तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?
आजच Google Workspace वापरून पहा!
तुम्ही तुमच्या स्प्रेडशीटचे स्तंभ, पंक्ती किंवा सेल जोडू, बदलू, हलवू किंवा हटवू शकता.
पंक्ती किंवा स्तंभ जोडा
- आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Sheets ॲप मध्ये एकस्प्रेडशीट उघडा.
- पंक्ती किंवा स्तंभ निवडा.
- एक नविन पंक्ती किंवा स्तंभ जोडण्यासाठी ,इन्सर्ट(घाला) वर टॅप करा .
- दिसत असणार्या मेनूतून, पर्याय निवडा.
पंक्तीची उंची किंवा स्तंभाची रुंदी बदला
- आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Sheets ॲप मध्ये एकस्प्रेडशीट उघडा.
- आपण आकार बदलू इच्छिता ती पंक्ती किंवा स्तंभ निवडा.
- आकार बदलण्यासाठी,पंक्ती क्रमांक किंवा स्तंभ अक्षर असणार्या सेलचे edge टॅप व ड्रॅग करा.
पंक्ती किंवा स्तंभ हलवा
- आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Sheets ॲप मध्ये एकस्प्रेडशीट उघडा.
- हलवण्यासाठी पंक्ती क्रमांक किंवा स्तंभ अक्षरास स्पर्श करा आणि धरून ठेवा .
- पंक्ती किंवा स्तंभ नव्या ठिकाणी ड्रॅग करा.
पंक्ती किंवा स्तंभ हटवा.
- आपल्या iPhone किंवा iPad वर, Google Sheets ॲप मध्ये एकस्प्रेडशीट उघडा.
- आपल्याला हटवायच्या आहेत त्या पंक्ती किंवा स्तंभ टॅप करा.
- दिसणार्या मेनूत ,राइट ॲरो टॅप करा पंक्ती हटवाकिंवा स्तंभ हटवा.
संबंधित लेख