Google Slides मध्ये टेंप्लेट वापरणे किंवा थीम, बॅकग्राउंड अथवा लेआउट बदलणे

Google Slides मध्ये तुमचे प्रेझेंटेशन कसे दिसते हे तुम्ही कस्टमाइझ करू शकता. टेंप्लेटमधून तुमचे प्रेझेंटेशन सुरू करा किंवा थीम, बॅकग्राउंड अथवा लेआउट बदला.

  • थीम: रंग, फॉंट, बॅकग्राउंड आणि लेआउट यांचा प्रीसेट गट.
  • बॅकग्राउंड: तुमच्या स्लाइडच्या आशयाच्या मागील फोटो किंवा रंग.
  • लेआउट: तुमचा मजकूर आणि इमेज स्लाइडवर मांडण्याची पद्धत.
  • टेंप्लेट: पुढील गोष्टींचे काँबिनेशन वापरून स्लाइडचा आधीपासून डिझाइन केलेला संग्रह:
    • थीम
    • लेआउट
    • बॅकग्राउंड
    • फॉंट
    • कलर स्‍कीम
    • नमुना किंवा प्लेसहोल्डर आशय

थीम बदला

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Slides मध्ये प्रेझेंटेशन उघडा.
  2. सर्वात वर, स्लाइड आणि त्यानंतर थीम बदला वर क्लिक करा.
  3. उजवीकडे, तुम्हाला हव्या असलेल्या थीमवर क्लिक करा.
बॅकग्राउंड रंग किंवा इमेज बदलणे

बॅकग्राउंडचा रंग बदलणे

तुमच्या स्लाइडच्या आशयाच्या मागील फोटो किंवा रंग म्हणजे बॅकग्राउंड. तुम्ही प्रेझेंटेशनमधील एका किंवा सर्व स्लाइडचा बॅकग्राउंड रंग बदलू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Slides मध्‍ये प्रेझेंटेशन उघडा.
  2. स्लाइड निवडा.
  3. सर्वात वर, स्लाइड आणि त्यानंतर बॅकग्राउंड बदला वर क्लिक करा.
  4. "रंग" च्या उजवीकडे, बॉक्सवर क्लिक करा.
  5. रंग निवडा.
    1. तुमचा स्वतःचा रंग जोडण्यासाठी, "कस्टम" अंतर्गत, जोडा नवीन वर क्लिक करा.
    2. तुम्ही हेक्स कोड निवडू शकता किंवा रंग, छटा आणि पारदर्शकता मॅन्युअली अ‍ॅडजस्ट करू शकता.
    3. ओके वर क्लिक करा.
  6. पुढील ठिकाणी रंग जोडण्यासाठी:
    • स्लाइडवर, पूर्ण झाले वर क्लिक करा.
    • संपूर्ण प्रेझेंटेशनमध्ये, थीममध्ये जोडा वर क्लिक करा.

बॅकग्राउंड इमेज बदलणे

तुम्ही Google Drive मधून किंवा तुमच्या कॉंप्युटरवरून एका स्लाइडमध्ये अथवा संपूर्ण प्रेझेंटेशनमध्ये इमेज जोडू शकता.

महत्त्वाचे: इमेज या .gif, .jpg, किंवा .png असणे आणि ५० MB पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Slides मध्‍ये प्रेझेंटेशन उघडा.
  2. स्लाइड निवडा.
  3. सर्वात वर, स्लाइड आणि त्यानंतर बॅकग्राउंड बदला वर क्लिक करा.
  4. "इमेज" च्या उजवीकडे, निवडा वर क्लिक करा.
  5. इमेज निवडा, त्यानंतर निवडा वर क्लिक करा.
    • एका स्लाइडमध्ये इमेज जोडण्यासाठी, पूर्ण झाले वर क्लिक करा.
    • संपूर्ण प्रेझेंटेशनमध्ये इमेज जोडण्यासाठी, थीममध्ये जोडा वर क्लिक करा.

टीप: तुम्ही Google Slides मध्ये इमेजला ड्रॅग करून ड्रॉपदेखील करू शकता. तुमच्या प्रेझेंटेशनमधील बॅकग्राउंड इमेज बदलण्यासाठी, तुमच्या प्रेझेंटेशन कॅन्व्हासच्या कडेजवळ कर्सर फिरवा.

नवीन थीम इंपोर्ट करणे

महत्त्वाचे: तुमच्या बॅकग्राउंडसाठी नवीन थीम इथून इंपोर्ट करा:

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Slides मध्ये प्रेझेंटेशन उघडा.
  2. सर्वात वर, स्लाइड आणि त्यानंतर थीम बदला वर क्लिक करा.
  3. तळाशी उजवीकडे, थीम इंपोर्ट करा वर क्लिक करा.
  4. तुम्हाला वापरायच्या असलेल्या प्रेझेंटेशनवर डबल-क्लिक करा.
  5. तुम्हाला हव्या असलेल्या थीमवर क्लिक करा.
  6. थीम इंपोर्ट करा वर क्लिक करा.
तुमच्या थीमचे रंग संपादित करणे

तुमच्या प्रेझेंटेशनच्या थीममधील प्रत्येक एकल रंग तुम्ही बदलू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Slides मध्‍ये प्रेझेंटेशन उघडा.
  2. सर्वात वर, स्लाइड आणि त्यानंतर थीम संपादित करा आणि त्यानंतर रंग रंग क्लिक करा.
  3. उजवीकडे, "थीमचे रंग" अंतर्गत, ड्रॉप-डाउनमधून तुम्हाला संपादित करायचा असलेला रंग निवडा.
    • प्रीसेट रंग वापरण्यासाठी: "डीफॉल्ट" अंतर्गत, तुम्हाला वापरायच्या असलेल्या रंगावर क्लिक करा.
    • रंग कस्टमाइझ करण्यासाठी: बहुरंगी चौकटीमध्ये, तुम्हाला वापरायचा असलेल्या रंगावर क्लिक करा किंवा हेक्स मूल्य एंटर करा. तुम्ही प्रत्येक रंगाची पारदर्शकतादेखील बदलू शकता.
लेआउट बदलणे

तुमचा मजकूर आणि इमेज स्लाइडवर मांडण्याची पद्धत म्हणजे लेआउट.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Slides मध्‍ये प्रेझेंटेशन उघडा.
  2. एक स्लाइड निवडा.
  3. सर्वात वर, लेआउट वर क्लिक करा.
  4. तुम्हाला वापरायचे असलेले लेआउट निवडा.
टेंप्लेटमधून Slides तयार करणे

तुमचा मजकूर आणि इमेज स्लाइडवर मांडण्याची पद्धत म्हणजे लेआउट.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Slides मध्‍ये प्रेझेंटेशन उघडा.
  2. टूलबारवर, फाइल आणि त्यानंतर नवीन आणि त्यानंतर टेंप्लेट गॅलरीमधून निवडा.
  3. उजवीकडे, तुम्हाला हव्या असलेल्या थीमवर क्लिक करा.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1460360187802807541
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false