तुमचा आवाज वापरून टाइप करा

तुम्ही Google Docs किंवा Google Slides स्पीकर नोटमध्ये बोलून टाइप किंवा संपादित करू शकता. हे वैशिष्‍ट्य Chrome, Firefox, Edge आणि Safari या ब्राउझरच्या नवीनतम आवृत्तींसोबत काम करते.

पहिली पायरी: तुमचा मायक्रोफोन सुरू करा

व्हॉइस टायपिंग किंवा व्हॉइस कमांड वापरण्यासाठी, तुमच्या कॉंप्युटरचा मायक्रोफोन सुरू असणे आणि त्याने काम करणे आवश्यक आहे.

डिव्हाइस आणि मायक्रोफोनमध्ये फरक असतो, त्यामुळे सूचनांसाठी तुमची काँप्युटर माहितीपुस्तिका पहा. मायक्रोफोनची सेटिंग्ज साधारणपणे Mac वर सिस्टीम प्राधान्ये मध्ये किंवा PC वर कंट्रोल पॅनल मध्ये असतात.

दुसरी पायरी: व्हॉइस टायपिंग वापरा

तुमचा आवाज वापरून टाइप करा

दस्तऐवजामध्ये व्हॉइस टायपिंग सुरू करा

  1. तुमचा मायक्रोफोन काम करत आहे का ते तपासा.
  2. Chrome ब्राउझर वापरून Google Docs मध्ये दस्तऐवज उघडा.
  3. टूल आणि त्यानंतर व्हॉइस टायपिंग वर क्लिक करा. मायक्रोफोन बॉक्स दिसतो.
  4. तुम्ही बोलण्यास तयार असाल, तेव्हा मायक्रोफोनवर क्लिक करा.
  5. नेहमीच्या आवाजात आणि गतीने (विरामचिन्ह वापरण्याबाबत अधिक माहितीसाठी खाली पहा) स्पष्ट बोला.
  6. तुमचे पूर्ण झाल्यावर, मायक्रोफोनवर पुन्हा क्लिक करा.

Slides स्पीकर नोटमध्ये व्हॉइस टायपिंग सुरू करा

  1. तुमचा मायक्रोफोन काम करत आहे का ते तपासा.
  2. Chrome ब्राउझर वापरून Google Slides मध्ये प्रेझेंटेशन उघडा.
  3. टूल आणि त्यानंतर व्हॉइस टाइप स्पीकर नोट वर क्लिक करा. स्पीकर नोट उघडते आणि मायक्रोफोन बॉक्स दिसतो.
  4. तुम्ही बोलण्यास तयार असाल, तेव्हा मायक्रोफोनवर क्लिक करा.
  5. नेहमीच्या आवाजात आणि गतीने (विरामचिन्ह वापरण्याबाबत अधिक माहितीसाठी खाली पहा) स्पष्ट बोला.
  6. तुमचे पूर्ण झाल्यावर, मायक्रोफोनवर पुन्हा क्लिक करा.

व्हॉइस टायपिंग करताना चुका सुधारा

  • तुम्ही तुमचा आवाज वापरून टाइप करताना चूक केल्यास, चूक झालेल्या ठिकाणी तुमचा कर्सर हलवून तुम्ही मायक्रोफोन बंद न करता तिचे निराकरण करू शकता.
  • तुम्ही चुकीचे निराकरण केल्यानंतर, तुम्हाला पुढे सुरू ठेवायचे असलेल्या ठिकाणी कर्सर पुन्हा हलवा.
  • सूचनांची सूची पाहण्यासाठी, राखाडी रंगाने अधोरेखित केलेल्या शब्दांवर राइट-क्लिक करा.

व्हॉइस टायपिंगसोबत काम करणाऱ्या भाषा

व्हॉइस टायपिंग हे या भाषा आणि अ‍ॅक्सेंटमध्ये काम करते:

आफ्रिकन, अम्हारिक, अरबी, अरबी (अल्जीरिया), अरबी (बहारीन), अरबी (ईजिप्त), अरबी (इस्राएल), अरबी (जॉर्डन), अरबी (कुवेत), अरबी (लेबनॉन), अरबी (मोरोक्को), अरबी (ओमान), अरबी (पॅलेस्टाइन), अरबी (कतार), अरबी (सौदी अरेबिया), अरबी (ट्युनिशिया), अरबी (संयुक्त अरब अमिराती), आर्मेनियन, अझरबैजानी, बहासा इंडोनेशिया, बास्क, बंगाली (बांग्लादेश), बंगाली (भारत), बल्गेरियन, कॅटलान, चीनी (सुलभ केलेली), चीनी (पारंपरिक), चीनी (हाँगकाँग), क्रोएशियन, झेक, डॅनिश, डच, इंग्रजी (ऑस्ट्रेलिया), इंग्रजी (कॅनडा), इंग्रजी (घाना), इंग्रजी (भारत), इंग्रजी (आयर्लंड), इंग्रजी (केन्या), इंग्रजी (न्यूझीलंड), इंग्रजी (नायजेरिया), इंग्रजी (फिलीपीन्स), इंग्रजी (दक्षिण आफ्रिका), इंग्रजी (टांझानिया), इंग्रजी (यूके), इंग्रजी (यूएस), फारसी, फिलिपिनो, फिन्निश, फ्रेंच, गॅलिशियन, जॉर्जियन, जर्मन, ग्रीक, गुजराती, हिब्रू, हिंदी, हंगेरियन, आइसलँडिक, इटालियन, इटालियन (इटली), इटालियन (स्वित्झर्लंड), जपानी, जावानीज, कन्नड, ख्मेर, कोरियन, लाओशियन, लाटवियन, लिथुआनियन, मल्याळम, मलेशियन, मराठी, नेपाळी, नॉर्वेजियन, पोलिश, पोर्तुगीज (ब्राझील), पोर्तुगीज (पोर्तुगाल), रोमानियन, रशियन, स्लोव्हाक, स्लोव्हेनियन, सर्बियन, सिंहला, स्पॅनिश, स्पॅनिश (अर्जेंटिना), स्पॅनिश (बोलिव्हिया), स्पॅनिश (चिली), स्पॅनिश (कोलंबिया), स्पॅनिश (कोस्टा रिका), स्पॅनिश (इक्वेडोर), स्पॅनिश (एल साल्वादोर), स्पॅनिश (स्पेन), स्पॅनिश (यूएस), स्पॅनिश (ग्वाटेमाला), स्पॅनिश (होंडुरस), स्पॅनिश (लॅटिन अमेरिका), स्पॅनिश (मेक्सिको) ), स्पॅनिश (निकाराग्वा), स्पॅनिश (पनामा), स्पॅनिश (पॅराग्वे), स्पॅनिश (पेरु), स्पॅनिश (पुएर्तो रिको), स्पॅनिश (उरुग्वे), स्पॅनिश (व्हेनेझुएला), सुंदानीज, स्वाहिली (केन्या), स्वाहिली (टांझानिया), स्वीडिश, तमिळ (भारत), तमिळ (मलेशिया), तमिळ (सिंगापूर), तमिळ (श्रीलंका), थाई, तुर्की, युक्रेनियन, उर्दू (भारत), उर्दू (पाकिस्तान), व्हिएतनामी, झुलू.

विरामचिन्ह जोडा

तुमच्या मजकुरामध्ये विरामचिन्ह जोडण्यासाठी तुम्ही वेगवेगळी वाक्ये वापरू शकता. सर्व भाषांमध्ये विरामचिन्ह कदाचित उपलब्ध नसेल:
 

तिसरी पायरी: व्हॉइस कमांड वापरा

तुम्ही व्हॉइस टायपिंग सुरू केल्यानंतर, तुमचा दस्तऐवज संपादित आणि फॉरमॅट करण्यासाठी कमांड वापरू शकता. उदाहरणार्थ, "परिच्छेद निवडा", "आयटॅलिक" किंवा "ओळीच्या शेवटी जा."

टिपा:

  • व्हॉइस कमांड फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध आहेत. खात्याची भाषा आणि दस्तऐवजाची भाषा या दोन्हीही इंग्रजी असणे आवश्यक आहे.
  • व्हॉइस कमांड या Slides स्पीकर नोटमध्ये उपलब्ध नाहीत.

मजकूर निवडा

मजकूर निवडण्यासाठी, या कमांड म्हणा:

  • [शब्द किंवा वाक्य] निवडा
  • सर्व निवडा
  • जुळणारा सर्व मजकूर निवडा
  • सूचीतील आयटम निवडा
  • सध्याच्या स्तरावर सूचीतील आयटम निवडा
  • पुढील वर्ण निवडा
  • पुढील [नंबर] वर्ण निवडा
  • शेवटचा वर्ण निवडा
  • शेवटचे [नंबर] वर्ण निवडा
  • ओळ निवडा
  • पुढील ओळ निवडा
  • पुढील [नंबर] ओळी निवडा
  • शेवटची ओळ निवडा
  • शेवटच्या [नंबर] ओळी निवडा
  • परिच्छेद निवडा
  • पुढील परिच्छेद निवडा
  • पुढील [नंबर] परिच्छेद निवडा
  • शेवटचा परिच्छेद निवडा
  • शेवटचे [नंबर] परिच्छेद निवडा
  • शब्द निवडा
  • पुढील शब्द निवडा
  • पुढील [नंबर] शब्द निवडा
  • शेवटचा शब्द निवडा
  • शेवटचे [नंबर] शब्द निवडा
  • निवड रद्द करा
  • निवड रद्द करा
  • काहीही निवडू नका

तुमचा दस्तऐवज फॉरमॅट करा

तुमचा दस्तऐवज फॉरमॅट करण्यासाठी, या कमांड म्हणा:

मजकुराचे फॉरमॅटिंग

  • शीर्षक लागू करा [१–६]
  • सामान्य मजकूर लागू करा
  • उपशीर्षक लागू करा
  • शीर्षक लागू करा
  • ठळक
  • आयटॅलिक करा
  • आयटॅलिक
  • स्ट्राइकथ्रू
  • सबस्क्रिप्ट
  • सुपरस्क्रिप्ट
  • अंडरलाइन
  • अप्परकेस
  • शीर्षकाची केस
  • लोअरकेस

मजकुराचा रंग आणि हायलाइटिंग

  • मजकुराचा रंग [रंग]
  • हायलाइट
  • हायलाइट [रंग]
  • बॅकग्राउंडचा रंग [रंग]
  • हायलाइट काढून टाका
  • बॅकग्राउंडचा रंग काढून टाका
टीप: हे उपलब्ध रंग आहेत: लाल, लाल बेरी, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळसर, निळा, कॉर्नफ्लॉवर निळा, जांभळा, किरमिजी, काळा, पांढरा आणि राखाडी. काळा आणि पांढरा वगळता सर्व रंगांसाठी, तुम्ही १-३ सोबत "हलका" किंवा "गडद" जोडू शकता (राखाडीसाठी, १-४), जसे की "गडद जांभळा ३." तुम्ही "हायलाइट करा" म्हटल्यास, हायलाइट करण्याचा रंग पिवळा आहे.

फॉंटचा आकार

  • फॉंटचा आकार कमी करा
  • फॉंटचा आकार वाढवा
  • फॉंटचा आकार [६-४००]
  • आणखी मोठा करा
  • आणखी लहान करा

परिच्छेदाचे फॉरमॅटिंग

  • इंडेंट कमी करा
  • इंडेंट वाढवा
  • ओळींमधील अंतर [१-१००]
  • ओळींमधील अंतर दुहेरी आहे
  • ओळींमधील अंतर एकेरी आहे

अलाइनमेंट

  • मध्यभागी अलाइन करा
  • अलाइन करणे जस्टिफाय केले
  • डावीकडे अलाइन करा
  • उजवीकडे अलाइन करा
  • मध्यभागी अलाइन करा
  • डावीकडे अलाइन करा
  • उजवीकडे अलाइन करा

स्तंभ

  • एक स्तंभ लागू करा
  • दोन स्तंभ लागू करा
  • तीन स्तंभ लागू करा
  • स्तंभ पर्याय
  • स्तंभ ब्रेक घाला

सूची

  • बुलेट पॉइंट सूची तयार करा
  • क्रमांकित सूची तयार करा
  • बुलेट घाला
  • संख्‍या घाला

फॉरमॅटिंग काढून टाका

  • फॉरमॅटिंग साफ करा
  • फॉरमॅटिंग काढून टाका
  • ठळक केलेले काढून टाका
  • आयटॅलिक काढून टाका
  • स्ट्राइकथ्रू काढून टाका
  • अंडरलाइन काढून टाका

तुमचा दस्तऐवज संपादित करा

तुमचा दस्तऐवज संपादित करण्यासाठी, या कमांड म्हणा:

  • कॉपी करा
  • कट करा
  • पेस्ट करा
  • हटवा
  • शेवटचा शब्द हटवा
  • [शब्द किंवा वाक्य] हटवा
  • लिंक घाला [त्यानंतर तुम्हाला वापरायची असलेली URL म्हणा]
  • लिंक कॉपी करा
  • लिंक हटवा
  • आशय सारणी घाला
  • आशय सारणी हटवा
  • आशय सारणी अपडेट करा
  • टिप्पणी घाला [त्यानंतर तुमची कमेंट म्हणा]
  • बुकमार्क घाला
  • समीकरण घाला
  • फूटर घाला
  • तळटीप घाला
  • हेडर घाला
  • आडवी ओळ घाला
  • पेज ब्रेक घाला

टिपा:

  • तुम्ही "हटवा" म्हटल्यास, कर्सरच्या आधीचा शब्द हटवता.
  • तुम्ही URL चा मजकूर निवडल्यास आणि "लिंक घाला" असे म्हटल्यास, निवडलेला मजकूर हायपरलिंक होतो.

सारण्या जोडा आणि संपादित करा

सारण्या जोडण्यासाठी आणि संपादित करण्यासाठी, या कमांड म्हणा:

  • सारणी घाला
  • [१-२०] पंक्ती बाय [१-२०] स्तंभांची सारणी घाला
  • पंक्ती घाला
  • स्तंभ घाला
  • नवीन स्तंभ घाला
  • डावीकडे नवीन स्तंभ घाला
  • नवीन पंक्ती घाला
  • वर नवीन पंक्ती घाला
  • खाली नवीन पंक्ती घाला
  • स्तंभ हटवा
  • पंक्ती हटवा
  • सारणी हटवा
  • स्तंभ काढून टाका
  • पंक्ती काढून टाका
  • सारणी काढून टाका
  • सारणीमधून बाहेर पडा

तुमच्या दस्तऐवजामध्ये कुठेही जा

तुमच्या दस्तऐवजामध्ये कुठेही जाण्यासाठी, या कमांड म्हणा:

भाग एक भाग दोन भाग तीन

उदाहरण:

यावर जा

च्या शेवटी परिच्छेद

यावर जा

येथे हलवा

च्या शेवटी

च्या सुरुवातीला

परिच्छेद

स्तंभ

ओळ

पंक्ती

सारणी

दस्तऐवज

यावर जा

येथे हलवा

पुढील

मागील

वर्ण

स्तंभ

तळटीप

फॉरमॅटिंगसंबंधी बदल

शीर्षक

शीर्षक [१-६]

इमेज

ओळ

लिंक

सूची

सूची आयटम

चुकीचे शब्दलेखन

परिच्छेद

पंक्ती

सारणी

शब्द

पेज

जा

हलवा

पुढे

मागे

[नंबर] वर्ण

[नंबर] शब्द

जा

हलवा

वर

खाली

[नंबर] ओळी

[नंबर] परिच्छेद

स्क्रोल करा

  • खाली स्क्रोल करा
  • वर स्क्रोल करा

व्हॉइस टायपिंग थांबवा

व्हॉइस टायपिंग थांबवण्यासाठी, "ऐकणे थांबवा" म्हणा.

व्हॉइस टायपिंग पुन्‍हा सुरू करा

परिच्छेदाच्या शेवटी कर्सर हलवण्यासाठी आणि पुन्हा व्हॉइस टायपिंग सुरू करण्यासाठी, "पुन्हा सुरू करा" म्हणा.

विशिष्ट शब्द किंवा वाक्याच्या शेवटी कर्सर हलवण्यासाठी, "[शब्द किंवा वाक्य] सोबत पुन्हा सुरू करा" म्हणा.

व्हॉइस टायपिंग पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्ही म्हणू शकता अशा सर्व कमांड येथे आहेत:

  • पुन्हा सुरू करा
  • [शब्द किंवा वाक्य] सोबत पुन्‍हा सुरू करा
  • परिच्छेदाच्या शेवटी जा
  • परिच्छेदाच्या शेवटी हलवा
  • ओळीच्या शेवटी जा
  • ओळीच्या शेवटी हलवा
  • [शब्द] वर जा
मदतीसंबंधीचा विभाग उघडण्यासाठी कमांड

तुमच्या दस्तऐवजामध्ये व्हॉइस कमांडची सूची उघडण्यासाठी, या कमांड म्हणा:

  • व्हॉइस टायपिंगसंबंधी मदत
  • व्हॉइस कमांडची सूची
  • सर्व व्हॉइस कमांड पहा
बोला (अ‍ॅक्सेसिबिलिटीसाठी)

या कमांड वापरण्यासाठी, स्क्रीन रीडर सपोर्ट सुरू करा. हेडफोन घालणे सर्वोत्तम आहे, जेणेकरून स्क्रीन रीडर फीडबॅक हा तुमच्या दस्तऐवजात टाइप केला जाणार नाही.

  • कर्सरचे स्थान बोला
  • कर्सर स्थानावरून बोला
  • बोलणे निवडा
  • निवड फॉरमॅटिंग बोला
  • सारणी पंक्ती आणि स्तंभाचा हेडर बोला
  • सारणी सेलचे स्थान बोला
  • सारणी स्तंभाचा हेडर बोला
  • सारणी पंक्तीचा हेडर बोला

ट्रबलशूट करा

व्हॉइस टायपिंग काम करत नसल्यास, या पायऱ्या वापरून पहा.

"आम्हाला तुमचे बोलणे ऐकू येत नाही"

तुम्हाला "आम्हाला तुमचे बोलणे ऐकू येत नाही" असे म्हणणारा एरर मेसेज दिसल्यास, पुढील गोष्टी करून पहा:

  • शांत रूममध्ये जा.
  • बाह्य मायक्रोफोन प्लग इन करा.
  • तुमच्या मायक्रोफोनवरील इनपुट व्‍हॉल्‍यूम अ‍ॅडजस्ट करा.

मायक्रोफोन काम करत नाही

तुमच्या कॉंप्युटरवर मायक्रोफोन काम करत नसल्यास, पुढील गोष्टी करून पहा:

  • मायक्रोफोन बिघडलेला नसल्याची खात्री करा.
  • तुमच्या कॉंप्युटर सिस्टीम प्राधान्यांमध्ये तुमची मायक्रोफोन सेटिंग्ज तपासा.
  • तुमचा मायक्रोफोन प्लग इन केलेला असल्याची आणि तो दुसऱ्या अ‍ॅप्लिकेशनद्वारे वापरला जात नसल्याचे तपासा.
  • शांत रूममध्ये जा.
  • तुमचा काँप्युटर रीस्टार्ट करा.

व्हॉइस कमांड काम करत नाहीत

व्हॉइस कमांड काम करत नसल्यास, पुढील गोष्टी करून पहा:

  • आणखी हळू आणि स्पष्ट बोला
  • प्रत्येक कमांडच्या आधी आणि नंतर थांबा. तुमच्या कमांडचा मजकूर काही क्षणासाठी दस्तऐवजामध्ये दिसू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही "सर्व निवडा" म्हटल्यास, तुमचा मजकूर निवडला जाण्याआधी "सर्व निवडा" शब्द दिसतील.
  • मायक्रोफोन हा सर्वात अलीकडील कमांड असलेला बबल दाखवतो. Docs किंवा Slides ने योग्य कमांड ऐकल्याची पडताळणी करा. नसल्यास, तुम्ही "पहिल्यासारखे करा" म्हणू शकता.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8904836366507676480
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false