फाइलमधील निनावी किंवा अपरिचित लोक

तुमच्या ओळखीचे नसलेले नाव किंवा "निनावी प्राणी" तुमचे दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा सादरीकरण पाहत आहेत असे तुम्हाला दिसू शकते. दस्तऐवज सार्वजनिकरीत्या किंवा लिंक असलेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर केल्यावर असे होऊ शकते.

तुम्ही ओळखत नाही अशी एखादी व्यक्ती तुम्हाला दिसल्यास

तुम्ही ओळखत नाही अशी एखादी व्यक्ती तुमची फाइल पाहत असू शकते कारण:

  • फाइल मेलिंग सूचीसोबत शेअर केली गेली आहे.
  • Google खाते नसलेल्या किंवा साइन इन न केलेल्या एखाद्या व्यक्तीसोबत फाइल शेअर केली गेली आहे.
  • तुमची फाइल संपादित करू शकणार्‍या किंवा लिंक असलेल्या एखाद्या व्यक्तीने ती इतर लोकांसोबत शेअर केली आहे.
  • एखाद्या व्यक्तीने त्यांचे Google खाते नाव बदलले आहे. तुमच्या फाइलमध्ये शेअर करा आणि त्यानंतर प्रगत वर क्लिक केल्यावर तुम्हाला त्यांचा ईमेल अ‍ॅड्रेस दिसू शकतो.

लोक तुमची फाइल कशी पाहू शकतात ते मर्यादित करा

तुम्ही संपादित करू शकत असलेली फाइल शेअर करणे तुम्हाला थांबवायचे असल्यास, हे कसे करायचे ते तुम्ही जाणून घेऊ शकता:

"निनावी प्राणी"

तुम्ही लिंक असलेली फाइल शेअर केल्यास किंवा उघडल्यास, तुम्हाला ती पाहणार्‍या लोकांची नावे कदाचित दिसणार नाहीत.

  • तुम्ही स्वतंत्रपणे आमंत्रित न केलेले लोक ते फाइलमध्ये असल्यावर निनावी प्राणी म्हणून दर्शवले जातील.
  • तुम्ही स्वतंत्रपणे आमंत्रित केलेले लोक ते फाइलमध्ये असल्यावर नावानुसार दर्शवले जातील.

तुम्ही इतर लोकांना फाइल पाहण्याची स्वतंत्र परवानगी दिल्यास किंवा ते मेलिंग सूचीचा भाग असल्यास तुम्ही इतर लोकांची फक्त नावे पाहू शकता.

खाजगी फाइलमधील निनावी प्राणी

तुम्ही लिंक शेअरिंग बंद केले तरीही, तुम्हाला कदाचित एकाहून अधिक निनावी प्राणी दिसू शकतात:

  • एखाद्या व्यक्तीने फाइल एकाहून अधिक वेळा उघडल्यास. यापुढे न पाहणारे लोक अदृश्य होण्यासाठी काही वेळ लागू शकतो.
  • एखाद्या व्यक्तीने मेसेंजर सेवेमार्फत लिंक उघडल्यास. काही सेवा फिशिंग, व्हायरस हल्ले किंवा मालवेअर यासाठी लिंकची तपासणी करतील.
  • एखाद्या व्यक्तीने ब्राउझर एक्स्टेंशन किंवा लिंक आपोआप फॉलो करणारे स्क्रिप्ट वापरल्यास.
कार्यालय किंवा शाळेसाठी निनावी प्राणी आणि Google अ‍ॅप

तुम्ही कार्यालय किंवा शाळेमार्फत Google अ‍ॅप वापरत असल्यास, तुमच्या डोमेनमधील लोक तुमची फाइल पाहत असताना त्यांची नावे नेहमी दाखवली जातील.

तुमचा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर तुम्हाला तुमच्या डोमेनबाहेर फाइल शेअर करू देत असल्यास, साइन इन न केलेले लोक निनावी प्राणी म्हणून दिसतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11330860340648865147
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false