शेअर करणे थांबवणे, मर्यादा घालणे किंवा बदलणे


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

तुम्ही फाइल शेअर केल्यावर, तुम्ही ती शेअर करणे कधीही थांबवू शकता. तुम्ही तुमची फाइल शेअर केलेले लोक हे ती बदलू किंवा शेअर करू शकतात का हेदेखील तुम्ही नियंत्रित करू शकता.

टीप: तुम्ही माझे ड्राइव्ह वापरून शेअर केलेल्या फाइलसाठी परवानग्या अपडेट करता आणि तुम्ही ज्या व्यक्तीसोबत शेअर करता त्यांच्याकडे परवानग्या नसतात, तेव्हा तुम्ही यासाठी परवानग्या अपडेट करू शकता:

  • फाइलचा समावेश असलेले फोल्डर
  • फक्त फाइल

फाइल शेअर करणे थांबवा

महत्त्वाचे:

  • तुम्ही लोकांसोबत फाइल शेअर केल्यास, मालक किंवा संपादन अ‍ॅक्सेस असलेले कोणीही फाइलच्या शेअरिंग परवानग्या बदलू शकतात आणि ती शेअर करू शकतात.
  • तुम्हाला कोणीही तुमची फाइल सार्वजनिकरीत्या अ‍ॅक्सेस करायला नको असल्यास, फाइल प्रकाशित करणे थांबवणे हे करा.
फाइल किंवा फोल्‍डर शेअर करणे थांबवा
  1. Google Drive, Google Docs, Google Sheets किंवा Google Slides मध्ये फाइल किंवा फोल्डर शोधा.
  2. फाइल किंवा फोल्‍डर उघडा किंवा निवडा.
  3. शेअर करा किंवा शेअर करा शेअर करा वर क्लिक करा.
  4. तुम्हाला शेअर करणे थांबवायचे असलेली व्यक्ती शोधा.
  5. त्यांच्या नावाच्या उजवीकडे, डाउन अ‍ॅरो खाली आणि त्यानंतर अ‍ॅक्सेस काढून टाका वर क्लिक करा.
  6. सेव्ह करा वर क्लिक करा.
फाइल किंवा फोल्‍डरचा सामान्य अ‍ॅक्सेस मर्यादित करा

तुम्ही आयटमचा सामान्य अ‍ॅक्सेस हा प्रतिबंधित वर बदलता, तेव्हा फक्त अ‍ॅक्सेस असणारे लोक फाइल उघडू शकतात.

  1. फाइल आणि फोल्डर Google Drive, Google Docs, Google Sheets किंवा Google Slides मध्ये शोधा.
  2. फाइल किंवा फोल्‍डर उघडा अथवा निवडा.
  3. शेअर करा शेअर करा किंवा शेअर करा शेअर करा आणि त्यानंतर लिंक कॉपी करा  वर क्लिक करा.
  4. “सामान्य अ‍ॅक्सेस” या अंतर्गत,  डाउन अ‍ॅरो खाली वर क्लिक करा.
  5. प्रतिबंधित हे निवडा.
  6. पूर्ण झाले वर क्लिक करा.
शेअर केलेली फाइल हटवा

तुम्ही तुमच्या मालकीची शेअर केलेली फाइल हटवल्यास:

  • तुम्ही फाइल कायमची हटवेपर्यंत ती पाहू शकणार्‍या, टिप्पणी करू शकणार्‍या किंवा संपादित करू शकणार्‍या लोकांना तिची प्रत तयार करता येईल.
  • फाइल कायमची हटवण्यासाठी, तुमच्या कचर्‍यामध्ये फाइलवर क्लिक करा आणि कायमची हटवा Delete forever वर क्लिक करा. फाइल हटवण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्ही तुमच्या मालकीची नसलेली शेअर केलेली फाइल हटवल्यास:

  • फाइल तुमच्या Drive वरून काढली जाईल, परंतु इतर कोलॅबोरेटर तरीही ती अ‍ॅक्सेस करू शकतात.
  • फाइल परत मिळवण्यासाठी, फाइल आणि त्यानंतर फाइल आणि त्यानंतर फाइलची लिंक उघडा माझे ड्राइव्ह वर जोडा.

तुमच्या फाइल कशा शेअर केल्या जातात ते मर्यादित करा

लोकांना तुमची फाइल डाउनलोड, प्रिंट किंवा कॉपी करण्यापासून रोखा

तुमच्या फाइलचा संपादन अ‍ॅक्सेस असणारे लोक पुढील गोष्टी करू शकतात:

  • फाइल इतरांसोबत शेअर करणे.
  • फाइलमध्ये लोकांना जोडणे किंवा काढून टाकणे.
  • फाइलच्या अ‍ॅक्सेससंबंधित परवानग्या बदलणे.
  • फाइल कॉपी, प्रिंट किंवा डाउनलोड करणे.

महत्त्वाचेहे सेटिंग तुम्ही फोल्डरला लागू करू शकत नाही, पण तुम्ही ते फोल्डरमधील स्वतंत्र फाइलना लागू करू शकता.

दर्शक आणि टिप्पणी करणाऱ्या व्यक्ती यांना तुमची फाइल प्रिंट, कॉपी किंवा डाउनलोड करण्यापासून रोखण्यासाठी:

  1. फाइल आणि फोल्डर Google Drive, Google Docs, Google Sheets किंवा Google Slides मध्ये शोधा.
  2. तुम्हाला मर्यादित करायची असलेली एक किंवा अधिक फाइल निवडा.
  3. शेअर करा किंवा शेअर करा शेअर करा वर क्लिक करा.
  4. सर्वात वरती, सेटिंग्ज सेटिंग्ज वर क्लिक करा.
  5. दर्शक आणि टिप्पणी करणाऱ्या व्यक्ती या डाउनलोड, प्रिंट आणि कॉपी करण्याचे पर्याय पाहू शकतात या चौकटीतली खूण काढा.

महत्त्वाचे: Google Drive, Docs, Sheets, आणि Slides मध्ये लोक शेअर, प्रिंट, डाउनलोड आणि कॉपी कसे करू शकतात ते तुम्ही मर्यादित करू शकता, पण इतर लोक फाइल आशय इतर मार्गांनी कसा शेअर करतात ते तुम्ही थांबवू शकत नाही.

इतरांना तुमच्या फाइल शेअर करण्यापासून रोखा

तुम्ही फाइल शेअर करत असल्यास, मालक आणि संपादन अ‍ॅक्सेस असलेले कोणीही परवानग्या बदलू शकतात आणि फाइल शेअर करू शकतात. इतरांना तुमची फाइल शेअर करण्यापासून रोखण्यासाठी:

  1. फाइल Google Drive, Google Docs, Google Sheets किंवा Google Slides मध्ये उघडा.
  2. शेअर करा किंवा शेअर करा शेअर करा वर क्लिक करा.
  3. सर्वात वरती, सेटिंग्ज सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. संपादक परवानग्या बदलू शकतात आणि शेअर करू शकतात या चौकटीतली खूण काढा.

महत्त्वाचे: तुम्ही फोल्डर शेअर करणे रोखत असल्यास, ते फक्त फोल्डरला लागू होते. आतील फाइल शेअर करण्यापासून रोखण्यासाठी, तुम्हाला आतील फाइलसाठी हे सेटिंग बदलावे लागेल.

ऑफिस किंवा शाळेमार्फत असणाऱ्या Google खात्यांसाठी आणखी पर्याय

एखाद्याला मर्यादित वेळेसाठी फाइलच्या परवानग्या द्या

फाइलसाठी एक्स्पायरीची तारीख सेट करा

  1. फाइल Google Drive, Google Docs, Google Sheets किंवा Google Slides मध्ये उघडा.
  2. शेअर करावर क्लिक कराआणि त्यानंतर तुम्हाला ज्याला तात्पुरती परवानगी द्यायची आहे असा वापरकर्ता शोधा.
    • तुम्ही त्या व्यक्तीसोबत फाइल शेअर केली नसल्यास, वापरकर्त्याचा ईमेल जोडा आणि पाठवा किंवा शेअर करा वर क्लिक करा. दस्तऐवजाच्या सर्वात वरती उजवीकडे, शेअर करा  वर पुन्हा क्लिक करा.
  3. व्यक्तीच्या नावाशेजारी, डाउन अ‍ॅरो खाली आणि त्यानंतर एक्स्पायरेशन जोडा वर क्लिक करा.
  4. "अ‍ॅक्सेस एक्स्पायर होईल" च्या बाजूला, एक्स्पायरीची तारीख सेट करण्यासाठी तारखेवर क्लिक करा. सध्याच्या तारखेच्या एक वर्षाच्या आतील तारीख निवडा.
  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

Google Forms ची शेअर सेटिंग्ज बदला

Google Forms मध्ये इतर प्रकारच्या फाइलपेक्षा वेगळे शेअरिंग पर्याय आहेत.

संबंधित लेख

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12862677097731498257
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false