स्लाइड जोडणे, हटवणे किंवा संयोजनकरणे

ऑफिस किंवा शाळेसाठी Google Docs चा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे का? विनामूल्य Google Workspace चाचणीसाठी साइन अप करा.

तुम्हाला हवे त्याप्रमाणे सादरीकरणातील स्लाइडचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही त्या जोडू, हटवू शकता आणि त्यांचा क्रम बदलू शकता. तुम्ही तुमच्या स्लाइडना क्रमांक देखील देऊ शकता.

स्लाइड जोडणे, डुप्लिकेट करणे आणि हटवणे

एक स्लाइड घाला

सध्याच्या स्लाइडसारखाच लेआउट असलेली स्लाइड जोडण्यासाठी:

 1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Slides मध्‍ये एक सादरीकरण उघडा.
 2. सर्वात वर डावीकडे, नवीन स्लाइडअधिक वर क्लिक करा.

वेगळा लेआउट असलेली स्लाइड जोडण्यासाठी:

 1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Slides मध्‍ये एक सादरीकरण उघडा.
 2. सर्वात वर डावीकडे, लेआउटसह नवीन स्लाइड डाउन अ‍ॅरो वर क्लिक करा.
 3. एक स्लाइड निवडा.

तुमच्या स्लाइडची थीम किंवा लेआउट कसे बदलायचे ते जाणून घ्या.

स्लाइड डुप्लिकेट करणे
 1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Slides मध्‍ये एक सादरीकरण उघडा.
 2. डावीकडे, तुम्हाला डुप्लिकेट करायची आहे त्या स्लाइडवर क्लिक करा.
  • तुम्हाला एकापेक्षा जास्त स्लाइड डुप्लिकेट करायच्या असतील तर, शिफ्ट की धरून ठेवा आणि त्यावर आत्ता क्लिक करा.
 3. राइट क्लिक करा आणि स्लाइड डुप्लिकेट करा निवडा.
स्लाइड हटवणे
 1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Slides मध्‍ये एक सादरीकरण उघडा.
 2. डावीकडे, तुम्हाला जी स्लाइड हटवायची आहे त्यावर क्लिक करा.
  • तुम्हाला एकापेक्षा जास्त स्लाइड हटवायच्या असतील तर, शिफ्ट की धरून ठेवा आणि त्यावर आत्ता क्लिक करा.
 3. तुमच्या कीबोर्डवर डिलीट किंवा बॅकस्पेस की दाबा.

तुमच्या स्लाइड संयोजित करणे

स्लाइड वगळणे

तुम्ही सादरीकरण सादर करत असताना एखादी स्लाइड वगळू शकता. स्लाइड हटवली जाणार नाही, आणि तुम्ही तुमचे सादरीकरण इतरांसोबत शेअर केले असल्यास, लोक वगळलेल्या स्लाइड पाहू शकतील.

 1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Slides मध्‍ये एक सादरीकरण उघडा.
 2. डावीकडे, तुम्हाला जी किंवा ज्या स्लाइड वगळायची(च्या) आहेत त्या स्लाइडवर क्लिक करा.
 3. स्लाइड वगळा वर क्लिक करा.
  • वगळलेली स्लाइड दाखवण्यासाठी, स्लाइड वगळा वर पुन्हा क्लिक करा.
स्लाइड पुन्हा क्रमवार लावणे

तुम्ही सादरीकरणातील स्लाइडचा क्रम बदलू शकता:

 1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Slides मध्‍ये एक सादरीकरण उघडा.
 2. डावीकडे, तुम्हाला ज्या स्लाइडचा क्रम पुन्हा लावायचा आहे त्यावर क्लिक करा.
  • तुम्हाला एकापेक्षा जास्त स्लाइडचा क्रम पुन्हा लावायचा असेल तर, शिफ्ट की धरून ठेवा आणि त्यावर आत्ता क्लिक करा.
 3. ही किंवा या स्लाइड तुम्हाला जिथे ठेवायच्या आहेत तिथे ड्रॅग करा.
स्लाइडना क्रमांक देणे

तुम्ही सादरीकरणामध्ये तुमच्या स्लाइडना क्रमांक देऊ शकता:

 1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Slides मध्‍ये एक सादरीकरण उघडा.
 2. सर्वात वरच्या मेनूमधून, घाला आणि त्यानंतर स्लाइड क्रमांक वर क्लिक करा.
 3. लागू करावर क्लिक करा.

टीप: तुम्हाला तुमच्या शीर्षक स्लाइडला क्रमांक द्यायचा नसल्यास, स्लाइड क्रमांक जोडताना "शीर्षक स्लाइड वगळा" समोरील चौकटीत खूण करा.

फक्त विशिष्ट स्लाइडना क्रमांक देण्यासाठी:

 1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Slides मध्‍ये एक सादरीकरण उघडा.
 2. ज्या स्लाइडला किंवा स्लाइडना तुम्हाला क्रमांक द्यायचा आहे ती किंवा त्या निवडा.
 3. सर्वात वरच्या मेनूमधून, घालाआणि त्यानंतर स्लाइड क्रमांक वर क्लिक करा.
 4. निवडलेल्यांवर लागू करा वर क्लिक करा.
तुम्हाला तुमच्या स्लाइड कशा पहायच्या आहेत ते बदला

तुम्ही फिल्मस्ट्रीप दृश्य किंवा ग्रिड दृश्य यामध्ये तुमच्या स्लाइड पाहू शकता:

 1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Slides मध्‍ये एक सादरीकरण उघडा.
 2. तळाशी डावीकडे, फिल्मस्ट्रीप दृश्य फिल्मस्ट्रिप किंवा ग्रिड दृश्य थंबनेल व्ह्यू वर क्लिक करा.
हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?