Google Drive वरून फाइल शेअर करणे

तुम्ही Google Drive मध्ये स्टोअर केलेल्या फायली आणि फोल्डर कोणाहीसोबत शेअर करू शकता.

तुम्ही Google Drive वरून शेअर करता, तेव्हा लोक फाइल संपादित करू शकतात, त्यावर टिप्पणी करू शकतात किंवा फक्त पाहू शकतात हे तुम्ही नियंत्रित करू शकता. तुम्ही Google Drive वरून आशय शेअर करता, तेव्हा Google Drive प्रोग्राम धोरणे लागू होतात.

पायरी १: तुम्हाला शेअर करायची असलेली फाइल निवडा

एकच फाइल शेअर करणे

टीप: तुमच्याकडे खुला दस्तऐवज शेअर करण्याची प्रलंबित विनंती असल्यास, सर्वात वरती उजवीकडे तुम्हाला शेअर करा शेअर करा च्या बाजूला बिंदू दिसेल.

  1. काँप्युटरवर, Google Drive, Docs, Sheets किंवा Slides वर जा.
  2. तुम्हाला शेअर करायच्या असलेल्या फाइलवर क्लिक करा.
  3. शेअर करा शेअर करा वर क्लिक करा.
एकाहून अधिक फाइल शेअर करणे
  1. काँप्युटरवर, drive.google.com वर जा.
  2. तुमच्या कीबोर्डवर, Shift धरून ठेवा आणि दोन किंवा जास्त फायली निवडा.
  3. सर्वात वर उजवीकडे, शेअर करा शेअर करा वर क्लिक करा.

फोल्डरमध्ये फाइल कशा जोडायच्या आणि पूर्ण फोल्डर कसे शेअर करायचे ते जाणून घ्या.

Google Forms पाठवणे आणि शेअर करणे

पायरी २: कोणासोबत शेअर करायचे आणि ते तुमची फाइल कशी वापरू शकतात ते निवडा

विशिष्ट लोकांसोबत शेअर करणे
महत्त्वाचे: तुम्ही ऑफिस किंवा शाळेमार्फत Google खाते वापरल्यास, तुम्हाला तुमच्या संस्थेच्या बाहेर कदाचित फाइल शेअर करता येणार नाहीत.
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Drive वर जा.
  2. तुम्हाला शेअर करायची असलेली फाइल निवडा आणि त्यानंतर शेअर करा मंजुरी देणारी व्यक्ती जोडा .
  3. तुम्हाला ज्यांच्यासोबत शेअर करायचे आहे तो ईमेल ॲड्रेस एंटर करा. तुम्ही ऑफिस किंवा शाळा खाते वापरत असल्यास, सुचवलेल्या मिळवणाऱ्यांसोबत तुम्ही शेअर करू शकता.
    • टीप: सुचवलेले मिळवणारे बंद करण्यासाठी, तुमच्या Drive सेटिंग्ज सेटिंग्ज वर जा. "शेअरिंग डायलॉगमध्ये सुचवलेले मिळवणारे दाखवा" चौकटीतली खूण काढा.
  4. लोक तुमची फाइल कशी वापरू शकतात ते ठरवा. एक निवडा:
    • दर्शक
    • टिप्पणी करणारी व्यक्ती
    • संपादक
  5. तुम्ही पात्र असलेले ऑफिस किंवा शाळेचे खाते वापरल्यास, एक्स्पायरीची तारीख जोडणेयासाठी एक्स्पायरेशन जोडा वर क्लिक करा.
  6. तुम्ही तुमची फाइल शेअर करता, तेव्हा प्रत्येक ईमेल ॲड्रेसला ईमेल मिळतो.
    • पर्यायी: तुमच्या सूचना ईमेलमध्ये मेसेज जोडा.
    • तुम्हाला लोकांना सूचित करायचे नसल्यास, चौकटीतली खूण काढा.
  7. पाठवा किंवा शेअर करा वर क्लिक करा.

टीप: तुम्ही माझे ड्राइव्ह वापरून शेअर केलेल्या फाइलसाठी परवानग्या अपडेट करता आणि तुम्ही ज्या व्यक्तीसोबत शेअर करता त्यांच्याकडे परवानग्या नसतात, तेव्हा तुम्ही यासाठी परवानग्या अपडेट करू शकता:

  • फाइलचा समावेश असलेले फोल्डर
  • फक्त फाइल
विशिष्ट लोक असलेल्या गटासोबत शेअर करणे

Google ग्रुप सोबत शेअर करा

तुम्ही विशिष्ट लोकांऐवजी Google Groups सोबत फाइल शेअर करू शकता. तुम्ही पुढील गोष्टी केल्यास:

  • गटामध्ये सदस्य जोडणे: त्या व्यक्तीला गटामधील फाइल आणि फोल्डर ॲक्सेस करण्याची परवानगी मिळते.
  • गटामधून सदस्याला काढून टाकल्यास: ती व्यक्ती गटामधील फाइल आणि फोल्डर ॲक्सेस करण्याची परवानगी गमावते.

तुमच्या Google ग्रुप सोबत फाइल शेअर करण्यासाठी:

  1. Google ग्रुप तयार करणे.
  2. तुमच्या गटामध्ये सदस्य जोडणे.
  3. तुमच्या गटासोबत फाइल शेअर करा.

टीप: ती फाइल "माझ्यासोबत शेअर केली" फोल्डरमध्ये दिसण्याआधी, तुम्ही ती फाइल आमंत्रण किंवा लिंकमधून उघडणे आवश्यक आहे. 

Chat स्पेससह शेअर करा

Chat स्पेससह फाइल शेअर करण्यासाठी, तुम्हाला शेअर करायची असलेली फाइल तुम्ही त्या Chat स्पेसमध्ये जोडू शकता.

Chat स्पेसवर Drive फाइल जोडण्यासाठी:

पर्याय पहिला: 

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Chat वर जा.
  2. तुम्हाला फाइल ज्या Chat स्पेससोबत शेअर करायची आहे ती निवडा.
  3. तळाशी डावीकडे, इंटिग्रेशन मेनू > Drive  वर क्लिक करा.
  4. तुम्हाला Chat स्पेससोबत शेअर करायची असलेली फाइल निवडा.
  5. घाला वर क्लिक करा.

पर्याय दुसरा: 

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Drive वर जा.
  2. तुम्हाला Chat स्पेससोबत शेअर करायच्या असलेलया फाइलवर राइट-क्लिक करा.
  3. शेअर करा  > लिंक कॉपी करा  वर क्लिक करा.
  4. Google Chat वर जा.
  5. तुम्हाला फाइल ज्यांच्यासोबत शेअर करायची आहे ती Chat स्पेस निवडा. 
  6. मेसेज फील्डमध्ये, तुम्ही कॉपी केलेली लिंक पेस्ट करा.

टिपा:

  • तुम्ही Chat स्पेसमध्ये फाइल पाठवता, तेव्हा ॲक्सेस देण्याची सूचना दिसते.
    • तुम्ही त्या Chat स्पेसचा ॲक्सेस दिल्यास, स्पेसमध्ये नंतर सामील होणाऱ्या लोकांनादेखील शेअर केलेल्या फाइलचा ॲक्सेस मिळतो.
  • लोक Chat स्पेसमधून बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्याकडे शेअरिंग ॲक्सेस नसल्यास, त्या Chat स्पेसमधील फाइलचा ॲक्सेस ते गमावतात:
    • व्यक्ती म्हणून
    • दुसऱ्या गटातील सदस्य म्हणून
  • फाइलचा ॲक्सेस देण्यासाठी, तुमच्याकडे शेअर करायच्या असलेल्या फाइलचा संपादन ॲक्सेस असणे आवश्यक आहे. 

इतर लोक फाइल कशा पाहतात, त्यावर टिप्पणी कशी करतात किंवा त्या कशा संपादित करतात याबद्दल अधिक जाणून घ्या.

मीटिंगमधील उपस्थितीतांसोबत शेअर करणे

तुम्ही फाइलचे मालक किंवा संपादक असल्यास, मीटिंगमधील उपस्थितीतांसोबत फाइल शेअर करू शकता:

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Drive वर जा.

  2. तुम्हाला शेअर करायची असलेली फाइल निवडा.
  3. तुम्हाला ज्या मीटिंगमध्ये ती शेअर करायची आहे, तिचे नाव एंटर करा.
  4. लोक तुमची फाइल कशी वापरू शकतात हे ठरवा. एक निवडा:
    • दर्शक
    • टिप्पणी करणारी व्यक्ती
    • संपादक
  5. मीटिंगच्या आमंत्रणामध्ये फाइल अटॅच केली आहे का हे निवडा. 
  6. तुम्ही तुमची फाइल शेअर करता, तेव्हा प्रत्येक ईमेल ॲड्रेसला ईमेल मिळतो.
    • पर्यायी: तुमच्या सूचना ईमेलमध्ये मेसेज जोडा.
    • तुम्हाला लोकांना सूचित करायचे नसल्यास, चौकटीतली खूण काढा.
  7. पाठवा किंवा शेअर करा वर क्लिक करा.
एक्स्पायरीची तारीख जोडणे

एक्स्पायरीची तारीख हे वैशिष्ट्य फक्त ऑफिस किंवा शाळेची पात्र खाती यांच्यासाठी उपलब्ध आहे.

तुम्ही सध्या साइन इन केलेले नाही.

तुमच्या ऑफिस किंवा शाळा खात्यामध्ये साइन इन करणे

फाइलच्या सामान्य अ‍ॅक्सेसला अनुमती द्या

तुमची फाइल ही सर्वांसाठी उपलब्ध आहे किंवा ॲक्सेस असणाऱ्या काही मर्यादित लोकांसाठी उपलब्ध आहे हे तुम्ही निवडू शकता. तुम्ही लिंक असलेल्या सर्वांना ॲक्सेसची अनुमती दिल्यास, तुमचे फोल्डर ते कोण ॲक्सेस करू शकते हे प्रतिबंधित करणार नाही.

  1. तुम्हाला शेअर करायची असलेली फाइल निवडा.
  2. शेअर करा किंवा शेअर करा शेअर करा वर क्लिक करा.
  3. “सामान्य ॲक्सेस” अंतर्गत, डाउन ॲरो खाली वर क्लिक करा.
  4. फाइल कोण ॲक्सेस करू शकते ते निवडा.

  1. तुमच्या फाइलबद्दल लोकांची भूमिका काय असेल हे ठरवण्यासाठी, दर्शक, टिप्पणी करणारी व्यक्ती किंवा संपादक निवडा.
  2. पूर्ण झाले वर क्लिक करा.
फाइल सार्वजनिकरीत्या शेअर करणे
  1. तुम्हाला शेअर करायची असलेली फाइल निवडा.
  2. शेअर करा किंवा शेअर करा शेअर करा वर क्लिक करा.
  3. “सामान्य ॲक्सेस” अंतर्गत, डाउन ॲरो खाली वर क्लिक करा.
  4. लिंक असलेले कोणीही निवडा.
  5. लोकांची भूमिका काय असेल हे ठरवण्यासाठी, दर्शकटिप्पणी करणारी व्यक्ती किंवा संपादक निवडा.
  6. लिंक कॉपी करा वर क्लिक करा.
  7. पूर्ण झाले वर क्लिक करा.
  8. लिंक ईमेलमध्ये किंवा तुम्हाला ती शेअर करायच्या असलेल्या कोणत्याही जागी पेस्ट करा.

Google खात्यामध्ये साइन इन न केलेले लोक तुमच्या फाइलमध्ये निनावी प्राणी म्हणून दिसतातनिनावी प्राण्यांबद्दल अधिक जाणून घ्या.

फाइल अनेक लोकांसोबत शेअर करणे आणि तिच्यावर सहयोग करणे

महत्त्वाचे:

  • कोणत्याही वेळी, Google Docs, Sheets किंवा Slides फाइल फक्त १०० उघडे टॅब किंवा डिव्हाइसवर संपादित केली जाऊ शकते. फाइल उघडण्याची १०० हून अधिक प्रसंग असल्यास, फक्त मालक आणि संपादनाशी संबंधित परवानग्या असलेले काही वापरकर्ते फाइल संपादित करू शकतात.
  • एक फाइल कमाल ६०० स्वतंत्र ईमेल अ‍ॅड्रेससोबतच शेअर केली जाऊ शकते.

अनेक प्रेक्षकांसोबत फाइल शेअर करण्यासाठी आणि तिच्यावर सहयोग करण्यासाठी:

फाइल प्रकाशित करा

Google साइट तयार करणे

तुमच्या साइट कोलॅबोरेटरसह फाइल शेअर करणे

  • साइटमध्ये एंबेड केलेल्या फाइल सर्व साइट कोलॅबोरेटर आणि दर्शक यांच्यासाठी अ‍ॅक्सेस करण्यायोग्य असल्याची खात्री करण्यासाठी, तुम्ही साइट प्रकाशित करता, तेव्हा त्यांच्यासोबत फाइलचा अ‍ॅक्सेस शेअर करणे आवश्यक आहे. तुम्ही फाइल एंबेड करता, साइट प्रकाशित किंवा शेअर करता, तेव्हा तुम्ही शेअरिंग परवानग्या अपडेट करू शकता.

Google Forms सह फीडबॅक गोळा करणे

  • तुम्हाला बरीच माहिती गोळा करायची असल्यास, Google Form तयार करा. प्रतिसाद Google Sheet मध्ये रेकॉर्ड केले जातील. ज्या लोकांना प्रतिसादांसोबत काम करण्याची आवश्यकता आहे त्यांनाच संपादन अ‍ॅक्सेस द्या. १०० हून जास्त लोकांना प्रतिसाद उघडू देण्यासाठी, वेबवर स्प्रेडशीट प्रकाशित करा आणि अ‍ॅक्सेस असलेल्या लोकांसह शेअर करण्यासाठी लिंक तयार करा. फाइल कशी प्रकाशित करावी हे जाणून घ्या.

अनेक लोकांसोबत शेअर केलेल्या दस्तऐवजांमधील समस्यांचे निराकरण करणे

तुमचा दस्तऐवज अनेक लोकांसोबत शेअर केलेला असल्यास आणि तो क्रॅश होत असल्यास किंवा त्वरित अपडेट होत नसल्यास, या ट्रबलशूटिंग टिपा वापरून पहा:

  • लोकांना दस्तऐवजावर किंवा स्प्रेडशीटवर टिप्पणी करू देण्याऐवजी, फीडबॅक गोळा करण्यासाठी Google Form तयार करा. Google Form कसा तयार करावा हे जाणून घ्या.
  • तुम्ही दस्तऐवजाची कॉपी तयार करत असल्यास, निराकरण केलेल्या टिप्पण्या आणि सूचना समाविष्ट करू नका. कॉपी कशी तयार करावी हे जाणून घ्या.
  • जुनी माहिती हटवा किंवा डेटा नवीन दस्तऐवजामध्ये हलवा.
  • अ‍ॅक्सेस असलेल्या लोकांना दस्तऐवज वापरत नसताना तो बंद करण्यास सांगा.
  • प्रकाशित केलेल्या दस्तऐवजामध्ये फक्त सर्वात महत्त्वाची माहिती समाविष्ट करा. लहान दस्तऐवज आणखी जलद लोड होतात.
  • दस्तऐवजाचा संपादन अ‍ॅक्सेस असलेल्या लोकांचे प्रमाण कमी करा.
  • एकाहून अधिक दस्तऐवजांमधून माहिती गोळा करत असल्यास, मोठ्या संख्येतील लोकांसह शेअर करण्यासाठी नवीन, अ‍ॅक्सेस-ओन्ली दस्तऐवज तयार करा.

फाइल कशी शेअर केली जाते हे मर्यादित करणे

लोक पाहू, टिप्पणी करू किंवा संपादित करू शकतात का ते निवडा

तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत फाइल शेअर करता, तेव्हा तुम्ही तिची अ‍ॅक्सेस पातळी निवडू शकता:

  • दर्शक: लोक फाइल अ‍ॅक्सेस करू शकतात, पण त्यात बदल करू शकत नाहीत किंवा इतरांसोबत ती शेअर करू शकत नाही.
  • टिप्पणी करणारी व्यक्ती: लोक टिप्पणी आणि सूचना करू शकतात, परंतु फाइलमध्ये बदल करू शकत नाहीत किंवा इतरांसोबत ती शेअर करू शकत नाही.
  • संपादक: लोक बदल करू शकतात, सूचना स्वीकारू किंवा नाकारू शकतात आणि फाइल इतरांसोबत शेअर करू शकतात.
तुमच्या फाइलचा सामान्य अ‍ॅक्सेस बदला

तुम्ही तुमच्या फाइलच्या व्यापक अ‍ॅक्सेसची अनुमती देऊ शकता. तुमचे Google खाते ऑफिस, शाळा किंवा Gmail मार्फत आहे का यावर हे पर्याय अवलंबून आहेत.

  • सार्वजनिक: कोणतीही व्यक्ती त्यांच्या Google खाते मध्ये साइन इन न करता तुमची फाइल Google वर शोधू शकते आणि तिचा अ‍ॅक्सेस मिळवू शकते.
  • लिंक असलेली कोणतीही व्यक्ती: लिंक असलेली कोणतीही व्यक्ती त्यांच्या Google खाते मध्ये साइन इन न करता तुमची फाइल वापरू शकते.
  • मर्यादित: फक्त अ‍ॅक्सेस असलेले लोक फाइल उघडू शकतात.

संबंधित लेख

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7243943747617202057
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false