इमेज क्रॉप कर आणि अ‍ॅडजस्‍ट करा

तुम्‍ही Google Docs आणि Slides मध्‍ये जोडलेल्‍या इमेज क्रॉप करू शकता, मास्‍क करू शकता आणि त्‍यांना बॉर्डर करू शकता.

Google Docs किंवा Slides मध्‍ये इमेल रंग अ‍ॅडजस्‍ट करण्‍यासाठी, कॉंप्‍युटरवर docs.google.com किंवा slides.google.com वर जा. 

इमेजचा आकार बदला किंवा फिरवा

  1. तुमच्‍या iPhone किंवा iPad वर, Google Docs अ‍ॅप किंवा Google Slides अ‍ॅप उघडा.
  2. दस्‍तऐवज किंवा सादरीकरण उघडा.
    • Google Docs मध्‍ये, आणखी 더보기 आणि त्यानंतर प्रिंट लेआउटचालू करा वर टॅप करा.
  3. तुम्‍हाला अ‍ॅडजस्‍ट करायच्‍या असलेल्‍या इमेजवर टॅप करा.
  4. तुम्‍ही इमेजचा आकार अ‍ॅडजस्‍ट करू शकता किंवा ती फिरवू शकता:
    • आकार बदला: कडांसोबत चौकोनांना स्‍पर्श करा आणि ड्रॅग करा.
    • फिरवा: इमेजशी संलग्‍न वर्तुळाला स्‍पर्श करा आणि ड्रॅग करा.

इमेजमध्‍ये सीमा जोडा

  1. तुमच्‍या iPhone किंवा iPad वर, Google Docs अ‍ॅप किंवा Google Slides अ‍ॅप उघडा.
  2. दस्‍तऐवज किंवा सादरीकरण उघडा.
  3. तुम्‍हाला ज्‍या इमेजवर सीमा जोडायची आहे त्‍या इमेजवर टॅप करा.
  4. फॉरमॅट फॉरमॅट वर टॅप करा.
  5. ओळीचा रंग, वजन आणि डॅश निवडा.

Google Docs मध्‍ये इमेज रीसेट करा

तुम्‍ही इमेजमध्‍ये केलेले बदल तुम्‍हाला पहिल्‍यासारखे करायचे असल्‍यास:

  1. तुमच्‍या iPhone किंवा iPad वर, Google Docs अ‍ॅप उघडा.
  2. दस्‍तऐवज उघडा.
  3. तुम्‍हाला रीसेट करायच्‍या असलेल्‍या इमेजवर टॅप करा.
  4. फॉरमॅट फॉरमॅट वर टॅप करा.
  5. "इमेज" मध्‍ये इमेज रीसेट करा वर टॅप करा.

Google Slides मध्‍ये इमेज रीसेट करण्‍यासाठी, कॉंप्‍युटरवर slides.google.com वर जा.

Google Slides मध्‍ये इमेज क्रॉप किंवा मास्‍क करा

इमेजच्‍या कडा ट्रिम करण्‍यासाठी किंवा आकारात इमेज फिट बसवण्‍यासाठी, इमेज क्रॉप किंवा मास्‍क करा.

  1. तुमच्‍या iPhone किंवा iPad वर, Google Slides अ‍ॅप उघडा.
  2. सादरीकरण उघडा.
  3. तुम्‍हाला क्रॉप किंवा मास्‍क करायच्‍या असलेल्‍या इमेजवर टॅप करा.
  4. क्रॉप करा क्रॉप करा वर टॅप करा.
    • इमेज क्रॉप करण्‍यासाठी, सीमेला स्‍पर्श करा व ड्रॅग करा.
    • इमेज मास्‍क करण्‍यासाठी, मास्‍क करा वर टॅप करा मास्क आणि त्यानंतर तुम्‍हाला हव्‍या त्‍या आकारावर टॅप करा. आकार तुमची इमेज कव्‍हर करेल. तुमचा आकार अ‍ॅडजस्‍ट करण्‍यासाठी, सीमेला स्‍पर्श करा व ड्रॅग करा.

Google Docs मध्‍ये इमेज क्रॉप करण्‍यासाठी, कॉंप्‍युटरवर docs.google.com वर जा.

 

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9415844246812970705
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false