सारण्या जोडा आणि संपादित करा

सारणी वापरून दस्तऐवज किंवा प्रेझेंटेशनमधील माहिती संगतवार लावा. तुम्ही सारण्या जोडू किंवा हटवू शकता आणि सारणीच्या पंक्ती आणि स्तंभांनुसार आकार आणि शैली अ‍ॅडजस्ट करू शकता.

तुम्ही कॉंप्युटरवर Google Docs वापरत असल्यास, पुढील गोष्टीदेखील करू शकता:

  • पंक्ती क्रमाने लावणे
  • पंक्ती आणि स्तंभ ड्रॅग करून हलवणे
  • सारणी हेडर पंक्ती पिन करणे, जेणेकरून प्रत्येक पेजच्या सर्वात वरती त्यांची पुनरावृत्ती होईल
  • पेजवरील माहिती ओव्हरफ्लो होण्यापासून रोखणे

सारणी जोडणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Docs ॲप किंवा Google Slides ॲप उघडा.
  2. एक दस्तऐवज किंवा सादरीकरण उघडा.
  3. तुम्हाला जिथे सारणी जोडायची आहे त्या जागेवर टॅप करा.
  4. सर्वात वर उजवीकडे, जोडा जोडावर टॅप करा.
  5. सारणी सारणी वर टॅप करा.
  6. तुम्हाला तुमच्या सारणीमध्ये किती पंक्ती आणि स्तंभ हवे आहेत ते निवडा.
  7. सारणी घाला वर टॅप करा.

पंक्ती किंवा स्तंभ जोडणे

Google Docs

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Docs अ‍ॅप उघडा.
  2. एक दस्तऐवज उघडा.
  3. सारणीमधील कोणत्याही सेलवर टॅप करा.
  4. स्वरूपन फॉरमॅट वर टॅप करा.
  5. "सारणी" खाली, खालीलपैकी एकावर टॅप करा:
    • स्तंभ डावीकडे डावीकडे स्तंभ घाला
    • स्तंभ उजवीकडे उजवीकडे स्तंभ घाला
    • पंक्ती वर वर पंक्ती घाला
    • पंक्ती खाली खाली पंक्ती घाला

Google Slides

  1. तुमच्‍या iPhone किंवा iPad वर, Google Slides अ‍ॅप उघडा.
  2. एक सादरीकरण उघडा.
  3. एका सारणीवर टॅप करा.
  4. पंक्ती किंवा स्तंभाच्या समोरच्या करड्या रंगाच्या बारवर टॅप करा.
  5. खालीलपैकी एकावर टॅप करा:
    • डावीकडे स्तंभ घाला डावीकडे स्तंभ घाला
    • उजवीकडे स्तंभ घाला उजवीकडे स्तंभ घाला
    • वर पंक्ती घाला वर पंक्ती घाला
    • खाली पंक्ती घाला खाली पंक्ती घाला

तुम्हाला हे पर्याय दिसत नसल्यास, तुम्हाला मेनूमधील राइट ॲरोवर टॅप करावे लागेल.

पंक्ती, स्तंभ किंवा सारणी हटवणे

Google Docs

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Docs अ‍ॅप उघडा.
  2. एक दस्तऐवज उघडा.
  3. एका सारणीवर टॅप करा.
  4. तुम्हाला जी पंक्ती किंवा जो स्तंभ हटवायचा आहे त्यासमोरच्या करड्या रंगाच्या बारवर टॅप करा.
  5. स्तंभ हटवा, पंक्ती हटवा, किंवा सारणी हटवा वर टॅप करा.

तुम्हाला हे पर्याय दिसत नसल्यास, तुम्हाला मेनूमधील राइट ॲरोवर टॅप करावे लागेल.

Google Slides

  1. तुमच्‍या iPhone किंवा iPad वर, Google Slides अ‍ॅप उघडा.
  2. एक सादरीकरण उघडा.
  3. एका सारणीवर टॅप करा.
  4. तुम्हाला जी पंक्ती किंवा जो स्तंभ हटवायचा आहे त्यासमोरच्या करड्या रंगाच्या बारवर टॅप करा.
  5. हटवा वर टॅप करा.
  6. सारणी हटवण्यासाठी आणि त्यानंतर हटवा वर टॅप करा.

तुम्हाला हे पर्याय दिसत नसल्यास, तुम्हाला मेनूमधील राइट ॲरोवर टॅप करावे लागेल.

सारणीमधील सेल विलीन करणे

Google Docs

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Docs अ‍ॅप उघडा.
  2. एक दस्तऐवज उघडा.
  3. एका सारणीवर टॅप करा.
  4. तुम्हाला जी पंक्ती किंवा जो स्तंभ विलीन करायचा आहे त्यासमोरच्या करड्या रंगाच्या बारवर टॅप करा.
    • पंक्ती आणि स्तंभाना एकत्रितपणे विलीन करण्यासाठी, कडेला असलेल्या निळ्या बिंदुवर टॅप करा आणि ड्रॅग करा.
  5. स्वरूपन फॉरमॅट आणि त्यानंतर सारणी वर टॅप करा.
  6. तळाशी असलेल्या सेल विलीन करा वर टॅप करा.

टीप: सेल विलीन करणे रद्द करण्यासाठी, सेल विलीन करा बंद करा.

Google Slides

  1. तुमच्‍या iPhone किंवा iPad वर, Google Slides अ‍ॅप उघडा.
  2. सादरीकरण उघडा.
  3. तुम्हाला जे सेल विलीन करायचे आहेत ते ठळक करा.
  4. सेल विलीन करा वर टॅप करा.

तुम्हाला हे पर्याय दिसत नसल्यास, तुम्हाला मेनूमधील राइट ॲरोवर टॅप करावे लागेल.

सारणींचा आकार बदलणे आणि शैली देणे

पंक्ती आणि स्तंभाचा आकार बदलणे

Google Docs

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Docs अ‍ॅप उघडा.
  2. दस्तऐवज उघडा.
  3. आधीपासून असलेल्या सारणीवर टॅप करा.
  4. पंक्ती किंवा स्तंभातला जो सेल तुम्हाला बदलायचा आहे त्यावर टॅप करा.
  5. स्वरूपन फॉरमॅट आणि त्यानंतर टॅप करा सारणी वर टॅप करा.
  6. पंक्ती आणि स्तंभाचा आकार बदलण्यासाठी, "किमान पंक्ती उंची" आणि "स्तंभ रुंदी" यासमोरील अप किंवा डाउन अ‍ॅरोवर टॅप करा.

Google Slides

  1. तुमच्‍या iPhone किंवा iPad वर, Google Slides अ‍ॅप उघडा.
  2. एक सादरीकरण उघडा.
  3. आधीपासून असलेल्या सारणीवर टॅप करा.
  4. पंक्ती किंवा स्तंभाचा जो हेडर तुम्हाला बदलायचा आहे त्या हेडरवर टॅप करा.
  5. पंक्ती किंवा स्तंभाचा आकार बदलण्यासाठी, पंक्ती किंवा स्तंभ हेडरच्या कडेवर असलेल्या रेषांना स्पर्श करा आणि ड्रॅग करा.

सारणीचा आकार बदलणे

Google Docs

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Docs अ‍ॅप उघडा.
  2. दस्तऐवज उघडा.
  3. आधीपासून असलेल्या सारणीवर टॅप करा.
  4. सारणीच्या सर्वात वर डाव्या बाजूच्या चौकोनावर टॅप करा.
  5. सारणीच्या कडेवर असलेल्या करड्या रंगाच्या बारना स्पर्श करा आणि ड्रॅग करा.

Google Slides

  1. तुमच्‍या iPhone किंवा iPad वर, Google Slides अ‍ॅप उघडा.
  2. एक सादरीकरण उघडा.
  3. तुम्हाला ज्या सारणीचा आकार बदलायचा आहे त्यावर टॅप करा.
  4. सारणीच्या कडेवर असलेल्या निळ्या चौकोनांना स्पर्श करा आणि ड्रॅग करा.

सारणीमधील स्वतंत्र सेलला शैली देणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Docs ॲप किंवा Google Slides ॲप उघडा.
  2. एक दस्तऐवज किंवा सादरीकरण उघडा.
  3. तुम्हाला जे सेल बदलायचे आहेत त्यावर टॅप करा.
  4. स्वरूपन फॉरमॅट आणि त्यानंतर टॅप करा सारणी वर टॅप करा.
  5. तुम्हाला जी शैली बदलायची आहे त्यावर टॅप करा:
    • रंग भरा
    • सीमा रंग
    • सीमा रुंदी किंवा सीमा वजन
    • सीमा डॅश
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14521330348599604168
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false