सेलमध्‍ये ड्रॉपडाउन सूची तयार करा

Google Sheets सह सेलमध्‍ये ड्रॉप-डाउन सूची तयार करा.

ड्रॉपडाउन सूची तयार करा

  1. Google Sheets मध्ये, स्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्‍हाला ड्रॉपडाउन सूची कुठे तयार करायची आहे तो/ते सेल निवडा.
  3. पर्याय निवडा:
    • “@” एंटर करा. मेनूमध्ये, घटक विभाग या अंतर्गत, “ड्रॉपडाउन" वर क्लिक करा.
      • टीप: तुम्ही "प्रोजेक्ट स्टेटस" किंवा "प्राधान्य" यांसारख्या यूझ केससाठी प्रीसेट ड्रॉपडाउनदेखील घालू शकता.
    • सर्वात वरती, घाला आणि त्यानंतर ड्रॉपडाउन वर क्लिक करा.
    • डेटा आणि त्यानंतर डेटा व्हॅलिडेशन आणि त्यानंतर नियम जोडा वर क्लिक करा.
    • सेलवर राइट क्लिक करा आणि त्यानंतर ड्रॉपडाउन वर क्लिक करा.
  4. डेटा व्हॅलिडेशनच्या नियमांच्या पॅनलवर, "निकष" अंतर्गत, पर्याय निवडा:
    • रेंजमधून ड्रॉपडाउन: सूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी सेल निवडा.
    • ड्रॉपडाउन: ड्रॉपडाउन मूल्य एंटर करा.
      • अतिरिक्त ड्रॉपडाउन मूल्ये जोडण्यासाठी, दुसरा आयटम जोडा वर क्लिक करा.
  5. पर्यायी: तुम्ही सूचीमधील आयटमशी जुळत नसलेल्या सेलमध्ये डेटा एंटर केल्यास, तो नाकारला जातो. तुम्हाला लोकांनी सूचीमध्ये नसलेले आयटम एंटर करायला हवे असल्यास:
    1. प्रगत पर्याय यांवर क्लिक करा.
    2. "डेटा चुकीचा असल्यास:" या अंतर्गत, चेतावणी दाखवा निवडा.
  6. पूर्ण झाले वर क्लिक करा.

आधीपासून डेटा असलेल्या सेलवर ड्रॉपडाउन सूची तयार करा

  1. Google Sheets मध्ये, स्प्रेडशीट उघडा.
  2. आधीपासून डेटा असलेली(असलेल्या) सेल निवडा.
  3. आणि त्यानंतर ड्रॉपडाउन वर राइट-क्लिक करा.
    1. निवडलेल्या सेलमध्ये आधीपासून ड्रॉपडाउन असल्यास, इतर सेलची मूल्ये निवडलेल्या ड्रॉपडाउन सूची नियमामध्ये जोडली जातात.
    2. ड्रॉपडाउन पर्याय हे निवडलेल्या रेंजच्या क्रमाने तयार केले जातात. पर्यायांचा क्रम प्रथम स्तंभामध्ये खाली, त्यानंतर संपूर्ण पंक्तीमध्ये असा आहे.
    3. पर्यायी: आणखी ड्रॉपडाउन मूल्ये जोडण्यासाठी: 
      1. डेटा प्रमाणीकरणाच्या नियम पॅनलवर जा.
      2. "निकष" या अंतर्गत, दुसरा आयटम जोडा वर क्लिक करा.
  4. पर्यायी: तुम्ही सूचीमधील आयटमशी जुळत नसलेल्या सेलमध्ये डेटा एंटर केल्यास, तो नाकारला जातो. तुम्हाला लोकांनी सूचीमध्ये नसलेले आयटम एंटर करायला हवे असल्यास:
    1. प्रगत पर्याय यांवर क्लिक करा.
    2. "डेटा चुकीचा असल्यास:" या अंतर्गत, चेतावणी दाखवा निवडा.
  5. पूर्ण झाले वर क्लिक करा.

ड्रॉपडाउन सूची बदला किंवा हटवा

महत्त्वाचे: रेंजमधून ड्रॉपडाउन निवडल्यावर तुम्ही निकषासंबंधित स्रोत रेंजमधून असाइन केलेल्या रंगाचे मूल्य हटवले तरीही निकष अंतर्गत, मूल्य आणि रंग दिसतील, पण संपादित करता येणार नाहीत. सूचीमधून मूल्य काढून टाकण्यासाठी, स्रोत रेंज किंवा इतर कोणत्याही आयटमचा रंग बदला.

  1. Google Sheets मध्ये, स्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्‍हाला बदलायचा असलेला किंवा बदलायचे असलेले सेल निवडा, नंतर पर्याय निवडा:
    • डेटा आणि त्यानंतर डेटा व्हॅलिडेशन वर क्लिक करा.
    • ड्रॉपडाउन आणि त्यानंतर संपादित करा बटण वर क्लिक करा.
  3. ड्रॉपडाउन सूची संपादित करा:
    • सूचीबद्ध केलेले पर्याय बदलण्‍यासाठी, "निकष" अंतर्गत असलेले आयटम संपादित करा.
    • सूची हटवण्यासाठी, पर्याय निवडा:
      • नियम काढून टाका वर क्लिक करा.
      • सेल रिकामे असल्यास, सेल निवडा. नंतर, बॅकस्पेस की प्रेस करा.
      • सेल रिकामे असल्यास, सेल निवडा. नंतर, संपादित करा आणि त्यानंतर हटवा आणि त्यानंतर मूल्य वर क्लिक करा.
    • डिस्प्लेची शैली बदलण्यासाठी: प्रगत पर्याय वर क्लिक करा. नंतर, "डिस्प्लेची शैली" अंतर्गत, पुढीलपैकी निवडा:
      • चिप
      • ॲरो
      • साधा मजकूर
  4. पूर्ण झाले वर क्लिक करा. तुम्ही निवडलेल्या रेंजचा आशय तुम्ही बदलल्यास, ते बदल सूचीमध्ये आपोआप होतात.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11656319048624651070
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false