फाइलमध्‍ये काय बदलले ते शोधा

तुम्‍ही Google Docs, Sheets किंवा Slides मध्‍ये दस्‍तऐवजात काय बदल केले आहेत ते पाहू शकता.

फाइलच्‍या आधीच्या आवृत्‍यांची तुलना करा

टीप: दस्‍तऐवजाचा आवृत्‍ती इतिहास ब्राउझ करण्‍यासाठी, दस्‍तऐवज संपादित करण्‍यासाठी तुम्‍हाला परवानगी लागेल.

 1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, दस्‍तऐवज, स्‍प्रेडशीट किंवा सादरीकरण उघडा.

 1. वर, फाइल आणि त्यानंतरआवृत्‍ती इतिहास आणि त्यानंतर आवृत्‍ती इतिहास पहा.

 2. उजव्‍या पॅनेलमध्‍ये, आधीची आवृत्‍ती निवडा. फाइल कोणी संपादित केली व त्‍यांनी केलेले बदल त्‍यांच्‍या नावाच्‍या पुढे रंगात तुम्‍ही शोधू शकता.

 3. (पर्यायी) आवृत्‍तीला नाव देण्‍यासाठी, आणखी अधिक आणि त्यानंतर या आवृत्‍तीला नाव द्या यावर क्लिक करा.

  • तुम्‍ही प्रति रेखांकन, दस्‍तऐवज किंवा सादरीकरणत ४० पर्यंत नावे दिलेल्‍या आवृत्‍त्‍या जोडू शकता.

  • तुम्‍ही प्रति स्‍प्रेडशीट १५ पर्यंत नावे दिलेल्‍या आवृत्‍त्‍या जोडू शकता.

 4. (पर्यायी) अधिक तपशिलवार गटबद्ध आवृत्‍त्‍या पाहण्‍यासाठी:

  • उजव्‍या पॅनेलमध्‍ये, आवृत्‍ती निवडा, नंतर तपशिलवार आवृत्‍त्‍या विस्‍तृत करा वर क्लिक करा .

वर्तमान आवृत्‍तीवर परत जाण्‍यासाठी, अगदी डावीकडे जा आणि मागे जा वर क्लिक करा .

Google Sheets मध्‍ये विशिष्‍ट सेल कुणी बदलली ते पहा
 1. तुमच्‍या काँप्युटरवर, sheets.google.com वर स्‍प्रेडशीट उघडा. 
 2. सेलवर उजवीकडे क्लिक करा आणि त्यानंतर संपादन इतिहास दाखवा

टीप: काही बदल संपादन इतिहासात कदाचित दिसणार . काही उदाहरणे: 

 • जोडलेल्‍या किंवा हटवलेल्‍या पंक्‍ती आणि स्‍तंभ 
 • सेलच्‍या फॉरमॅटमधील बदल 
 • सूत्रांमधील बदल

आधीची आवृत्‍ती रिस्‍टोअर करा

 1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, दस्‍तऐवज, स्‍प्रेडशीट किंवा सादरीकरण उघडा.

 2. वर, फाइल आणि त्यानंतर आवृत्‍ती इतिहास आणि त्यानंतरआवृत्‍ती इतिहास पहा वर क्लिक करा.

 3. उजव्‍या पॅनेलमध्‍ये, आधीची आवृत्‍ती निवडा.

 4. वर, ही आवृत्‍ती रिस्‍टोअर करा आणि त्यानंतररिस्‍टोअर करा यावर क्लिक करा.

आधीच्‍या आवृत्‍तीची प्रत बनवा

तुम्‍ही फाइलची प्रत बनवू शकता आणि आधीच्‍या आवृत्‍त्‍या संपादित करू शकता.

 1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, दस्‍तऐवज, स्‍प्रेडशीट किंवा सादरीकरण उघडा.

 2. वर, फाइल आणि त्यानंतर आवृत्‍ती इतिहास आणि त्यानंतरआवृत्‍ती इतिहास पहा यावर क्लिक करा.

 3. उजव्‍या पॅनेलमध्‍ये, तुम्‍हाला प्रत तयार करायच्‍या असलेल्या आवृत्‍तीच्‍या पुढे, आणखी अधिक आणि त्यानंतरप्रत बनवा यावर क्लिक करा.

 4. तुमच्‍या प्रतीचे नाव एंटर करा.

 5. फाइल कुठे सेव्‍ह करायची ते निवडा.

  • त्‍याच लोकांसोबत फाइल शेअर करण्‍यासाठी, त्‍याच लोकांसोबत ती शेअर करा वर क्लिक करा.

 6. ठीक आहे वर क्लिक करा.

तुमच्‍या फाइलची मागील आवृत्‍ती पाहता आली नाही?

तुमच्या फाइलसाठी पुनरावृत्ती ही स्टोरेज जागा सेव्ह करण्यासाठी कधीकधी विलीन केली जाऊ शकते.

टीप: तुमच्‍याजवळ फाइल संपादित करण्‍याची परवानगी नसल्‍यास, तुम्‍ही आवृत्‍ती इतिहास पाहू शकणार नाही.

संबंधित लेख

हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?