बुलेट केलेली किंवा क्रमांकित सूची जोडा

तुम्‍ही Google Docs आणि Slides मध्‍ये बुलेट केलेल्‍या किंवा क्रमांकित सूची जोडू व कस्‍टमाइझ करू शकता.

सूची जोडा

 1. तुमच्‍या कॉंप्युटरवर, Google Docs किंवा Slides मध्‍ये दस्‍तऐवज किंवा सादरीकरण उघडा.
 2. तुमची सूची कुठे जोडायची आहे त्‍या पेज किंवा स्‍लाइडवर क्लिक करा.
 3. टूलबारमध्‍ये, सूची प्रकार निवडा. तुम्‍हाला पर्याय न आढळल्‍यास, अधिक अधिक वर क्लिक करा.
  • क्रमांकित सूची क्रमांकित सूची
  • बुलेट केलेली सूची बुलेट केलेली सूची
 4. पर्यायी:
  • सूचीतील सूची सुरू करण्‍यासाठी, तुमच्‍या कीबोर्डवरील,टॅब दाबा. नवीन सूची इंडेंट केली जाईल.
  • मुख्‍य सूचीवर परत जाण्‍यासाठी, तुमच्‍या कीबोर्डवर एंटर दोनदा दाबा. 

सूची संपादित करा

तुम्‍ही सूचीचा बुलेट प्रकार, इंडेंट, उपसर्ग आणि प्रत्‍यय बदलू शकता.

सूची प्रकार व रंग बदला

सूची प्रकार बदला

 1. तुमच्‍या कॉंप्युटरवर, Google Docs किंवा Slides मध्‍ये दस्‍‍‍‍‍‍तऐवज किंवा सादरीकरण उघडा.
 2. बुलेट किंवा नंबरवर क्लिक करा.
 3. शीर्षस्‍थानी, फॉरमॅट आणि त्यानंतर बुलेट आणि क्रमांंकन वर क्लिक करा
 4. नवीन बुलेट प्रकार निवडा:
  • सूची पर्याय: कस्‍टम बुलेट तयार करण्‍यासाठी, आणखी बुलेट वर क्लिक करा.
  • क्रमांकित सूची
  • बुलेट केलेली सूची

सूची रंग बदला

 1. तुमच्‍या कॉंप्युटरवर, Google Docs किंवा Slides मध्‍ये दस्‍‍‍‍‍‍तऐवज किंवा सादरीकरण उघडा.
 2. बुलेट किंवा नंबरवर क्लिक करा.
 3. टूलबारमध्‍ये, मजकूर रंग रंगीत मजकूर वर क्लिक करा.
 4. रंग निवडा.

Docs आणि Slides: क्रमांकित सूची पुन्‍हा सुरू करा

 1. तुमच्‍या कॉंप्युटरवर, Google Docs किंवा Slides मध्‍ये दस्‍तऐवज किंवा सादरीकरण उघडा.
 2. पहिल्‍या नंबरवर दोनदा-क्लिक करा
 3. शीर्षस्‍थानी, फॉरमॅट आणि त्यानंतर बुलेट व क्रमांकन वर क्लिक करा.
 4. सूची पर्याय निवडा आणि त्यानंतर क्रमांकन रीस्‍टार्ट करा.
 5. तुमच्‍या सूचीसाठी नवीन प्रारंभ नंबर एंटर करा.
 6. ठीक आहे क्लिक करा.

Docs: क्रमांकित सूची सुरू ठेवा

 1. तुमच्‍या कॉंप्युटरवर, Google Docs मध्‍ये दस्‍तऐवज उघडा.
 2. पहिल्‍या नंबरवर दोनदा-क्लिक करा
 3. शीर्षस्‍थानी, फॉरमॅट आणि त्यानंतर बुलेट व क्रमांकन वर क्लिक करा.
 4. सूची पर्याय निवडाआणि त्यानंतर मागील क्रमांकन सुरू ठेवा.
 5. ठीक आहे क्लिक करा.

इंडेंट बदला

हँगिंग इंडेंट जोडा

हँगिंग इंडेंटसह, पहिल्‍या ओळीव्‍यतिरिक्‍त सर्वकाही इंडेंट केले आहे.

Google Docs

 1. तुमच्‍या कॉम्‍प्‍यूटरवर, Google Docs मध्‍ये दस्‍तऐवज उघडा.
 2. तुम्‍ही इंडेंट करू इच्छित असलेला मजकूर हायलाइट करा.
 3. मेनूमध्‍ये शीर्षस्‍थानी, फॉरमॅट आणि त्यानंतर संरेखन आणि इंडेंट आणि त्यानंतर इंडेंटेशन पर्याय वर क्लिक करा.
 4. "खास इंडेंट" अंतर्गत, "हँगिंग" निवडा.
 5. पर्यायी: "हँगिंग" च्‍या पुढील बॉक्‍समध्‍ये, इंडेंटचा आकार बदला.
 6. लागू करा वर क्लिक करा.

Google स्लाइड

 1. तुमच्‍या कॉम्‍प्‍यूटरवर, Google Slides मध्‍ये सादरीकरण उघडा.
 2. तुम्‍ही इंडेंट करू इच्छित असलेला मजकूर हायलाइट करा.
 3. मेनूमध्‍ये शीर्षस्‍थानी, फॉरमॅट आणि त्यानंतर पर्याय फॉरमॅट करा वर क्लिक करा.
 4. उजवीकडे, मजकूर फिटिंगवर क्लिक करा.
 5. "इंडेंट" अंतर्गत, "हँगिंग" निवडा.
 6. पर्यायी: "नुसार" अंतर्गत, इंडेंटचा आकार बदला.

Google Slides मध्‍ये मजकूराच्‍या भोवती स्‍पेस जोडा

तुम्‍ही मजकूर आणि स्‍लाइडच्‍या मजकूर बॉक्‍सच्‍या कडेदरम्‍यान जागा बदलू शकता.

 1. तुमच्‍या कॉम्‍प्‍यूटरवर, Google Slides मध्‍ये सादरीकरण उघडा.
 2. तुम्‍ही बदलू इच्छित असलेला मजकूर हायलाइट करा.
 3. मेनूमध्‍ये शीर्षस्‍थानी, फॉरमॅट आणि त्यानंतर पर्याय फॉरमॅट करा वर क्लिक करा.
 4. उजवीकडे, मजकूर फिटिंग वर क्लिक करा.
 5. "पॅडिंग" अंतर्गत, तुमचे बदल करा.
हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?