मजकूर आणि इमेज कॉपी करा आणि पेस्ट करा

तुम्ही तुमच्या फायलींमध्ये मजकूर आणि इमेज कॉपी आणि पेस्ट करू शकता— तुम्ही एक प्रकारच्या फाइलमधून दुसऱ्या प्रकारच्या फाइलमध्ये कॉपी व पेस्ट करत असलात तरीही.

उजवे-क्लिक मेनू वापरा किंवा कीबोर्ड शॉर्टकट वापरणे

तुम्ही उजवे-क्लिक मेनू वापरुन कॉपी आणि पेस्ट करू शकता, परंतु सुरक्षेच्या कारणांनी, अधिकांश ब्राउजर वेब अ‍ॅपना (जसे की Docs, Sheets, आणि Slides) मेनूंच्या मार्फत तुमच्या कॉंप्युटरचा क्लिपबोर्ड वापरण्याची अनुमती देत नाही.

तुम्ही Chrome वापरत असल्यास

कॉपी आणि पेस्ट करण्यासाठी:

  • कीबोर्ड शॉर्टकट वापरा
  • राइट-क्लिक मेनू वापरा
  • टूलबारमधील संपादन मेनूमधून कॉपी किंवा पेस्ट करा निवडा

टीप: मेनू पर्याय वापरण्यासाठी, दस्तऐवज ऑफलाइन एक्स्टेंशन इंस्टॉल करणे आवश्यक आहे.

तुम्ही वेगळा ब्राउझर वापरत असल्यास

कॉपी आणि पेस्ट करण्यासाठी तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट वापरू शकता:

  • PC: Ctrl + c कॉपी करण्यासाठी, Ctrl + x कट करण्यासाठी, आणिCtrl + v पेस्ट करण्यासाठी.
  • Mac: ⌘ + c कॉपी करण्यासाठी, ⌘ + x कट करण्यासाठी, आणि ⌘ + v पेस्ट करण्यासाठी.

आणखी पेस्ट पर्याय

कॉपी आणि पेस्ट चार्ट
  1. तुमच्या कॉंप्युटरवर Google Sheets मध्ये एक चार्ट उघडा.
  2. सर्वात वरती उजव्या कोपऱ्यात, अधिक आणखी वर क्लिक करा.
  3. चार्ट कॉपी करा वर क्लिक करा.
  4. चार्ट पेस्ट करण्यासाठी संपादन आणि त्यानंतर पेस्ट करा क्लिक करा. तुम्ही स्प्रेडशीटच्या बाहेर पेस्ट करत असाल तर, तुम्हाला कॉपी केलेल्या चार्टशी डेटा लिंक करायचा आहे की नाही ते विचारले जाईल.
मजकूर स्वरूपन कॉपी करणे (पेंट स्वरूपन)

तुम्ही पेंट स्वरूपन साधन वापरुन मजकूर, सेल किंवा ऑब्जेक्टचे स्वरूपन कॉपी करू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Google Docs, Sheets, किंवा Slides फाइल उघडा.
  2. तुम्हाला ज्या मजकुराचे, सेलच्या रेंजचे किंवा ऑब्जेक्टचे स्वरूपन कॉपी करायचे आहे ते निवडा.
  3. टूलबारमध्ये, स्वरूपन पेंट करा वर क्लिक करा पेंट फॉरमॅट. तुमच्या कर्सरचा आयकन बदलून तो आता तुम्ही पेंट स्वरूपन मोडमध्ये आहे असे दर्शवेल.
  4. तुम्हाला स्वरूपन ज्यावर पेस्ट करायचे आहे ते निवडा.
  5. त्याचे स्वरूपन बदलून तुम्ही कॉपी केलेल्या स्वरूपनाप्रमाणे होईल.

टीप: एकापेक्षा जास्त ठिकाणी स्वरूपन पेस्ट करण्यासाठी पेंट स्वरूपनावर डबल क्लिक करापेंट फॉरमॅट. तुमचे काम झाल्यावर, पेंट स्वरूपन वर क्लिक करापेंट फॉरमॅट .

कीबोर्ड शॉर्टकट

निवडलेल्या मजकुराचे स्वरूपन कॉपी करण्यासाठी:

  • Ctrl + Alt + c (Windows किंवा Chrome OS) दाबा किंवा ⌘ + ऑप्शन+ c (Mac) दाबा.

तुम्ही कॉपी केलेले स्वरूपन वेगळ्या मजकूर निवडीवर लागू करण्यासाठी:

  • Ctrl + Alt + v (Windows किंवा Chrome OS) दाबा किवा ⌘ + ऑप्शन + v (Mac) दाबा.
स्प्रेडशीटमध्ये पेस्ट स्पेशल वापरा

सेल कॉपी करताना कोणते स्वरूपन कॉपी व्हावे हे ठरवण्यासाठी तुम्ही पेस्ट स्पेशल वापरू शकता.

पेस्ट स्पेशल केवळ एकाच स्प्रेडशीटच्या आत काम करते. तुम्ही एका स्प्रेडशीटमधील सेल कॉपी करून दुसऱ्या टॅबमध्ये उघड्या असलेल्या स्प्रेडशीटमध्ये पेस्ट स्पेशल वापरू शकत नाही.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. तुम्हाला जो डेटा पेस्ट करायचा आहे तो कॉपी करा आणि ज्या सेलमध्ये पेस्ट करायचे आहे त्या सेलमध्ये तुमचा कर्सर ठेवा.
  3. संपादन आणि त्यानंतर पेस्ट स्पेशल क्लिक करा.
  4. पुढीलपैकी निवडा:
    • केवळ मूल्ये पेस्ट करा: मूळ सेल रेंजमधून फक्त मजकूर पेस्ट केला जातो.
    • केवळ स्वरूपन पेस्ट करा: हा पर्याय पेंट स्वरूपन साधन वापरण्याच्या समान आहे -- यामुळे फक्त सेलचे स्वरूपन कॉपी होते, असलेला मजकूर किंवा सूत्रे बदलत नाही.
    • सीमा वगळून सर्व पेस्ट करा: सेलच्या सीमा वगळून सर्व काही पेस्ट केले जाते.
    • केवळ स्तंभ रुंदी पेस्ट करा: निवडलेल्या स्तंभांचा आकार बदलून मूळ आकाराशी जुळवला जातो. 
    • केवळ सूत्रे पेस्ट करा: कॉपी केलेल्या रेंजमधील सूत्रे पेस्ट केली जातात, सूत्रांच्या गणनेच्या परिणामी मिळणारी उत्तरे नाही.
    • केवळ डेटा व्हॅलिडेशन पेस्ट करा: असलेले स्वरूपन, सूत्रे किंवा मजकूर न बदलता, सेलच्या रेंजवर डेटा व्हॅलिडेशन नियम पेस्ट केला जातो.
    • केवळ अट आधारित स्वरूपन पेस्ट करा: सेलच्या रेंजवर फक्त अट आधारित स्वरूपन नियम लागू केला जातो.
    • ट्रान्सपोज केलेले पेस्ट करा: कॉपी केलेल्या सेलची रोटेट केलेली आवृत्ती पेस्ट केली जाते. उदाहरणार्थ, तुम्ही सेलचा एक स्तंभ कॉपी केला आणि पेस्ट ट्रान्सपोज वापरले तर, त्यांना एक पंक्तीमध्ये पेस्ट केले जाईल किंवा याउलट केले जाईल.

आशय पेस्ट केल्यानंतर फॉरमॅट निवडा

तुम्ही आशय पेस्ट केल्यानंतर तो स्वरूपित करू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. स्प्रेडशीटमध्ये, तुम्हाला जो आशय पेस्ट करायचा आहे तो कॉपी करा.
  3. समान स्प्रेडशीटमध्ये आशय पेस्ट करा.
  4. बाय डीफॉल्ट, आशयाचे मूळ स्वरूपन तेच समान राहील. स्वरूपन बदलण्यासाठी, पेस्ट करा पेस्ट करा क्लिक करा.
  5. एक पर्याय निवडा:
    • केवळ मूल्ये पेस्ट करा: फक्त मूळ सेल रेंजमध्ये असलेला मजकूरच पेस्ट केला जातो.
    • फक्त फॉरमॅट पेस्ट करा: हा पर्याय पेंट फॉरमॅट टूल वापरण्याच्या समान आहे -- हे फक्त सेलचे फॉरमॅटिंग कॉपी करते आणि आधीपासून असलेला मजकूर किंवा फॉर्म्युला बदलत नाही.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5551746746897285786
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false