यात करू शकता.
३री पायरी: इतरांसोबत शेअर करा आणि काम करा
तुम्ही लोकांसोबत फायली आणि फोल्डर शेअर करू शकता आणि ते पाहू शकतात, संपादित करू शकतात किंवा त्यावर टिप्पणी करू शकतात की नाही ते निवडा.