सारण्या जोडा आणि संपादित करा

सारणी वापरून दस्तऐवज किंवा प्रेझेंटेशनमधील माहिती संगतवार लावा. तुम्ही सारण्या जोडू किंवा हटवू शकता आणि सारणीच्या पंक्ती आणि स्तंभांनुसार आकार आणि शैली अ‍ॅडजस्ट करू शकता.

तुम्ही कॉंप्युटरवर Google Docs वापरत असल्यास, पुढील गोष्टीदेखील करू शकता:

  • पंक्ती क्रमाने लावणे
  • पंक्ती आणि स्तंभ ड्रॅग करून हलवणे
  • सारणी हेडर पंक्ती पिन करणे, जेणेकरून प्रत्येक पेजच्या सर्वात वरती त्यांची पुनरावृत्ती होईल
  • पेजवरील माहिती ओव्हरफ्लो होण्यापासून रोखणे

सारणी जोडणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, एखाद्या प्रेझेंटेशनमधील दस्तऐवज किंवा स्लाइड उघडा.
  2. घाला आणि त्यानंतर सारणीआणि त्यानंतर  वर क्लिक करा आणि तुम्हाला किती पंक्ती आणि स्तंभ जोडायचे आहेत ते निवडा.
    • सारण्या २० x २० सेलइतक्या मोठ्या असू शकतात.
  3. सारणी तुमच्या दस्तऐवजामध्ये जोडली जाईल.
पंक्ती किंवा स्तंभ जोडणे
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, एखाद्या प्रेझेंटेशनमधील दस्तऐवज किंवा स्लाइड उघडा.
  2. सारणीमधील सेलवर राइट क्लिक करा.
  3. निवडलेल्या सेलच्या पुढे पंक्ती किंवा स्तंभ जोडण्यासाठी, क्लिक करा:
    • डावीकडे स्तंभ घाला
    • उजवीकडे स्तंभ घाला
    • वर पंक्ती घाला
    • खाली पंक्ती घाला
पंक्ती, स्तंभ किंवा सारण्या हटवणे
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, एखाद्या प्रेझेंटेशनमधील दस्तऐवज किंवा स्लाइड उघडा.
  2. तुम्हाला सारणीमधील ज्या पंक्तीतील किंवा स्तंभातील सेल हटवायचा आहे त्यावर राइट-क्लिक करा.
  3. मेनूमधून, स्तंभ हटवापंक्ती हटवा किंवा सारणी हटवा निवडा.
सारणी हलवणे
महत्त्वाचे: Google Docs मध्ये, तुमचा दस्तऐवज पेज फॉरमॅटमध्ये आहे याची खात्री करा.
तुमची सारणी हलवण्यासाठी आणि जागेवर लावण्यासाठी पर्याय निवडा:
पॉइंट करून ड्रॅग करा:
  1. सारणी हलवा दाखवले जाईपर्यंत सारणीच्या कोपऱ्यांवर पॉइंट करा.
  2. तुमची सारणी ड्रॅग करा.
  3. हव्या असलेल्या स्थितीत सारणी ड्रॉप करा.
झटपट लेआउट:
  1. सारणीवर राइट-क्लिक करा.
  2. सारणी प्रॉपर्टीआणि त्यानंतर झटपट लेआउट वर क्लिक करा.
  3. लेआउट पर्यायांपैकी एक निवडा.
मजकूर रॅप करा:
  1. सारणीवर राइट-क्लिक करा.
  2. सारणी प्रॉपर्टी आणि त्यानंतर सारणी वर क्लिक करा.
  3. “शैली” अंतर्गत, मजकूर रॅप करा निवडा.
  4. पर्याय निवडा:
    • सारणी आणि रॅप केलेल्या मजकुरातील जागेचे प्रमाण बदला: "दस्तऐवज मजकुरातील समास" अंतर्गत, समासाचा आकार हलवा.
    • सारणीला तिच्या रॅप केलेल्या मजकुरासह त्याच ठिकाणी ठेवा: "स्थान" अंतर्गत, मजकुरासह हलवा वर क्लिक करा.
    • सारणीला पेजवर त्याच ठिकाणी ठेवा: "स्थान" अंतर्गत, पेजवर निश्चित करा वर क्लिक करा.

सारण्यांना शैली देणे

तुम्ही पंक्ती आणि स्तंभांचा आकार बदलू शकता किंवा सारणीतील पंक्ती क्रमाने लावू शकता. स्वतंत्र सेलची बॉर्डरची शैली आणि बॅकग्राउंडचा रंगदेखील बदलू शकता.

पंक्ती आणि स्तंभांचा आकार बदलणे

पंक्ती किंवा स्तंभांचा आकार बदलणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, एक दस्तऐवज किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  2. तुमच्या सारणीमध्ये, कर्सर पंक्ती किंवा स्तंभाच्या ग्रिडलाइनमध्ये हलवा.
  3. तुमचा कर्सर दोन-बाजूंना बाण असा बनेल तेव्हा, पंक्ती किंवा स्तंभ तुम्हाला हव्या त्या आकाराचा बनेपर्यंत क्लिक आणि ड्रॅग करा.

सर्व पंक्त्या आणि स्तंभ समान आकाराचे करा

  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, दस्‍तऐवज किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  2. सारणीवर राइट क्लिक करा.
  3. पंक्त्या वितरित करा किंवा स्तंभ वितरित करा वर क्लिक करा.
सारणीचा आकार बदलणे

Google Docs

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, दस्तऐवज उघडा आणि सारणीमधील सेल निवडा.
  2. फॉरमॅट आणि त्यानंतर सारणी आणि त्यानंतर सारणीचे गुणधर्म वर जा. 
    1. तुम्ही सारणीवर राइट-क्लिक करूनदेखील सारणीचे गुणधर्म निवडू शकता.
  3. "स्तंभ" किंवा "पंक्ती" यामध्ये, हायलाइट केलेल्या सर्व सेलसाठी तुम्हाला हवी असलेली रुंदी आणि उंची एंटर करा.
  4. ओके वर क्लिक करा.

Google Slides

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, एक सादरीकरण उघडा आणि एका सारणीवर क्लिक करा.
  2. तुमचा माउस सारणीच्या कोणत्याही कोपऱ्यात हलवा.
  3. तुमचा कर्सर दोन-बाजूंना बाण असा बनेल तेव्हा, कोणत्याही दिशेला क्लिक आणि ड्रॅग करा.
सारणीमधील स्वतंत्र सेलला शैली देणे
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, एक दस्तऐवज किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  2. तुम्हाला जे सेल बदलायचे आहेत ते निवडा.
  3. टूलबारमध्ये, तुम्हाला जी शैली बदलायची आहे त्यावर क्लिक करा:
    • बॉर्डरचा रंग बॉर्डरचा रंग
    • बॉर्डरची रुंदी किंवा बॉर्डरची जाडी बॉर्डर डॅश
    • बॉर्डर डॅश बॉर्डरची जाडी
    • बॅकग्राउंडचा रंग किंवा फिल कलर भरा

Google Docs मध्ये, तुम्ही सेलची व्हर्टिकल अलाइनमेंट आणि पॅडिंगदेखील बदलू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, दस्तऐवज उघडा आणि सारणीवर क्लिक करा.
  2. फॉरमॅट आणि त्यानंतर सारणी आणि त्यानंतर सारणीचे गुणधर्म वर जा. 
    1. तुम्ही सारणीवर राइट-क्लिक करूनदेखील सारणीचे गुणधर्म निवडू शकता.
  3. "सेल" या अंतर्गत, तुम्ही व्हर्टिकल अलाइनमेंट निवडा आणि सेल पॅडिंग एंटर करा.
Google Docs मध्ये पंक्ती क्रमाने लावणे
  1. तुमच्‍या काँप्युटरवर, Google Docs मध्ये एक दस्‍तऐवज उघडा.
  2. सारणीवर राइट-क्लिक करा.
  3. सारणी क्रमाने लावा वर क्लिक करा.
  4. सारणी चढत्या क्रमाने लावा  किंवा सारणी उतरत्या क्रमाने लावा निवडा.

तुम्ही थेट सारणी नियंत्रणांमधूनदेखील पंक्ती झटपट क्रमाने लावू शकता:

  1. सारणीच्या सर्वात वरच्या पंक्तीवर कर्सर फिरवा.
  2. सारणी क्रमाने लावा वर क्लिक करा. 
  3. चढत्या क्रमाने लावा किंवा उतरत्या क्रमाने लावा निवडा.

टीप: तुमच्या सारणीतील हेडरच्या पंक्ती क्रमाने लावणे टाळण्यासाठी, हेडरच्या पंक्ती पिन करणे यासाठी सूचना फॉलो करा. पिन केलेल्या कोणत्याही पंक्ती क्रमाने लावल्या जाणार नाहीत.

सारण्यांची रचना

तुम्ही पंक्ती आणि स्तंभ हलवू शकता किंवा सेल एकत्रितपणे मर्ज करू शकता. Google Docs मध्ये, तुमच्याकडे एकाहून अधिक पेजवर पसरलेल्या मोठ्या सारण्या असल्यास, तुम्ही पेजच्या सर्वात वरती हेडरच्या पंक्ती पिनदेखील करू शकता आणि पंक्ती ओव्हरफ्लो होण्यापासून रोखू शकता.

सारणीमधील सेल मर्ज करणे

तुम्ही शीर्षक तयार करण्यासाठी, हेडर जोडण्यासाठी किंवा अनेक सेलमधली माहिती एका सेलमध्ये ठेवण्यासाठी, सेल एकत्रित करू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, एक दस्तऐवज किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  2. तुम्हाला जे सेल मर्ज करायचे आहेत ते हायलाइट करण्यासाठी त्यांवर क्लिक करून ड्रॅग करा.
  3. सेलवर राइट-क्लिक करा.
  4. सेल मर्ज करा वर क्लिक करा. 

सेल अनमर्ज करण्यासाठी:

  1. तुम्हाला जे सेल अनमर्ज करायचे आहेत ते हायलाइट करण्यासाठी त्यांवर क्लिक करून ड्रॅग करा.
  2. हायलाइट केलेल्या सेलवर राइट-क्लिक करा.
  3. सेल अनमर्ज करा वर क्लिक करा.

Google Docs मध्ये सारणी सेल विभाजित करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, दस्तऐवज उघडा.
  2. सेलवर राइट-क्लिक करा.
  3. सेल विभाजित करा वर क्लिक करा.
  4. तुम्हाला हव्या असलेल्या पंक्ती आणि स्तंभांची संख्या एंटर करा.
  5. विभाजित करा वर क्लिक करा.
Google Docs मध्ये सारणीतील पंक्ती आणि स्तंभ हलवणे

पंक्ती हलवणे

  1. तुमच्‍या काँप्युटरवर, Google Docs मध्ये एक दस्‍तऐवज उघडा.
  2. सारणीतील डाव्या स्तंभावर कर्सर फिरवा.
  3. हात दिसेपर्यंत तुमचा कर्सर ड्रॅग करा वर पॉइंट करा.
  4. क्लिक करा आणि पंक्ती तिच्या नवीन स्थानावर वर किंवा खाली ड्रॅग करा. 

स्तंभ हलवणे

  1. तुमच्‍या काँप्युटरवर, Google Docs मध्ये एक दस्‍तऐवज उघडा.
  2. सारणीच्या सर्वात वरच्या पंक्तीवर कर्सर फिरवा.
  3. हात दिसेपर्यंत तुमचा कर्सर ड्रॅग करा वर पॉइंट करा.
  4. स्तंभावर क्लिक करा आणि त्याच्या नवीन स्थानावर डावीकडे किंवा उजवीकडे ड्रॅग करा. 
Google Docs मध्ये हेडरच्या पंक्त्या पिन करणे

तुमच्याकडे लांब सारणी असल्यास, तुम्ही सारणी पंक्त्यांना प्रत्येक पेजवर रिपीट होणाऱ्या हेडर पंक्त्यांमध्ये बदलू शकता. तुम्ही पेजलेस फॉरमॅट मधील दस्तऐवजावर असल्यास, विंडोच्या सर्वात वरती दृश्यमान राहण्यासाठी, तुम्ही सारणी पंक्त्या पिन करू शकता.

  1. तुमच्‍या काँप्युटरवर, Google Docs मध्ये दस्‍तऐवज उघडा.
  2. तुमच्या सारणीवर कुठेही क्लिक करा.
  3. फॉरमॅट आणि त्यानंतर सारणी आणि त्यानंतर सारणीचे गुणधर्म वर जा. 
    1. तुम्ही सारणीवर राइट-क्लिक करूनदेखील सारणीचे गुणधर्म निवडू शकता.
  4. "पंक्ती" या अंतर्गत, पिन हेडर पंक्तीला(क्तींना) निवडा आणि तुम्हाला पिन करायच्या असलेल्या पंक्तींची संख्या नमूद करा.
  5. बदल लागू करण्यासाठी, ओके वर क्लिक करा. 

तुम्ही थेट सारणीवरूनदेखील अनेक पंक्ती झटपट पिन करू शकता:

  1. तुमच्‍या काँप्युटरवर, Google Docs मध्ये एक दस्‍तऐवज उघडा.
  2. तुम्हाला ज्या पंक्तीपर्यंत पिन करायचे आहे त्यावर राइट-क्लिक करा आणि या पंक्तीपर्यंत हेडरला पिन करा निवडा. 
    1. तसेच, तुम्हाला ज्या पंक्तीपर्यंत पिन करायचे आहे त्याच्या डावीकडे कर्सर हलवू शकता आणि या पंक्तीपर्यंत हेडरला पिन करा निवडा.

पंक्ती अनपिन करणे

  1. सारणीमधील कोणत्याही पंक्तीवर राइट-क्लिक करा
  2. हेडरच्या पंक्ती अनपिन करा निवडा.
Google Docs मध्ये सारणीतील पंक्तींचे विभाजन होण्यापासून रोखणे

तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पेजवर पसरलेली मोठी सारणी असल्यास, तुम्हाला सारणीतील पंक्तीमधील माहिती पेज ब्रेकमध्ये विभाजित करायची आहे की नाही ते तुम्ही निवडू शकता. 

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य पेजलेस फॉरमॅटमध्ये असलेल्या दस्तऐवजांमध्ये उपलब्ध नाही. हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, तुमचा दस्तऐवज पेज फॉरमॅटमध्ये आहे याची खात्री करा.

  1. सारणीतील पंक्ती निवडणे. 
  2. फॉरमॅट आणि त्यानंतर सारणी आणि त्यानंतर सारणीचे गुणधर्म वर जा. 
    1. तुम्ही सारणीवर राइट-क्लिक करूनदेखील सारणीचे गुणधर्म निवडू शकता.
  3. "पंक्ती" या अंतर्गत, पंक्तीला सर्व पेजवर ओव्हरफ्लो होण्याची अनुमती द्या यासाठी निवडा/चौकटीतली खूण काढा.
  4. बदल लागू करण्यासाठी, ओके वर क्लिक करा.
Google Docs मधील सारणीची अलाइनमेंट बदलणे
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, दस्तऐवज उघडा आणि सारणीवर क्लिक करा.
  2. फॉरमॅट आणि त्यानंतर सारणी आणि त्यानंतर सारणीचे गुणधर्म वर जा. 
    1. तुम्ही सारणीवर राइट-क्लिक करूनदेखील सारणीचे गुणधर्म निवडू शकता.
  3. "सारणी" या अंतर्गत, डावी, मध्यभागी किंवा उजवी याची निवड करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1516715109582023739
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false