तुमच्या फाइलचा मालक इतर कुणालातरी बनवा


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

तुम्ही Google Drive वर तयार केलेल्या किंवा अपलोड केलेल्या फाइल या तुमच्या मालकीच्या असतात. तुम्ही तुमच्या मालकीच्या फाइल आणि फोल्डरची मालकी दुसऱ्या खात्याकडे ट्रान्सफर करू शकता.

तुम्ही मालकी ट्रान्सफर करण्यापूर्वी

तुम्ही तुमचे Google खाते ऑफिस किंवा शाळेसाठी वापरत असल्यास:

  • तुम्ही फक्त तुमच्या संस्थेतील एखाद्या व्यक्तीकडे फाइल आणि फोल्डरची मालकी ट्रान्सफर करू शकता.
  • नवीन मालकाने ट्रान्सफर स्वीकारण्याची आवश्यकता नाही.

तुम्ही मालकी ट्रान्सफर केल्यानंतर

तुम्ही मालकीच्या ट्रान्सफरची विनंती केल्यावर:

  • मालकी प्रलंबित असलेल्या व्यक्तीला ईमेलद्वारे सूचित केले जाते, की त्यांनी ट्रान्सफरची विनंती स्वीकारल्यास, ते फाइलचे मालक बनतील. तोपर्यंत, तुम्हीच मालक राहता.
  • मालकी प्रलंबित असलेली व्यक्ती आधीपासून संपादक नसल्यास, त्यांना संपादक म्हणून अपग्रेड केले जाते.
  • मालकी प्रलंबित असलेल्या व्यक्तीने विनंती स्वीकारल्यास, तुम्हाला संपादक यावरून डाउनग्रेड केले जाते. नवीन मालक तुम्हाला काढून टाकू शकतो.
  • मालकी प्रलंबित असलेल्या व्यक्तीने नकार दिल्यास, तुम्हीच मालक राहता.

Google Drive मध्ये मालक बदलणे

महत्त्वाचे: तुम्ही आधी ज्यांच्यासोबत फाइल शेअर केली आहे त्यांना फाइलची मालकी ट्रान्सफर करू शकता. Google Drive मधून फाइल शेअर करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

  1. तुमच्‍या काँप्युटरवर, Google Drive उघडा.
  2. तुम्हाला ट्रान्सफर करायची असलेली फाइल शोधा त्यानंतर राइट-क्लिक करा.
  3. शेअर करा वर क्लिक करा > शेअर करा शेअर करा वर क्लिक करा.
  4. मिळवणाऱ्याच्या नावाच्या बाजूला, डाउन अ‍ॅरो डाउन अ‍ॅरो आणि त्यानंतर मालकी ट्रान्सफर करा वर क्लिक करा.

Docs, Sheets किंवा Slides च्या फाइलमध्ये मालक बदलणे

महत्त्वाचे:  तुम्ही आधी ज्यांच्यासोबत फाइल शेअर केली आहे त्यांना फाइलची मालकी ट्रान्सफर करू शकता. Google Drive मधून फाइल शेअर करण्याबद्दल अधिक जाणून घ्या

Google Docs, Sheets किंवा Slides यांमध्ये फाइलची मालकी ट्रान्सफर करण्यासाठी:

  1. तुमच्‍या काँप्युटरवर, Google Drive उघडा.
  2. Google Docs, Sheets किंवा Slides ची फाइल उघडा.
  3. सर्वात वरती उजवीकडील कोपऱ्यात, शेअर करा वर क्लिक करा.
  4. मिळवणाऱ्याच्या नावाच्या बाजूला, डाउन अ‍ॅरो खाली आणि त्यानंतर मालकी ट्रान्सफर करा वर क्लिक करा.

ट्रान्सफर रद्द करणे

महत्त्वाचे: नवीन मालकाने विनंती स्वीकारल्यानंतर तुम्ही ट्रान्सफर रद्द करू शकत नाही. 

Google Docs, Sheets किंवा Slides यांमध्ये फाइलची मालकी ट्रान्सफर करणे रद्द करण्यासाठी:

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, फाइल उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडील कोपऱ्यात, शेअर करा वर क्लिक करा.
  3. मिळवणाऱ्याच्या नावाच्या बाजूला, डाउन अ‍ॅरोखाली आणि त्यानंतर मालकी ट्रान्सफर करणे रद्द करा वर क्लिक करा.

मालकीच्या ट्रान्सफरची विनंती स्वीकारणे किंवा नाकारणे

एखादी व्यक्ती फाइल ट्रान्सफर करण्याची विनंती करते तेव्हा, तुम्हाला ईमेल मिळतो. तुम्ही आमंत्रण स्वीकारू किंवा नाकारू शकता. मालकीच्या ट्रान्सफरच्या विनंतीसंबंधी प्रतिसाद प्रलंबित असलेल्या फाइल तुम्ही Drive मध्येदेखील शोधू शकता.

  1. Google Drive उघडा.
  2. सर्वात वरती शोध बारमध्ये, pendingowner:me एंटर करा.
  3. तुम्हाला ज्या फाइलला/ना प्रतिसाद द्यायचा आहे त्यावर राइट क्लिक करा.
  4. शेअर करा शेअर करा आणि त्यानंतर मालकी स्वीकारायची आहे का? वर क्लिक करा आणि त्यानंतर स्वीकारा किंवा नकार द्या.

महत्त्वाचे:

  • मालकी प्रलंबित असलेली व्यक्ती तुमची विनंती स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्ही फाइलचे मालक राहता. ट्रान्सफर केल्यानंतर, तुमची परवानगी बदलेपर्यंत तुम्ही फाइल संपादित करू शकता.
  • तुम्ही तुमच्या वैयक्तिक Google खात्यामधून एखाद्या व्यक्तीच्या ऑफिस किंवा शाळेच्या खात्यावर फाइल ट्रान्सफर करू शकत नाही.
  • तुम्ही एखाद्या वैयक्तिक खात्यावर मालकीच्या ट्रान्सफरची विनंती पाठवल्यास आणि ते खाते ऑफिस किंवा शाळेचे खाते बनल्यास, मालकी प्रलंबित असलेली व्यक्ती विनंती स्वीकारू शकत नाही.
  • तुम्ही मालकीच्या ट्रान्सफरची विनंती पाठवल्यास आणि तुमचे वैयक्तिक खाते हे ऑफिस किंवा शाळेचे खाते बनल्यास, मालकी प्रलंबित असलेली व्यक्ती विनंती स्वीकारू शकत नाही.
  • तुम्ही विनंती रद्द करू शकता.
  • मालकी प्रलंबित असलेली व्यक्ती विनंती नाकारू शकते.
  • तुम्ही फाइलची मालकी ट्रान्सफर करता, तेव्हा ती यापुढे माझे ड्राइव्ह मध्ये नसते आणि ती तुमच्या स्टोरेजमध्ये मोजली जात नाही. ती नवीन मालकाच्या स्टोरेजमध्ये मोजली जाईल.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7510770718086701908
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false