इमेज क्रॉप कर आणि अ‍ॅडजस्‍ट करा

तुम्‍ही Google Docs आणि Slides मध्‍ये जोडलेल्‍या इमेज क्रॉप करू शकता, मास्‍क करू शकता आणि त्‍यांना बॉर्डर करू शकता.

इमेज क्रॉप करा

तुम्‍ही इमेजच्‍या कडा ट्रिम करू शकता किंवा अनैच्छिक विभाग काढू शकता.

 1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, दस्‍तऐवज किंवा सादरीकरण उघडा.
 2. तुम्‍हाला क्रॉप करायच्‍या असलेल्‍या इमेजवर क्लिक करा.
 3. क्रॉप करा क्रॉप करा वर क्लिक करा.
 4. सीमेच्‍या भोवती, तुम्‍हाला हव्‍या त्‍या आकारात निळ्या चौकोनांवर क्लिक करा व ड्रॅग करा.
 5. तुमचे झाल्‍यावर, तुमच्‍या कीबोर्डवर Enter दाबा किंवा तुमच्‍या फाइलवर कुठेही क्लिक करा.
Google Slides इमेज मास्‍क करा

Google Slides मधील आकारात इमेज फिट करण्‍यासाठी, तुम्‍ही इमेज मास्‍क करू शकता

 1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, सादरीकरण उघडा.
 2. तुम्‍हाला मास्‍क करायच्‍या असलेल्‍या इमेजवर क्लिक करा.
 3. वर, क्रॉपच्‍या पुढे क्रॉप करा, डाउन अ‍ॅरो वर क्लिक करा डाउन ॲरो.
 4. तुम्‍हाला हव्‍या त्‍या आकारावर क्लिक करा.
 5. तुमचा आकार तुमची इमेज मास्‍क करेल. तुमचा आकार अ‍ॅडजस्‍ट करण्‍यासाठी, रंगीत हँडलवर क्लिक करा व ते ड्रॅग करा.
इमेजमध्‍ये सीमा जोडा
 1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, दस्‍तऐवज किंवा सादरीकरण उघडा.
 2. तुम्‍हाला ज्‍या इमेजला सीमा जोडायची आहे त्‍या इमेजवर क्लिक करा.
 3. ओळ रंग ओळीचा रंगवर क्लिक करा.
 4. रंग निवडा.
रंग आणि फिल्‍टर अ‍ॅडजस्‍ट करा

तुम्‍ही तुमच्‍या इमेजपैकी एकाचा रंग, चमक, पारदर्शकता किंवा कॉंट्रास्‍ट बदलू शकता.

 1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, दस्‍तऐवज किंवा सादरीकरण उघडा.
 2. तुम्‍हाला अ‍ॅडजस्‍ट करायच्‍या असलेल्‍या इमेजवर क्लिक करा.
 3. फॉरमॅट करा आणि त्यानंतर इमेज आणि त्यानंतर इमेज पर्याय वर क्लिक करा.
 4. "पुन्‍हा रंग द्या" मध्‍ये, तुमच्‍या इमेजचा रंग बदला.
 5. "अ‍ॅडजस्‍टमेंट" मध्‍ये, बदला:
  • पारदर्शकता: इमेजच्‍या खाली किती स्‍लाइड दाखवायच्‍या?
  • चमक: स्‍लाइडवर इमेज किती चमकदार दिसून येईल?
  • कॉंट्रास्‍ट: इमेज बॅकग्राउंडवर किती उठून दिसेल?
 6. तुम्‍ही जसे संपादित कराल तसे तुमचे बदल तुम्‍ही पाहू शकाल.
इमेज रीसेट करा

तुमच्‍या फोटोतील बदल तुम्‍हाला पहिल्‍यासारखे करायचे असल्‍यास, इमेज तिच्‍या मूळ फोटोत रीसेट करा.

 1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, तुमचे दस्‍तऐवज किंवा सादरीकरण उघडा.
 2. प्रतिमा निवडा.
 3. इमेज रीसेट करा इमेज रीसेट करा वर क्लिक करा.
 4. संपादित केलेली इमेज तुम्‍ही जोडलेल्‍या फाइलमधील मूळ फोटोत दिसेल.

 

हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?