तुमचा फॉर्म संपादित करणे

तुम्ही फॉर्म तयार केला असल्यास, तुम्ही त्यामध्ये प्रश्न, वर्णने, इमेज आणि व्हिडिओ यांसारख्या सुमारे ३०० आशयांचे तुकडे जोडू शकता आणि संपादित करू शकता. तुमच्या फॉर्मचे संयोजन विषयानुसार करण्यासाठी, तुम्ही सुमारे ७५ विभााग जोडू शकता.

प्रश्न, हेडर आणि विभाग जोडा

एक प्रश्न जोडा
  1. Google Forms मध्ये फॉर्म उघडा.
  2. जोडा प्रश्न जोडा वर क्लिक करा.
  3. प्रश्नाच्या उजवीकडे, तुम्हाला हवा असलेला प्रश्नाचा प्रकार निवडा.
  4. तुमच्या प्रश्नासाठीचे संभाव्य प्रतिसाद टाइप करा. लोकांना उत्तर न देण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक हे सुरू करा.
प्रतिमा किंवा व्हिडिओ जोडा

एखाद्या प्रश्नासोबत किंवा उत्तरासोबत इमेज किंवा व्हिडिओ जोडा

तुम्ही एकाहून अधिक निवडींसाठी किंवा चेकबॉक्स प्रश्नासोबत किंवा उत्तरासोबत एखादी इमेज जोडू शकता.

  1. Google Forms मध्‍ये, एक फॉर्म उघडा.
  2. एका प्रश्न किंवा उत्तरावर क्लिक करा.
  3. उजवीकडील, इमेज जोडा इमेज घाला वर क्लिक करा.
  4. इमेज अपलोड करा किंवा निवडा.
  5. निवडा वर क्लिक करा.

स्वतःहून इमेज किंवा व्हिडिओ जोडा

तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये इमेज किंवा YouTube व्हिडिओ जोडू शकता. तुम्ही व्हिडिओंमध्ये प्रश्न जोडू शकत नाही, परंतु तुम्ही ते प्रश्नाच्या आधी किंवा नंतर टाकू शकता.

  1. Google Forms मध्‍ये, एक फॉर्म उघडा.
  2. इमेज जोडण्यासाठी, इमेज जोडा इमेज घाला वर क्लिक करा. व्हिडिओ जोडण्यासाठी, व्हिडिओ जोडाVideo वर क्लिक करा.
  3. तुमची इमेज किंवा तुमचा व्हिडिओ निवडा आणि निवडा वर क्लिक करा.
एक विभाग जोडणे

विभागांमुळे तुमचा फॉर्म वाचणे आणि पूर्ण करणे सोपे होऊ शकते.

  1. Google Forms मध्‍ये, एक फॉर्म उघडा.
  2. विभाग जोडा Section वर क्लिक करा.
  3. नवीन विभागाला नाव द्या.
प्रश्न, इमेज किंवा विभाग डुप्लिकेट करा

प्रश्न किंवा इमेज

  1. एका प्रश्नावर किंवा इमेजवर क्लिक करा.
  2. डुप्लिकेट करा Make a copy वर क्लिक करा.

विभाग

  1. विभाग शीर्षलेखावर क्लिक करा.
  2. अधिक आणखीवर क्लिक करा.
  3. विभाग डुप्लिकेट करा वर क्लिक करा.
मागील फॉर्मवरील प्रश्न पुन्हा वापरा
  1. Google Forms मध्‍ये, एक फॉर्म उघडा.
  2. उजवीकडे, प्रश्न जोडा प्रश्न जोडा आणि त्यानंतरप्रश्न इंपोर्ट करा प्रश्न इंपोर्ट करा वर क्लिक करा.
  3. तुम्हाला जे प्रश्न इंपोर्ट करायचे आहेत ते असलेल्या फॉर्मवर क्लिक करा आणि त्यानंतरनिवडा.
  4. उजवीकडे, तुम्हाला जोडायचा असलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या समोरील चौकटीत क्लिक करा.
  5. प्रश्न इंपोर्ट करा वर क्लिक करा.

आयटम्स हटवा किंवा संपादित करा

प्रश्न, हेडर किंवा वर्णन संपादित करण्यासाठी, तुम्हाला जो मजकूर बदलायचा आहे त्यावर क्लिक करा.

प्रश्न, इमेज किंवा विभाग हटवा

प्रश्न किंवा इमेज

  1. एका प्रश्नावर किंवा इमेजवर क्लिक करा.
  2. हटवा हटवा वर क्लिक करा.

विभाग

  1. विभाग शीर्षलेखावर क्लिक करा.
  2. अधिक आणखी वर क्लिक करा.
  3. विभाग हटवा वर क्लिक करा.
विभागाचा पुन्हा क्रम लावा
  1. तुमच्याकडे एकाहून जास्त विभाग असल्यास, तुम्ही क्रम बदलू शकता.
  2. कोणत्याही विभागाच्या सर्वात वर उजवीकडे, अधिक आणखी वर क्लिक करा.
  3. विभाग हलवा क्लिक करा.
  4. विभाग हलवण्यसाठी अप अप अ‍ॅरो किंवा डाउन Down arrow वर क्लिक करा.
कृती पहिल्यासारखी करा
  1. तुम्हाला एखादा नुकताच केलेला बदल पहिल्यासारखा करायचा असल्यास:
  2. तुमच्या फॉर्मच्या सर्वात वरती उजवीकडे, पहिल्यासारखे करा Undo वर क्लिक करा.

प्रश्न आणि उत्तरांचा रँडम क्रम लावा

तुम्ही फॉर्म भरणाऱ्या प्रत्येकासाठी प्रश्न आणि उत्तरांचा क्रम वेगवेगळा ठेवू शकता.

टिप: प्रश्न आणि उत्तरे प्रती ईमेल अॅड्रेस फक्त एकदा शफल केले जातील. प्रत्येक अॅड्रेस वेगवेगळा एंटर केलेला आहे आणि Google गटाला पाठवलेला नाही याची खात्री करा.

प्रश्नाचा क्रम शफल करा
महत्त्वाचे: तुमचे प्रश्न विशिष्ट क्रमाने दिसावेत असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही तुमचे प्रश्न शफल करू नका.
  1. फॉर्मच्या सर्वात वरती, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  2. “प्रेझेंटेशन” च्या बाजूला, डाउन अ‍ॅरो Down arrow वर क्लिक करा.
  3. “फॉर्म प्रेझेंटेशन” या अंतर्गत प्रश्नांचा क्रम शफल करा हे सुरू करा.
उत्तरांच्या निवडी शफल करा
तुम्ही उत्तरे एकाहून अधिक निवडी, चेकबॉक्स आणि ड्रॉप-डाउन प्रश्न यावर शफल करू शकता.
  1. तुम्हाला ज्या प्रश्नासाठीची उत्तरे शफल करायची आहेत त्यावर क्लिक करा.
  2. तळाशी उजवीकडे, अधिक आणखी वर क्लिक करा.
  3. पर्यायाचा क्रम शफल करा वर क्लिक करा.

प्रतिसादकर्त्यांसाठी ऑटोसेव्ह करणे बंद करा

प्रतिसादकर्त्याच्या शेवटच्या संपादनानंतर किंवा फॉर्म पूर्ण भरून होईपर्यंत यांपैकी जे आधी होईल त्यानुसार, फॉर्मना दिलेल्या प्रतिसादांचे मसुदे हे बाय डीफॉल्ट ३० दिवसांसाठी ऑटोसेव्ह केले जातात.

तुम्हाला पुढील प्रकारच्या फॉर्मसाठी ऑटोसेव्ह करणे बंद करावे लागू शकते:

  • रिपीट केलेल्या डेटा एंट्रीसाठी वापरले जाणारे फॉर्म
  • वेबसाइटमध्ये एम्बेड केलेले फॉर्म
  • शेअर केलेल्या डिव्हाइसवर नोंदणीसाठी किंवा साइन अप करण्यासाठीचे फॉर्म

ऑटोसेव्ह करणे सुरू किंवा बंद करण्यासाठी:

  1. क्विझच्या सर्वात वरती, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  2. “प्रेझेंटेशन” च्या बाजूला, डाउन अ‍ॅरो Down arrow वर क्लिक करा.
  3. सर्व प्रतिसादकर्त्यांसाठी ऑटोसेव्ह बंद करा हे सुरू किंवा बंद करा.

तुमच्या डीफॉल्ट सेटिंग्ज बदला

प्रत्येक नवीन फॉर्म बनवण्यासाठी समान सेटिंग्ज वापरा:

  1. Google Forms मध्‍ये, फॉर्म उघडा.
  2. क्विझच्या सर्वात वरती, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. "डीफॉल्ट" अंतर्गत, तुम्ही सुरू केलेले कोणतेही सेटिंग कोणत्याही नवीन फॉर्मसाठी डीफॉल्ट सेटिंग असेल.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13656467315102986822
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false