Google Slides कसे वापरायचे


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

तुम्ही Android साठी Google Slides ॲप वापरुन Google प्रेझेंटेशन तसेच Microsoft PowerPoint® फाइल तयार करू शकता, पाहू शकता किंवा संपादित करू शकता. तुम्हाला Google Slides ॲप वापरता यावे म्हणून मदतीसाठी खाली काही गोष्टी दिल्या आहेत:

पायरी १: Google Slides ॲप डाउनलोड करा

  1. Play Store उघडा.
  2. सर्वात वर असलेल्या शोध बारमध्ये Google Slides शोधा.
  3. इंस्‍टॉल करा वर टॅप करा. तुमच्या होम स्क्रीनवर Google Slides ॲप दिसेल.

दुसरी पायरी: प्रेझेंटेशन तयार करा, पहा किंवा संपादित करा

स्लाइड पहा आणि संपादित करा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Slides अ‍ॅपमध्ये प्रेझेंटेशन उघडा.
  2. स्लाइडमधून स्क्रोल करण्यासाठी वर आणि खाली स्‍वाइप करा. तुम्ही स्लाइडमध्ये झूम करण्यासाठी पिंचदेखील करू शकता.
  3. तुम्हाला पुढील गोष्टी करायच्या असल्यास:
    • स्लाइड संपादित करणे: स्लाइडवर टॅप करा आणि त्यानंतर स्लाइड संपादित करा. 
      • टीप: तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या स्लाइडवर तुम्ही दोनदा टॅपदेखील करू शकता.
    • टिप्पण्या पाहणे: स्लाइडवर टॅप करा आणि त्यानंतर टिप्पणी पहा.
    • टिप्पण्या जोडणे: स्लाइडवर टॅप करा आणि त्यानंतर टिप्पणी जोडा.

टीप: तुम्ही Google Slides अ‍ॅप वापरताना स्क्रोल आणि क्लिक करण्यासाठी तुमच्या Android डिव्हाइसशी माउसदेखील कनेक्ट करू शकता.

विविध फाइल फॉरमॅटमध्‍ये काम करणे

तुम्ही Android साठी Google Slides ॲप वापरुन फाइल अपलोड आणि डाउनलोड करू शकता.

  • इंपोर्ट करा: तुम्ही PPT, PPTX, आणि ODP फाइल उघडू आणि संपादित करू शकता.
  • एक्सपोर्ट करा: तुम्ही PPTX, PDF, TXT, आणि ODP फाइल म्हणून एक्सपोर्ट करू शकता. तुम्ही सध्याची स्लाइड JPEG, PNG, आणि SVG म्हणून एक्सपोर्ट करू शकता. 

पायरी ३: इतरांसोबत शेअर करा आणि काम करा

तुम्ही लोकांसोबत फाइल आणि फोल्डर शेअर करू शकता आणि ते त्या पाहू शकतात, संपादित करू शकता किंवा त्यावर टिप्पणी करू शकतात की नाही हे निवडू शकता.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3204420808789193573
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false