गैरवर्तनाशी संबंधित प्रोग्राम धोरणे आणि अंमलबजावणी

खालील प्रोग्राम धोरणे Drive, Docs, Sheets, Slides, Forms आणि नवीन Sites यांना लागू होतात. Google उत्पादने वापरणाऱ्या प्रत्येकासाठी सकारात्मक अनुभव कायम ठेवण्यात ही धोरणे महत्त्वाची भूमिका बजावतात.
या सेवा पुरवण्याच्या आमच्या क्षमतेसाठी धोकादायक असलेल्या गैरवापरांवर आम्हाला नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आणि हे ध्येय गाठण्यात आम्हाला मदत व्हावी याकरिता खालील धोरणांचे पालन करण्याची आम्ही सर्वांना विनंती करतो. आम्ही या धोरणांच्या उल्लंघनांसाठी आशयाचे पुनरावलोकन करून त्यावर कारवाई करू शकतो. आशयाचा ॲक्सेस प्रतिबंधित करणे, आशय काढून टाकणे आणि वापरकर्त्याला Google उत्पादनांचा असलेला ॲक्सेस मर्यादित किंवा समाप्त करणे या गोष्टींचा या पुनरावलोकनामध्ये समावेश आहे. वेगळे काही नमूद केले नसल्यास, या धोरणांनुसार असलेली सर्व बंधने जगभरात लागू होतात आणि यशस्वीरीत्या आवाहन केले जाईपर्यंत आशयासंबंधित बंधने कायम राहतील.
ही धोरणे लागू होतात, तेव्हा कलात्मक, शैक्षणिक, माहितीपर किंवा वैज्ञानिक घटक विचारात घेऊन अथवा आशयावर कारवाई न केल्यामुळे लोकांना त्याचे इतर लक्षणीय फायदे होणार असतील अशाबाबतीत Google अपवाद करू शकते.
स्टोरेज कोटा मर्यादांच्या बाहेर जाणाऱ्या खात्यांवर Google कारवाई करू शकते. उदाहरणार्थ, आम्ही नवीन अपलोडना नकार देऊ शकतो, सद्य आशय काँप्रेस करू शकतो किंवा तुम्ही तुमच्या स्टोरेज कोटाची मर्यादा ओलांडल्यास अथवा तुम्हाला पुरेसे अतिरिक्त स्टोरेज मिळवता न आल्यास, आशय हटवू शकतो. येथे स्टोरेज कोट्याविषयी अधिक वाचा.
ही धोरणे बदलू शकतात, त्यामुळे वेळोवेळी पुन्हा तपासून खात्री करा. अधिक माहितीसाठी, तुम्ही Google च्या सेवा अटी पाहू शकता.

गैरवापराची तक्रार नोंदवा

कोणीतरी खाली दिलेल्या धोरणांचे उल्लंघन करत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, गैरवर्तनाची तक्रार करा.

कॉपीराइटचे उल्लंघन आणि इतर कायदेशीर समस्यांची तक्रार करण्यासाठी, कृपया जो आशय लागू कायद्यांच्या आधारावर Google च्या सेवांवरून काढला जावा असे तुम्हाला वाटते त्याची तक्रार करण्याच्या प्रक्रियेबाबत तुम्हाला मार्गदर्शन करणारे हे टूल वापरा.

प्रोग्राम धोरणे

खाते अपहरण
अन्य वापरकर्त्याचे खाते त्यांच्या परवानगीशिवाय अ‍ॅक्सेस करू नका. आम्हाला खाते अपहरणाविषयी सूचित केले असल्यास आम्ही योग्य कारवाई करू, ज्यामध्ये आमच्या उत्पादनांचा अ‍ॅक्सेस काढून टाकण्याचा किंवा तुमचे Google खाते बंद करण्याचा समावेश असू शकतो.
खाते अ‍ॅक्टिव्ह नाही
अ‍ॅक्टिव्ह राहण्यासाठी उत्पादनाचा वापर करा. अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये उत्पादनाचा आशय अ‍ॅक्सेस करणे किंवा उत्पादनावर किमान दर दोन वर्षांतून एकदा नवीन आशय स्टोअर करणे यांचा समावेश आहे. आम्ही अ‍ॅक्टिव्ह नसणाऱ्या खात्यांवर कारवाई करू शकतो, ज्यामध्ये उत्पादनामधून तुमचा आशय हटवणे याचाही समावेश असू शकतो. येथे अधिक जाणून घ्या.
बाल लैंगिक अत्याचार आणि शोषण

लहान मुलांचे शोषण किंवा गैरवर्तन करणारा आशय तयार, अपलोड किंवा वितरित करू नका. यामध्ये बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित सर्व आशयाचा समावेश आहे. लहान मुलाचे शोषण होईल अशा Google प्रोडक्टवरील आशयाची तक्रार करण्यासाठी, “गैरवर्तनाची तक्रार करा” वर क्लिक करा.  तुम्हाला इंटरनेटवर इतरत्र कुठेही आशय आढल्यास, कृपया तुमच्या देशातील योग्य एजन्सीशी थेट संपर्क साधा.

आणखी विस्तृतपणे सांगायचे म्हणजे Google लहान मुलांना धोका असलेली आमची उत्पादने वापरण्यास प्रतिबंध करते. यामध्ये लहान मुलांशी संबंधित हिंसक वर्तन यांसारख्या गोष्टी समाविष्ट आहेत पण त्यापुरते मर्यादित नाही:

  • ‘लहान मुलांना दुष्प्रेरित करणे’ (उदाहरणार्थ, लैंगिक संबंध ठेवणे आणि त्या लहान मुलासह लैंगिक इमेजरीची देवाणघेवाण करणे यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने लहान मुलांशी ऑनलाइन मैत्री करणे);
  • ‘लैंगितेसाठी धमकवणे’ (उदाहरणार्थ, लहान मुलाच्या खर्‍या किंवा चुकीच्या पद्धतीने अ‍ॅक्सेस केलेल्या लैंगिक इमेज मिळवून लहान मुलाला धमकावणे किंवा ब्लॅकमेल करणे); 
  • कामुकतेमध्ये लहान मुले (उदाहरणार्थ, लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे वर्णन करणारी इमेज, त्यासाठी प्रोत्साहित करणे किंवा त्याचा प्रचार करणे किंवा लहान मुलांचे लैंगिक शोषण होऊ शकते अशा प्रकारे लहान मुलांचे चित्रण करणे); आणि 
  • लहान मुलांची तस्करी करणे (उदाहरणार्थ, व्यावसायिक लैंगिक शोषणासाठी लहान मुलाची जाहिरात किंवा मागणी करणे).  

 
आम्ही असा आशय काढून टाकू आणि योग्य कारवाई करू, ज्यामध्ये नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉइटेड चिल्ड्रन कडे तक्रार करणे, उत्पादन वैशिष्ट्यांचा अ‍ॅक्सेस मर्यादित करणे आणि खाती बंद करणे यांचा समावेश असू शकतो. एखाद्या लहान मुलाला गैरवर्तनाचा, शोषणाचा किंवा तस्करीचा धोका आहे किंवा ते आधीच धोक्यात आले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, त्वरित पोलिसांशी संपर्क साधा. तुम्ही पोलिसांकडे आधीच तक्रार केली असल्यास आणि तरीही तुम्हाला मदत हवी असल्यास, तुम्ही वर्तनाची तक्रार Google कडे करू शकता.

बगल देणे

आमच्या धोरणांना बगल देण्याचा, तुमच्या खात्यावर लावलेली निर्बंधने हटवण्याचा, किंवा इतर Google उत्पादने यांमधील काढून टाकलेला आशय वितरित करण्याचा हेतू असलेल्या कृत्यांमध्ये सहभाग घेऊ नका.

यामध्ये याचा समावेश आहे पण त्यापुरता मर्यादित नाही:

  • यामध्ये याआधी प्रतिबंधित असलेल्या वर्तनामध्ये गुंतण्यासाठी एकाहून अधिक खाती किंवा इतर पद्धती तयार करणे अथवा वापरण्याचा समावेश आहे.
  • Google Play डेव्हलपर धोरणे यांद्वारे निलंबित अ‍ॅप्स सार्वजनिकरीत्या शेअर करणे.
  • YouTube सामुदायिक मार्गदर्शक तत्त्वे यांचे पालन न करणारे व्हिडिओ सार्वजनिकरीत्या शेअर करणे.

आम्हाला बगल देण्याविषयी सूचित केले असल्यास आम्ही योग्य कारवाई करू, ज्यामध्ये फाइल शेअर करण्यावर निर्बंध आणणे, आमच्या काही उत्पादनांचा अ‍ॅक्सेस काढून टाकणे किंवा तुमचे Google खाते बंद करण्याचा समावेश असू शकतो.

धोकादायक आणि बेकायदेशीर ॲक्टिव्हिटी
बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटींमध्ये सामील होण्यासाठी किंवा लोकांना किंवा प्राण्यांना गंभीर आणि ताबडतोब इजा होणार्‍या अ‍ॅक्टिव्हिटी, वस्तू, सेवा किंवा माहितीचा प्रचार करण्यासाठी हे उत्पादन वापरू नये. आम्ही या आशयाबद्दल शैक्षणिक, माहितीपट, वैज्ञानिक किंवा कलात्मक उद्देशांनी सामान्य माहितीसह परवानगी देत असताना, हानी करणे सुलभ बनवणार्‍या किंवा बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटींना प्रोत्साहन देणार्‍या आशयावर मर्यादा घालतो. आम्हाला बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटींबद्दल सूचित केले असल्यास आम्ही योग्य कारवाई करू, ज्यामध्ये तुम्ही संबंधित अधिकार्‍यांना तक्रार करण्याचा, आमच्या काही उत्पादनांचा अ‍ॅक्सेस काढून टाकण्याचा किंवा तुमचे Google खाते बंद करण्याचा समावेश असू शकतो.
फसवणूक करणाऱ्या क्रिया व घोटाळा
आर्थिक फायदा किंवा वैयक्तिक हानीसाठी वापरकर्त्यांची फसवणूक करू नका, त्यांची दिशाभूल करू नका अथवा त्यांना गोंधळात टाकू नका. या हानीमध्ये घोटाळ्यांबाबत सूचना देणे, भरती करणे आणि सुलभ करणे यांचा समावेश आहे. फसव्या आशयामध्ये बनावट पुनरावलोकने, “झटपट श्रीमंत व्हा” योजना, आगाऊ शुल्क, रोमान्स, स्वीपस्टेक आणि गुंतवणुकीशी संबंधित घोटाळे यांचा समावेश होतो, पण त्यापुरताच मर्यादित नाही.
उत्पीडन, धमकावणे आणि धोके
इतरांना छळू किंवा धमकावू नका. आम्ही या अ‍ॅक्टिव्हिटींमध्ये सहभाग घेण्यासाठी किंवा इतरांना उत्तेजन देण्यासाठी हे उत्पादन वापरण्याची परवानगी देत नाही. एखाद्या व्यक्तीने दुर्भावनापूर्ण गैरवापर करणे, एखाद्याला गंभीर हानी करून धमकावणे, एखाद्या अनैच्छिक मार्गाने एखाद्याला लैंगिकरीत्या त्रास देणे, शोषित व्यक्तीला धमकी देण्यासाठी तिची खाजगी माहिती उघड करणे, हिंसा किंवा त्रस्त व्यक्तीचा तिरस्कार करणे, तिच्याबद्दल अवमानकारक बोलणे, या अ‍ॅक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी किंवा एखाद्याला इतर मार्गांनी छ्ळ करण्यास इतरांना उत्तेजन देणे या गोष्टींचा समावेश आहे. लक्षात ठेवा की ऑनलाइन छळवणूक अनेक ठिकाणी बेकायदेशीर आहे आणि छळवणूक करणारी व्यक्ती आणि शोषित व्यक्ती दोघांवरही त्याचे गंभीर ऑफलाइन परिणाम होऊ शकतात. आम्हाला हानी किंवा इतर धोकादायक परिस्थितींच्या धोक्यांबद्दल सूचित केल्यास आम्ही योग्य कारवाई करू, ज्यामध्ये तुम्ही संबंधित अधिकार्‍यांना तक्रार करणे, आमच्या काही उत्पादनांचा अ‍ॅक्सेस काढून टाकणे किंवा तुमचे Google खाते बंद करणे यांचा समावेश असू शकतो.
द्वेषयुक्त भाषण
द्वेषयुक्त भाषण देऊ नका. द्वेषयुक्त भाषण हा असा आशय असतो ज्याचे प्राथमिक उद्दिष्ट हे वंश किंवा वांशिक मूळ, धर्म, विकलांगत्व, वय, राष्ट्रीयत्व, ज्येष्ठत्व, लैंगिक प्राधान्य, लिंग, लिंगाधारित ओळख किंवा पद्धतशीरपणे भेदभाव अथवा मागासपणाशी संबंधित इतर वैशिष्ट्यांच्या आधारावर एखादी व्यक्ती किंवा गटाबद्दल द्वेष उत्पन्न करणे, त्यांच्याविरूद्धच्या हिंसेला प्रोत्साहन देणे किंवा त्याकडे गांभीर्याने न पाहाणे हे असते.
तोतयेगिरी आणि दिशाभूल

एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची तोतयागिरी करू नका किंवा स्वतःची दिशाभूल करू नका. तुम्ही प्रतिनिधित्व करत नसलेल्या कोणत्याही व्यक्तीकिंवा संस्थेची तोतयागिरी करणे किंवा वापरकर्त्याची/साइटची ओळख, पात्रता, मालकी, उद्देश, उत्पादने, सेवा किंवा व्यवसायाच्या वापराबद्दलदिशाभूल करणारी माहिती देणे यांचा समावेश आहे.

यामध्ये त्यांची मालकी किंवा त्यांचा प्राथमिक हेतू चुकीच्या पद्धतीने दाखवणे किंवा लपवणे जसे की, तुमचा मूळ देश अथवा तुमच्या स्वतःच्या देशाव्यतिरिक्त इतर देशातील वापरकर्त्यांना राजकारण, सामाजिक समस्या किंवा जनतेशी संबंधित समस्येबाबतचा आशय दाखवता तेव्हा तुमच्याबद्दलचे चुकीचे तपशील दाखवणे किंवा ते जाणीवपूर्वक लपवणे या गोष्टींचादेखील समावेश आहे. आम्ही विडंबन, उपहास आणि उपनाम किंवा टोपणनावे वापरण्याची परवानगी देतो. फक्त तुमच्या खऱ्या ओळखीबद्दल वाचकांची दिशाभूल होण्याची शक्यता असलेला आशय टाळा.

मालवेअर आणि तत्सम दुर्भावनायुक्त आशय
मालवेअर किंवा नेटवर्क, सर्व्हर, अंतिम वापरकर्ता डिव्हाइस किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चरच्या ऑपरेशनला हानी पोहोचवणारा किंवा हस्तक्षेप करणारा कोणताही आशय प्रसारित करू नका. यात मालवेअर, व्हायरस, विध्वंसक कोड किंवा इतर हानीकारक किंवा नको असलेले सॉफ्टवेअर किंवा तत्सम आशयाचे थेट होस्टिंग, एम्बेड करणे किंवा प्रसारित करणे याचा समावेश आहे. यामध्ये व्हायरस पसरवणारा, पॉप-अपचे कारण ठरणारा, वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्याचा प्रयत्न करणारा किंवा द्वेषयुक्त कोड अशा आशयाचा देखील समावेश आहे. अधिक माहितीसाठी आमची सुरक्षित ब्राउझिंग धोरणे पहा.
दिशाभूल करणारा आशय

वापरकर्त्यांची फसवणूक करणारा, दिशाभूल करणारा किंवा संभ्रमात टाकेल असा आशय वितरित करू नका. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

नागरी आणि लोकशाही प्रक्रियांशी संबंधित दिशाभूल करणारा आशय:  उघडपणे खोटा असलेला आणि नागरी किंवा लोकशाही प्रक्रियेमधील सहभागाला किंवा विश्वासाला लक्षणीयरीत्या नुकसान पोहोचवू शकेल असा आशय. यामध्ये सार्वजनिक मतदान प्रक्रिया, राजकीय उमेदवारांची वय/जन्मस्थळावर आधारित पात्रता, निवडणुकांचे निकाल किंवा अधिकृत सरकारी रेकॉर्डशी परस्परविरोध असणार्‍या जनगणनेतील सहभाग यांबद्दलच्या माहितीचा समावेश आहे. एखाद्या राजकीय व्यक्तीचा किंवा शासकीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे, अपघात झाला आहे अथवा त्याला अचानक एखादा गंभीर आजार झाला आहे अशा चुकीच्या दाव्यांचादेखील यामध्ये समावेश आहे.

हानिकारक षड्यंत्राच्या सिद्धांतांशी संबंधित दिशाभूल करणारा आशय: व्यक्ती किंवा गट हे मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी कृत्ये पद्धतशीरपणे करत आहेत अशा समजुतींचा प्रचार करणारा किंवा त्याविषयी विश्वासार्हता निर्माण करणारा आशय. हा आशय ठोस पुराव्यांशी विसंगत आहे आणि त्यामुळे हिंसाचार झाला आहे किंवा भडकवण्यात आला आहे.

आरोग्याबाबत हानिकारक पद्धतींशी संबंधित दिशाभूल करणारा आशय: व्यक्तींना गंभीर शारीरिक किंवा मानसिक आघात अथवा लोकांच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकणार्‍या पद्धतींमध्ये सहभागी होण्यासाठी इतरांना प्रवृत्त करणारा किंवा प्रोत्साहन देणारा, दिशाभूल करणारा आरोग्याशी संबंधित अथवा वैद्यकीय आशय.

फेरफार केलेला मीडिया: ज्यामुळे गंभीर हानी होण्याचा धोका असू शकतो असा, तंत्रज्ञान वापरून कुशलतेने हाताळला गेलेला किंवा वापरकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी तयार केलेला मीडिया.

 

विनासंमती तयार झालेली इंटिमेट इमेजरी (NCII)

एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय खाजगी असलेली नग्न, लैंगिकदृष्ट्या भडक किंवा इंटिमेट इमेज अथवा व्हिडिओ स्टोअर किंवा वितरित करू नका. कोणीतरी तुमची खाजगी नग्न, लैंगिकदृष्ट्या भडक किंवा इंटिमेट इमेज किंवा व्हिडिओ पाठवला असल्यास, कृपया त्याबाबत आमच्याकडे येथे तक्रार करा.

वैयक्तिक आणि गोपनीय माहिती
इतर लोकांची वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती ऑथोरायझेशनशिवाय स्टोअर किंवा वितरित करू नका. यात यूएस सोशल सिक्युरिटी नंबर, बँक खाते नंबर, क्रेडिट कार्ड नंबर, स्वाक्षर्‍याची इमेज आणि वैयक्तिक आरोग्य दस्तऐवज यांसारख्या संवेदनशील माहितीचा वापर समाविष्ट आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये जेथे ही माहिती इंटरनेटवर किंवा सार्वजनिक रेकॉर्डमध्ये इतरत्र उपलब्ध आहे, जसे की सरकारी वेबसाइटवर सूचीबद्ध राष्ट्रीय आयडी क्रमांक, तेथे सामान्यत: अंमलबजावणी क्रियांवर आम्ही प्रक्रिया करत नाही.
फिशिंग
हे उत्पादन फिशिंगसाठी वापरू नका. यामध्ये पासवर्ड, आर्थिक तपशील आणि सोशल सीक्युरिटी नंबर यांसारख्या संवेदनशील डेटाचा आग्रह करणे किंवा तो गोळा करणे याचा समावेश आहे. 
नियमन केलेल्‍या वस्तू आणि सेवा
नियमन केलेल्या वस्तू आणि सेवांची विक्री, जाहिरात किंवा सुलभीकरण करू नका. नियमन केलेल्या वस्तू आणि सेवांमध्ये दारू, जुगार, औषधनिर्माण, अस्वीकृत पूरक आहार, तंबाखू, फटाके, शस्त्रे किंवा आरोग्य/वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश आहे.
सुस्पष्ट लैंगिक साहित्य
नग्नता, ग्राफिक लैंगिक कृत्ये आणि पोर्नोग्राफ असलेले साहित्य यासारखे लैंगिकरीत्या सुस्पष्ट साहित्य असलेला आशय वितरित करू नका. यामध्ये व्यावसायिक अश्लील साइटवर ट्रॅफिक आणण्याचा समावेश आहे. आम्ही शैक्षणिक, माहितीपट किंवा कलात्मक उद्देशांसाठी नग्नतेला अनुमती देतो.
स्पॅम
स्पॅम करू नका. यात नको असलेला प्रचारात्मक किंवा व्यावसायिक आशय, ऑटोमेटेड प्रोग्रामद्वारे तयार केलेला नको असलेला आशय, नको असलेला एकाच प्रकारचा आशय, असंबद्ध आशय किंवा सामूहिक विनंतीसारखे दिसते असे काहीही यांचा समावेश असू शकतो.
सिस्टम हस्तक्षेप आणि गैरवापर
या उत्पादनाचा गैरवापर करू नका आणि Google किंवा इतरांच्या नेटवर्क, डिव्हाइस किंवा इतर ऑपरेशनला हानी पोहोचवू नका, मानहानी करू नका किंवा त्यावर नकारात्मक परिणाम होईल असे काही करू नका. यामध्ये उत्पादनाच्या कोणत्याही पैलू किंवा त्यातील सेवा निकृष्ट करणे, बंद करणे किंवा नकारात्मकपणे हस्तक्षेप करणे याचा समावेश आहे. आम्हाला सिस्टम हस्तक्षेप आणि गैरवापराबद्दल सूचित केले असल्यास आम्ही योग्य कारवाई करू, ज्यामध्ये आमच्या उत्पादनांचा अ‍ॅक्सेस काढून टाकण्याचा किंवा तुमचे Google खाते बंद करण्याचा समावेश असू शकतो.
अल्पवयीनांच्या अनधिकृत इमेज
लहान मुलाचे पालक, देखभाल करणारे किंवा कायदेशीर प्रतिनिधी यांच्याकडून स्पष्ट संमती घेतल्याशिवाय अल्पवयीनांचे फोटो स्टोअर किंवा वितरित करू नका. एखाद्याने आवश्यक संमती न घेता अल्पवयीनांचे फोटो स्टोअर केले किंवा वितरित केले असल्यास, कृपया त्याची आम्हाला तक्रार करा.
हिंसा आणि रक्तपात
प्रामुख्याने धक्कादायक, खळबळजनक असलेला किंवा अहेतुक असा उद्देश असलेला वास्तविक जीवनातील लोक किंवा प्राण्यांचा समावेश असलेला हिंसक किंवा गमतीदार आशय स्टोअर किंवा वितरित करू नका यात मोडतोड करणे किंवा विकृत शवांचे क्लोज-अप फुटेज यांसारख्या अल्ट्रा-ग्राफिक हिंसेचा समावेश आहे. बर्‍याच प्रमाणात रक्त दाखवला जाणारा आशय यासारख्या ग्राफिक साहित्याला शैक्षणिक, माहितीपट, वैज्ञानिक किंवा कलात्मक संदर्भात अनुमती दिली जाऊ शकते, पण कृपया लोकांना हा संदर्भ कळावा यासाठी कृपया पुरेशी माहिती पुरवण्याची काळजी घ्या. काही बाबतींत, आशय एवढा हिंसक किंवा धक्कादायक असू शकतो की त्यामागे कितीही संयुक्तिक पार्श्वभूमी असली तरी तो आशय आमच्या प्लॅटफॉर्मवर राहू दिला जाणार नाही. अखेरीस, इतरांना ठरावीक हिंसक कृत्ये करण्यास प्रोत्साहन देऊ नका.
हिंसक संस्था आणि चळवळी

ज्ञात हिंसक गैर-सरकारी संस्था आणि चळवळींना हे उत्पादन कोणत्याही हेतूसाठी वापरण्याची परवानगी नाही. या गटांच्या अ‍ॅक्टिव्हिटी जसे की, भर्ती करणे, ऑनलाइन किंवा ऑफलाइन अ‍ॅक्टिव्हिटीचे समन्वय साधणे, मॅन्युअल किंवा हानी पोहोचवू शकणारे इतर साहित्य शेअर करणे, हिंसक गैर-सरकारी संस्थांच्या विचारसरणीचा प्रचार करणे, दहशतवादी कृत्यांचा प्रचार करणे, हिंसाचाराला उत्तेजन देणे किंवा हिंसक गैर-सरकारी संस्थांद्वारे केलेले हल्ले साजरे करणे या गोष्टी सुलभ करणारा किंवा त्यांना प्रोत्साहन देणारा आशय वितरित करू नका. आशयावर अवलंबून, आम्ही वापरकर्त्यावर कारवाईदेखील करू शकतो. हिंसक गैर-सरकारी संस्थांशी संबंधित आशयाला शैक्षणिक, माहितीपट, वैज्ञानिक किंवा कलात्मक संदर्भात अनुमती दिली जाऊ शकते, पण कृपया लोकांना संदर्भ समजण्यात मदत करण्यासाठी पुरेशी माहिती प्रदान करण्याचे लक्षात ठेवा.

अतिरिक्त धोरणे

आशय वापर आणि सबमिशन

टेम्पलेट गॅलरीसाठी धोरणे

Google Docs मध्ये कदाचित तृतीय पक्ष आशय सादर करणार्‍या गॅलरी असू शकतात ("आशय गॅलरी"). आशय गॅलरींमध्ये मर्यादेशिवाय टेम्पलेट गॅलरी आणि Google तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्याकरिता स्वतःच्या विवेकबुद्धीने निवडत असलेली कोणतीही गॅलरी असते.
आशय गॅलरींमधील आशय आणि माहिती ("गॅलरी आशय"), जसे की टेम्पलेट, Google किंवा तृतीय पक्षांनी तयार केलेला आहे. तुम्ही आणि गॅलरी आशयचे निर्माणकर्ते यांच्या मध्ये असल्याप्रमाणे, कोणतीही बौद्धिक संपदा किंवा मालकी अधिकार निर्माणकर्त्याकडे राहतात.
गॅलरी आशय: (a) फक्त सूचना म्हणून काम करण्यासाठी आहे; आणि (b) तो व्यावसायिक सल्ला किंवा ठरावीक, अधिकारयुक्त माहिती अथवा निर्देशन यांचा पर्याय नाही.
गॅलरी आशय तुमच्या उद्देशांसाठी काम करेल किंवा ते व्हायरस, बग अथवा इतर दोषांपासून मुक्त आहे असे Google वचन देत नाही. गॅलरी आशय "जसा आहे" तत्त्वावर आणि कोणत्याही प्रकारच्या वॉरंटीशिवाय पुरवला जातो. गॅलरी आशय वापरण्याची जोखीम तुम्ही एकटे घेता. Google आणि तिचे पुरवठादार गॅलरी आशय च्या संदर्भात कोणत्याही स्पष्ट वॉरंटी, हमी आणि नियम पुरवत नाहीत. लागू कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, विक्रीयोग्यता, विशिष्ट उद्देशासाठी फिटनेस, कार्यक्षम प्रयत्न, शीर्षक आणि ना-उल्लंघन यांच्या सर्व अभिप्रेत वॉरंटी आणि नियम Google वगळते.
तुम्ही आशय गॅलरीचा भाग बनण्यासाठी आशय सबमिट करणे निवडल्यास, तुम्ही Google आणि तिच्या सहयोगी कंपन्यांना तुमचे गॅलरी सबमिशन Google Docs मध्ये होस्ट करण्याची, त्याच्याशी लिंक करण्याची किंवा इतर प्रकारे अंतर्भूत करण्याचे निर्देश आणि परवानगी देता आणि तुम्हीGoogle आणि तिच्या अंतिम वापरकर्त्यांना खाली नमूद केल्याप्रमाणे गॅलरी सबमिशनमध्ये अधिकार अंमलात आणण्याचा जागतिक, रॉयल्टी-मुक्त, विशेष नसलेला परवाना देता:
  • गॅलरी सबमिशन पुनरुत्पादित करणे;
  • गॅलरी सबमिशनची साधित कार्ये तयार आणि पुनरुत्पादित करणे;
  • गॅलरी सबमिशनच्या प्रती सार्वजनिकरीत्या दाखवणे आणि वितरित करणे;
  • गॅलरी सबमिशनच्या साधित कार्यांच्या प्रती सार्वजनिकरीत्या दाखवणे आणि वितरित करणे.

तुम्ही सहमती दर्शवता की Google अंतिम वापरकर्त्यांसाठीचा परवाना शाश्वत असेल. त्याव्यतिरिक्त, शंका दूर करण्यासाठी, तुम्ही Google Docs मार्फत सबमिट केलेले गॅलरी सबमिशन सिंडिकेट करण्याचा आणि Google देत असलेल्या कोणत्याही सेवेच्या संबंधात गॅलरी सबमिशन वापरण्याचा अधिकार Google राखून ठेवते आणि तुम्ही तो Google ला देता. Google Docs आशय गॅलरी मार्फत गॅलरी सबमिशन वितरित करणे कधीही थांबवण्याचा अधिकार तुम्ही राखून ठेवता; मात्र, अशा कोणत्याही निवडीमुळे या सेवा अटींअंतर्गत Google अंतिम वापरकर्त्यांना दिला गेलेला परवाना मागे घेतला जाणार नसेल तरच. Google Docs आशय गॅलरी मार्फत गॅलरी सबमिशन थांबवण्यासाठी, तुम्ही सेवेमध्ये पुरवली गेलेली काढण्याची कार्ये वापरणे आवश्यक आहे, ज्यामुळे गॅलरी सबमिशन काढणे रास्त वेळेच्या आत प्रभावात येईल.

तुम्ही प्रतिनिधित्व करता आणि हमी देता की (a) तुम्ही Google Docs मार्फत सबमिट करत असलेल्या सर्व गॅलरी सबमिशनचे आवश्यक कायदेशीर अधिकार तुमच्या मालकीचे आहेत किंवा तुम्ही मिळवले आहेत आणि Google अंतिम वापरकर्त्यांना गॅलरी सबमिशन उपलब्ध असेपर्यंत हे अधिकार तुम्ही कायम राखाल; आणि (b) तुम्ही Google Docs मार्फत सबमिट करत असलेली सर्व गॅलरी सबमिशन पोस्ट केलेल्या प्रोग्राम धोरणांचे पालन करतील.

तुम्ही Google Docs मार्फत सबमिट करत असलेल्या कोणत्याही गॅलरी सबमिशनवर Google मालकीचा दावा करत नाही. कॉपीराइट आणि गॅलरी सबमिशनमध्ये तुमच्याकडे आधीपासून असलेल्या सर्व बौद्धिक संपदा अधिकारांसह, इतर कोणतेही अधिकार तुम्ही राखून ठेवता. तुम्ही सहमती दर्शवता की या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात आणि तुमच्या वतीने तसे करणे हे Google चे कर्तव्य नाही.

तुम्ही सहमती दर्शवता की तुम्ही करत असलेल्या कोणत्याही गॅलरी सबमिशनसाठी तुम्ही एकटे जबाबदार आहात (आणि त्यासाठी Google तुम्हाला किंवा कोणत्याही तृतीय पक्षाला जबाबदार नाही). तुमची गॅलरी सबमिशन अ‍ॅक्सेस करणार्‍या Google अंतिम वापरकर्त्यांच्या पुढील वापरासाठी किंवा गैरवापरासाठी Google कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही.

कोणतीही किंवा सर्व गॅलरी सबमिशन तिच्या एकटीच्या विवेकबुद्धीने काढण्याचा अधिकार Google राखून ठेवते.

Google तुमची टेम्पलेट सबमिशन कशी वापरू शकते

तुम्ही आशय गॅलरीचा भाग बनण्यासाठी आशय सबमिट करणे निवडल्यास, तुम्ही Google आणि तिच्या सहयोगी कंपन्यांना तुमचे गॅलरी सबमिशन Google Docs मध्ये होस्ट करण्याची, त्याच्याशी लिंक करण्याची किंवा इतर प्रकारे अंतर्भूत करण्याचे निर्देश आणि परवानगी देता आणि तुम्ही Google आणि तिच्या अंतिम वापरकर्त्यांना खाली नमूद केल्याप्रमाणे गॅलरी सबमिशनमध्ये अधिकार अंमलात आणण्याचा जागतिक, रॉयल्टी-मुक्त, विशेष नसलेला परवाना देता:

  • गॅलरी सबमिशन पुनरुत्पादित करणे;
  • गॅलरी सबमिशनची साधित कार्ये तयार आणि पुनरुत्पादित करणे;
  • गॅलरी सबमिशनच्या प्रती सार्वजनिकरीत्या दाखवणे आणि वितरित करणे;
  • गॅलरी सबमिशनच्या साधित कार्यांच्या प्रती सार्वजनिकरीत्या दाखवणे आणि वितरित करणे.

तुम्ही सहमती दर्शवता की Google अंतिम वापरकर्त्यांसाठीचा परवाना शाश्वत असेल. त्याव्यतिरिक्त, शंका दूर करण्यासाठी, तुम्ही Google Docs मार्फत सबमिट केलेले गॅलरी सबमिशन सिंडिकेट करण्याचा आणि Google देत असलेल्या कोणत्याही सेवेच्या संबंधात गॅलरी सबमिशन वापरण्याचा अधिकार Google राखून ठेवते आणि तुम्ही तो Google ला देता. Google Docs आशय गॅलरी मार्फत गॅलरी सबमिशन वितरित करणे कधीही थांबवण्याचा अधिकार तुम्ही राखून ठेवता; मात्र, अशा कोणत्याही निवडीमुळे या सेवा अटींअंतर्गत Google अंतिम वापरकर्त्यांना दिला गेलेला परवाना मागे घेतला जाणार नसेल तरच. Google Docs आशय गॅलरी मार्फत गॅलरी सबमिशन थांबवण्यासाठी, तुम्ही सेवेमध्ये पुरवली गेलेली काढण्याची कार्ये वापरणे आवश्यक आहे, ज्यामुळे गॅलरी सबमिशन काढणे रास्त वेळेच्या आत प्रभावात येईल.

तुम्ही प्रतिनिधित्व करता आणि हमी देता की (a) तुम्ही Google Docs मार्फत सबमिट करत असलेल्या सर्व गॅलरी सबमिशनचे आवश्यक कायदेशीर अधिकार तुमच्या मालकीचे आहेत किंवा तुम्ही मिळवले आहेत आणि Google अंतिम वापरकर्त्यांना गॅलरी सबमिशन उपलब्ध असेपर्यंत हे अधिकार तुम्ही कायम राखाल; आणि (b) तुम्ही Google Docs मार्फत सबमिट करत असलेली सर्व गॅलरी सबमिशन पोस्ट केलेल्या प्रोग्राम धोरणांचे पालन करतील.

तुम्ही Google Docs मार्फत सबमिट करत असलेल्या कोणत्याही गॅलरी सबमिशनवर Google मालकीचा दावा करत नाही. कॉपीराइट आणि गॅलरी सबमिशनमध्ये तुमच्याकडे आधीपासून असलेल्या सर्व बौद्धिक संपदा अधिकारांसह, इतर कोणतेही अधिकार तुम्ही राखून ठेवता. तुम्ही सहमती दर्शवता की या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात आणि तुमच्या वतीने तसे करणे हे Google चे कर्तव्य नाही.

तुम्ही सहमती दर्शवता की तुम्ही करत असलेल्या कोणत्याही गॅलरी सबमिशनसाठी तुम्ही एकटे जबाबदार आहात (आणि त्यासाठी Google तुम्हाला किंवा कोणत्याही तृतीय पक्षाला जबाबदार नाही). तुमची गॅलरी सबमिशन अ‍ॅक्सेस करणार्‍या Google अंतिम वापरकर्त्यांच्या पुढील वापरासाठी किंवा गैरवापरासाठी Google कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही.

कोणतीही किंवा सर्व गॅलरी सबमिशन तिच्या एकटीच्या विवेकबुद्धीने काढण्याचा अधिकार Google राखून ठेवते.

संपूर्ण Google सेवा अटी वाचा.

कॉपीराइट उल्लंघन
कॉपीराइट कायद्यांचा आदर करा. कॉपीराइट केलेला आशय ऑथोरायझेशनशिवाय शेअर करू नका किंवा कॉपीराइट असलेला आशय लोक अनधिकृतरीत्या डाउनलोड करू शकतील अशा साइटच्या लिंक पुरवू नका. कथित कॉपीराइट उल्लंघनांच्या स्पष्ट सूचनांना प्रतिसाद देणे हे आमचे धोरण आहे. कॉपीराइटसह, बौद्धिक संपदा अधिकारांच्या पुनःपुन्हा केलेल्या उल्लंघनाचा परिणाम म्हणून खाते बंद केले जाईल. तुम्हाला Google च्या कॉपीराइट धोरणांचे उल्लंघन दिसल्यास, कॉपीराइट उल्लंघनाची तक्रार करा.
आशय वितरण 

Google Drive तुम्हाला व्हिडिओ आशय स्टोअर, शेअर आणि स्ट्रीम करू देते, पण तो आशय वितरण नेटवर्कऐवजी वापरला जाऊ नये. मोठ्या प्रमाणावरील सार्वजनिक स्ट्रीमिंगसाठी, YouTube हा उत्तम पर्याय आहे. Google Drive मोठ्या प्रमाणावरील सार्वजनिक स्ट्रीमिंगसाठी वापरले जात असल्याचे दिसून आल्यास ते वापरावर मर्यादा आणेल. वारंवार केलेल्या उल्लंघनांचा परिणाम म्हणून अतिरिक्त कारवाई केली जाऊ शकते, ज्यामध्ये तुमचे खाते किंवा तुमचा Google Drive चा वापर बंद करणे समाविष्ट आहे.

तुमच्या सोयीसाठी आमच्या धोरणांची भाषांतरे पुरवली गेली आहेत. या धोरणाचा मजकूर आणि धोरणाचा इंग्रजी भाषेतील आवृत्तीचा मजकूर यांमध्ये परस्परविरोध असल्यास, धोरणाच्या इंग्रजी भाषेतील आवृत्तीच्या मजकुराला प्राधान्य दिले जाईल. 
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
9837871410228487060
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false