Google Sheets मध्ये सारण्या वापरणे

Google Sheets मध्ये, सारण्या या डेटा तयार करणे सुलभ करू शकतात आणि डेटाच्या रेंजमध्ये आपोआप फॉरमॅट व रचना लागू करून डेटाला वारंवार फॉरमॅट, इनपुट आणि अपडेट करण्याची आवश्यकता कमी करू शकतात.

पुढील प्रकारच्या माहितीचा माग ठेवण्यासाठी आणि ती संगतवार लावण्यासाठी सारण्या योग्य आहेत:

  • प्रोजेक्टचा माग ठेवणे
  • इव्हेंटचे नियोजन
  • इन्व्हेंटरीचे व्यवस्थापन

सारणीचे मुख्य ३ भाग असतात:

  • प्रत्येक स्तंभासाठी, तुम्ही स्तंभाचा योग्य प्रकार सेट करू शकता. तुमची सारणी तुम्ही एंटर केलेला सर्व डेटा अलाइन केलेला असल्याची खात्री करते.
  • तुम्हाला युनिफाइड मेनूचा ॲक्सेस आहे. तुम्ही मेनूमधून सारणी पातळीवरील सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकता आणि तुमच्या सारणीसाठी फिल्टर व्ह्यू तयार करण्यासारख्या कृती करू शकता.
  • तुम्ही आधीच संरचित आणि फॉरमॅट केलेले बिल्डिंग ब्लॉक घालू शकता.

सध्याच्या डेटाचे सारणीमध्ये रूपांतर करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, शीट उघडा.
  2. रिक्त किंवा डेटा असलेल्या सेलची रेंज निवडा.
  3. मेनू बार वर, फॉरमॅट आणि त्यानंतर सारणीमध्ये रूपांतर करा वर क्लिक करा.
  4. प्रत्येक स्तंभासाठी स्तंभाचा योग्य प्रकार निवडा.

स्तंभाच्या प्रकारांबद्दल अधिक जाणून घ्या.

स्तंभाच्या काही प्रकारांसाठी, प्लेसहोल्डर चिप या सहजपणे डेटा एंटर केला जाण्यासाठी आपोआप भरल्या जातात. एखाद्या स्तंभासाठी प्लेसहोल्डर चिप बंद करण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, सारणी असलेली शीट उघडा.
  2. सारणीच्या हेडरच्या शेजारी, स्तंभ मेनू उघडा.
  3. स्तंभाचा प्रकार संपादित करा वर क्लिक करा.
  4. प्लेसहोल्डर दाखवा या चौकटीतली खूण काढून टाका.

आधीपासून तयार केलेल्या सारण्या घालून सुरुवात करणे

सर्वसाधारण वापरासंबंधित नमुने समाविष्ट असलेल्या टेंप्लेटद्वारे तुम्ही पूर्वनिर्धारित रचना असलेली नवीन सारणी घालू शकता.

तुम्ही तुमच्या वापरासंबंधित नमुन्याशी जुळणारी टेंप्लेट निवडू शकता. यावर जा:

  • @ मेनू:
    • @ आणि त्यानंतर सारण्या यावर क्लिक करा
  • घाला मेनू:
    • घाला आणि त्यानंतर सारण्या यावर क्लिक करा

मेनूच्या दोन्ही पर्यायांसाठी एक साइडबार उघडेल, जिथे तुम्ही एक किंवा आधीच तयार केलेले एकाहून अधिक बिल्डिंग ब्लॉक ब्राउझ करू शकता, त्यांचे पूर्वावलोकन करू शकता आणि ते घालू शकता.

स्तंभाचे प्रकार सेट करणे

सारणीच्या स्तंभाचे प्रकार हे तुम्हाला स्तंभातील तुमचा डेटा संगतवार लावण्यात, फॉरमॅट करण्यात आणि चुकीच्या डेटा प्रकारांची तक्रार करून एरर टाळण्यात मदत करतात. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या स्तंभाचा प्रकार म्हणून "तारीख" निवडल्यास, ते या प्रकाराला फॉलो न करणाऱ्या स्तंभामधील सेलसाठी चेतावणी दाखवतात.

तुम्ही पुढीलपैकी कोणताही प्रकार निवडू शकता:

  • संख्या
    • टक्केवारी
    • चलन
    • मजकूर
  • तारीख
    • तारीख
    • वेळ
    • तारीख आणि वेळ
  • ड्रॉपडाउन
  • चेकबॉक्स
  • स्‍मार्ट चिप
    • माहिती चिप
    • फाइल चिप
    • अर्थव्यवहारविषयक चिप
    • ठिकाणविषयक चिप
    • रेटिंग चिप
  • काहीही नाही: तुम्ही हा पर्याय निवडल्यास, आम्ही तुमच्या स्तंभावर स्तंभाचा प्रकार लागू करणार नाही. तुम्हाला मिश्रित डेटा प्रकारांना सपोर्ट करणारा सोयीस्कर स्तंभ हवा असल्यास, हा पर्याय निवडा.

सारणी मेनू वापरणे

तुम्ही तुमची सारणी सेटिंग्ज नियंत्रित करू शकता आणि नंतर सारणी मेनूद्वारे ती कस्टमाइझ करू शकता. सारणी मेनू वापरण्यासाठी, तुमच्या सारणीच्या तळाशी, सारणी  आणि त्यानंतर मेनू अधिक यावर क्लिक करा. 

सारणी मेनूमध्ये, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • तुमच्या सारणीचे नाव बदलणे
  • सारणी रेंज अ‍ॅडजस्ट करणे
  • रंगबदल बंद करणे
  • तुमच्या सारणीचे रंग कस्टमाइझ करणे
  • सारणीचे फॉरमॅटिंग काढून टाकणे
  • तुमची सारणी हटवणे
  • फीडबॅक पाठवणे

टीप: तुम्ही तुमच्या डेटाचे सारणीमध्ये रूपांतर करता, तेव्हा आम्ही मूलभूत फॉरमॅटिंग आपोआप लागू करतो. तुम्ही तुमची सारणी पुढे कस्टमाइझ करू शकता आणि:

  • पंक्तीची उंची पुन्हा ॲडजस्ट करू शकता
  • रंगबदल काढून टाकू शकता
  • रंगबदल बदलू शकता
  • फॉंटची शैली बदलू शकता

सारणीचे संदर्भ वापरणे

सारणीचे संदर्भ हे फॉर्म्युलामध्ये सारणी किंवा सारणीच्या भागांचा संदर्भ देण्याचा विशेष मार्ग आहेत. तुम्ही तुमच्या डेटाचे रूपांतर सारणीमध्ये करता, तेव्हा आम्ही तिला एक नाव देतो, तसेच प्रत्येक स्तंभाला हेडर देतो. तुम्ही ती नावे सारणीमधील सेलचे संदर्भ देण्यासाठी वापरू शकता. उदाहरणार्थ: तुम्ही सेलचे स्पष्ट संदर्भ देण्याऐवजी: =Sum(C2:C7), सारणीचे संदर्भ वापरू शकता: =SUM(DeptSales[Sales Amount].

तुम्ही सारणीमधील घटकांचा नाव वापरून संदर्भ देता, तेव्हा सारणीमध्ये तुम्ही डेटा जोडल्यास किंवा काढून टाकल्यास संदर्भ अपडेट होतात.

सारणी व्ह्यू वापरणे

व्ह्यू वापरून, इतर लोक शीटवर काय पाहत आहे यावर परिणाम न करता तुम्ही तुमचा महत्त्वाचा डेटा शोधू शकता. तुम्ही विशिष्ट पंक्ती दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी व्ह्यू वापरू शकता आणि डेटा कसा व्हिज्युअलाइझ करावा हे व्यवस्थापित करण्यासाठी इतर कॉंफिगरेशन लागू करू शकता.

फिल्टर करण्यासाठी आणि क्रमाने लावण्यासाठी प्रत्येक दृश्याचे स्वतःचे युनिक कॉंफिगरेशन असू शकते.

  • नवीन दृश्ये तयार करण्यासाठी, सारणी मेनू , यावर क्लिक करा आणि त्यानंतर पुढीलपैकी एक निवडा:
    • दृश्यानुसार गट तयार करा
      • यामुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या फील्डनुसार एकत्र गटबद्ध केलेल्या पंक्ती पाहता येतात.
    • फिल्टर दृश्य तयार करा

टीप: स्प्रेडशीट रिफ्रेश केल्यानंतर तात्पुरती दृश्ये नाहीशी होतात.

  • सद्य दृश्ये लागू करण्यासाठी, सारणी मेनू   आणि त्यानंतर  सद्य दृश्याचे नाव यावर क्लिक करा.

सारण्यांबाबत फीडबॅक देणे

तुम्हाला काही समस्या असल्यास किंवा हे वैशिष्ट्य बदलून आम्हाला सुधारणा करण्यात मदत करायची असल्यास, तुम्ही आम्हाला फीडबॅक सबमिट करू शकता.

फीडबॅक सबमिट करण्यासाठी:

  • सारणी मेनूवरील "फीडबॅक पाठवा" हा पर्याय वापरा.
  • तुमच्या शीटच्या सर्वात वरती, मदत आणि त्यानंतर Sheets मध्ये सुधारणा करण्यात मदत करा यावर क्लिक करा.
true
Visit the Learning Center

Using Google products, like Google Docs, at work or school? Try powerful tips, tutorials, and templates. Learn to work on Office files without installing Office, create dynamic project plans and team calendars, auto-organize your inbox, and more.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2912045567021268102
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false