सारण्या जोडा आणि संपादित करा

सारणी वापरून दस्तऐवज किंवा प्रेझेंटेशनमधील माहिती संगतवार लावा. तुम्ही सारण्या जोडू किंवा हटवू शकता आणि सारणीच्या पंक्ती आणि स्तंभांनुसार आकार आणि शैली अ‍ॅडजस्ट करू शकता.

तुम्ही कॉंप्युटरवर Google Docs वापरत असल्यास, पुढील गोष्टीदेखील करू शकता:

  • पंक्ती क्रमाने लावणे
  • पंक्ती आणि स्तंभ ड्रॅग करून हलवणे
  • सारणी हेडर पंक्ती पिन करणे, जेणेकरून प्रत्येक पेजच्या सर्वात वरती त्यांची पुनरावृत्ती होईल
  • पेजवरील माहिती ओव्हरफ्लो होण्यापासून रोखणे
सारणी जोडणे
  1. तुमच्या Android phone फोन किंवा टॅबलेटवर, एक दस्तऐवज किंवा सादरीकरण उघडा.
  2. तुम्हाला जिथे सारणी जोडायची आहे त्या जागेवर टॅप करा.
  3. सर्वात वर उजवीकडे, जोडा Plusवर टॅप करा.
  4. सारणी वर टॅप करा.
  5. तुम्हाला तुमच्या सारणीमध्ये किती पंक्ती आणि स्तंभ हवे आहेत ते निवडा.
  6. सारणी घाला वर टॅप करा. सारणी तुमच्या दस्तऐवजामध्ये जोडली जााईल.
स्तंभ किंवा पंक्ती जोडणे

Google Docs

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, एक दस्तऐवज उघडा.
  2. एका सारणीवर टॅप करा.
  3. पंक्ती किंवा स्तंभ जोडण्यासाठी:
    • पंक्ती: सारणीच्या तळाशी डावीकडे, जोडा वर टॅप करा Plus.
    • स्तंभ: सारणीच्या सर्वात वर उजवीकडे, जोडा वर टॅप करा Plus.

Google Slides

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, एक सादरीकरण उघडा.
  2. एका सारणीवर टॅप करा.
  3. पंक्ती किंवा स्तंभाच्या समोरच्या करड्या रंगाच्या बारवर टॅप करा.
  4. खालीलपैकी एकावर टॅप करा:
    • वर पंक्ती घाला
    • खाली पंक्ती घाला
    • डावीकडे स्तंभ घाला
    • उजवीकडे स्तंभ घाला
पंक्ती आणि स्तंभ हटवणे

Google Docs

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, एक दस्तऐवज उघडा.
  2. एका सारणीवर टॅप करा.
  3. पंक्ती किंवा स्तंभाच्या समोर आलेल्या अ‍ॅरोवर टॅप करा.
  4. समोर आलेल्या मेनूवर, अधिक आणखीवर टॅप करा.
  5. स्तंभ हटवा किंवा पंक्ती हटवा वर क्लिक करा.

Google Slides

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, एक सादरीकरण उघडा.
  2. एका सारणीवर टॅप करा.
  3. पंक्ती किंवा स्तंभाच्या समोरच्या करड्या रंगाच्या बारवर टॅप करा.
  4. समोर आलेल्या मेनूवर, अधिक आणखीवर टॅप करा.
  5. हटवा वर टॅप करा.
सारणी हटवणे

Google Docs

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, एक दस्तऐवज उघडा.
  2. सारणीमधील जो सेल तुम्हाला हटवायचा आहे त्यावर टॅप करा.
  3. समोर आलेल्या मेनूवर, अधिक आणखीवर टॅप करा.
  4. सारणी हटवा वर टॅप करा.

Google Slides

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, एक सादरीकरण उघडा.
  2. तुम्हाला जी सारणी हटवायची आहे त्यावर टॅप करा.
  3. समोर आलेल्या मेनूवर, अधिक आणखीवर टॅप करा.
  4. हटवा वर टॅप करा.
सारणीमधील सेल मर्ज करणे

Google Docs

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, एक दस्तऐवज उघडा.
  2. तुम्हाला जे सेल मर्ज करायचे आहेत ते निवडा.
  3. स्वरूपन फॉरमॅट आणि त्यानंतर सारणी वर टॅप करा.
  4. सेल मर्ज करा चालू करा.

Google Slides

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, एक सादरीकरण उघडा.
  2. तुम्हाला जे सेल मर्ज करायचे आहेत ते निवडा.
  3. पॉप-अप मेनूमध्ये, अधिक वर टॅप करा आणखी.
  4. सेल मर्ज करा वर टॅप करा.

सारणींचा आकार बदलणे आणि शैली देणे

पंक्ती आणि स्तंभांचा आकार बदलणे

Google Docs

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, एक दस्तऐवज उघडा.
  2. एका सारणीवर टॅप करा.
  3. पंक्ती किंवा स्तंभातला जो सेल तुम्हाला बदलायचा आहे त्यावर टॅप करा.
  4. स्वरूपन फॉरमॅट वर टॅप करा.
  5. सारणी वर टॅप करा.
  6. पंक्ती आणि स्तंभाचा आकार बदलण्यासाठी, "किमान पंक्ती उंची" आणि "स्तंभ रुंदी" यासमोरील अप किंवा डाउन अ‍ॅरोवर टॅप करा.

Google Slides

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, एक सादरीकरण उघडा.
  2. आधीपासून असलेल्या सारणीवर टॅप करा.
  3. पंक्ती किंवा स्तंभाच्या सर्वात वर टॅप करा.
  4. पंक्ती किंवा स्तंभाचा आकार बदलण्यासाठी, पंक्ती किंवा स्तंभाच्या कडेवर असलेल्या रेषांना स्पर्श करा आणि ड्रॅग करा.
सारणीचा आकार बदलणे

Google Docs

तुमच्या दस्तऐवजातील सारणीचा आकार संपादित करण्यासाठी, कॉंप्युटरवर docs.google.com उघडा.

Google Slides

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, एक सादरीकरण उघडा.
  2. तुम्हाला ज्या सारणीचा आकार बदलायचा आहे त्यावर टॅप करा.
  3. सारणीच्या कडेवर असलेल्या निळ्या चौकोनांना स्पर्श करा आणि ड्रॅग करा.
सारणीमधील स्वतंत्र सेलला शैली द्या

Google Docs

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, एक दस्तऐवज उघडा.
  2. एका सारणीवर टॅप करा.
  3. पंक्ती किंवा स्तंभातला जो सेल तुम्हाला बदलायचा आहे त्यावर टॅप करा.
  4. स्वरूपन फॉरमॅट वर टॅप करा. "मजकूर" आणि "परिच्छेद" मेनूंच्या खालील, तुमच्या मजकुराचे स्वरूपन हवे त्याप्रमाणे बदला.

Google Slides

Google Slides मध्ये स्वतंत्र सेलला शैली देण्यासाठी, कॉंप्युटरवर slides.google.com वर जा.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13799789943710314057
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false