पत्रकांमध्‍ये संरक्षित करा, लपवा आणि संपादित करा

पत्रक किंवा रेंजचे संरक्षण करा

लोकांनी स्प्रेडशीटमधील आशय बदलणे तुम्हाला नको असल्यास, तुम्ही त्याचे संरक्षण करू शकता. हे सुरक्षितता उपाययोजना म्हणून वापरले जाऊ नये. लोक संरक्षित स्प्रेडशीटच्या प्रती प्रिंट, कॉपी, पेस्ट आणि इंपोर्ट व एक्सपोर्ट करू शकतात. फक्त तुमचा विश्वास असलेल्या लोकांसोबत स्प्रेडशीट शेअर करा.

टीप: "संरक्षित पत्रके आणि रेंज" दृश्यमान नसल्यास, तुम्ही Microsoft Office संपादनामध्ये असण्याची शक्यता आहे. पत्रके आणि रेंजचे संरक्षण वापरण्यासाठी, तुमची फाइल Google Sheets मध्ये रूपांतरित करा. Office संपादनाविषयी आणि Microsoft Office फाइल कशा रूपांतरित करायच्या याबद्दल जाणून घ्या.

रेंज किंवा पत्रकाचे संरक्षण करा
 1. Google Sheets मध्ये स्‍प्रेडशीट उघडा.
 2. डेटा आणि त्यानंतर संरक्षित पत्रके आणि रेंज वर क्लिक करा. उजवीकडे एक बॉक्‍स उघडेल.
 3. पत्रक किंवा रेंज जोडा किंवा सध्याचे संरक्षण संपादित करण्यासाठी त्यावर क्लिक करा.
 4. रेंजचे संरक्षण करण्यासाठी, रेंज वर क्लिक करा. पत्रकाचे संरक्षण करण्यासाठी, पत्रक वर क्लिक करा.
  • रेंज: तुम्ही संरक्षण करत असलेली रेंज बदलण्यासाठी किंवा एंटर करण्यासाठी, स्प्रेडशीट आयकनवर क्लिक करा आणि स्प्रेडशीटमधील रेंज हायलाइट करा.
  • पत्रक: संरक्षण करण्यासाठी पत्रक निवडा. तुम्हाला सेलचा संच पत्रकामध्ये असंरक्षित राहायला हवा असल्यास, "ठरावीक सेल वगळता" च्या बाजूच्या बॉक्समध्ये खूण करा.
 5. परवानग्या सेट करा किंवा परवानग्या बदला वर क्लिक करा.
 6. तुम्हाला संपादन कसे मर्यादित करायचे आहे ते निवडा:
  • एखादी व्यक्ती संपादन करत असताना चेतावणी दाखवण्यासाठी: "ही रेंज संपादित करताना चेतावणी दाखवा" निवडा. हे लोकांना संपादन करण्यापासून ब्लॉक करत नाही, परंतु त्यांना खरोखर संपादन करायचे आहे का हे निश्चित करण्यास सांगणारा मेसेज त्यांना दिसेल.
  • रेंज किंवा पत्रक कोण संपादित करू शकते ते निवडण्यासाठी: "ही रेंज कोण संपादित करू शकते ते मर्यादित करा" निवडा. निवडा:
   • फक्त तुम्ही: फक्त तुम्ही (आणि तुम्ही मालक नसल्यास, मालक) रेंज किंवा पत्रक संपादित करू शकता.
   • फक्त डोमेन: तुम्ही ऑफिस किंवा शाळेसाठी Google Sheets वापरत असल्यास, फक्त तुमच्या डोमेनमधील लोक रेंज किंवा पत्रक संपादित करू शकतात. तुमच्या डोमेनमधील प्रत्येकजण स्प्रेडशीट संपादित करू शकत असेल तरच हा पर्याय उपलब्ध आहे.
   • कस्टम: फक्त तुम्ही निवडलेले लोक रेंज किंवा पत्रक संपादित करू शकतात.
   • दुसर्‍या रेंजवरून परवानग्या कॉपी करा: तुम्ही वेगळ्या सेलच्या संचावर किंवा पत्रकावर सेट केलेल्या परवानग्याच पुन्हा वापरा.
 7. सेव्ह करा किंवा पूर्ण झाले वर क्लिक करा.

संरक्षित सेल पाहण्यासाठी, पहा आणि त्यानंतर संरक्षित रेंज क्लिक करा. सेलच्या वर पट्टे असलेले बॅकग्राउंड दिसेल.

रेंज किंवा पत्रकाचे संरक्षण कोण करू शकते
 • स्प्रेडशीट तुमच्या मालकीची असल्यास: रेंज आणि पत्रक कोण बदलू शकते ते तुम्ही ठरवू शकता.
 • तुम्ही स्प्रेडशीट संपादित करू शकत असल्यास: रेंज आणि पत्रक कोण संपादित करू शकते ते तुम्ही ठरवू शकता, परंतु मालकांकडून परवानग्या काढून घेऊ शकत नाही.
 • तुम्ही स्प्रेडशीट पाहू किंवा तिच्यावर टिप्पणी देऊ शकत असल्यास: तुम्हाला कोणतेही बदल करता येणार नाहीत.
संरक्षित पत्रकाची प्रत संपादित करा
 • तुम्ही संपादित करू शकत असल्यास: तुम्ही संरक्षित पत्रकाची प्रत बनवू, वर्कबुक कॉपी करू शकता किंवा नवीन आवृत्ती अपलोड करू शकता.
 • तुम्ही पाहू शकत असल्यास, परंतु संपादित करू शकत नसल्यास: तुम्ही स्प्रेडशीटची प्रत बनवू शकता.

व्‍ह्यूमधून पत्रके लपवा

तुम्‍ही जुनी किंवा अन्‍य पत्रकांवर वापरलेल्‍या मोजण्यांसाठी प्‍लेसहोल्‍डर असलेली पत्रके लपवू शकता.

पत्रक लपवणे पत्रक संरक्षित करण्‍यासारखे नाही.

 • सर्व स्‍प्रेडशीट संपादक दाखवू शकतो आणि ही पत्रके पाहू शकतो.
 • स्‍प्रेडशीट दर्शक लपवलेली पत्रके पाहू शकत नाहीत. एखाद्या व्यक्तीने स्प्रेडशीटची प्रत बनवल्यास, पत्रके लपवलेली राहतील, परंतु त्यांना पत्रके दाखवता येतील.
पत्रक लपवा किंवा दाखवा

पत्रक लपवण्यासाठी:

 1. Google Sheets मध्ये स्‍प्रेडशीट उघडा.
 2. तुम्हाला लपवायच्या असलेल्या पत्रकावर क्लिक करा.
 3. पत्रक टॅबवर, डाउन अ‍ॅरो डाउन अ‍ॅरो वर टॅप करा.
 4. पत्रक लपवा वर क्लिक करा. तुमच्या स्प्रेडशीटमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त पत्रके नसल्यास हा पर्याय दिसणार नाही.

पत्रक दाखवण्यासाठी:

 1. पहा आणि त्यानंतर लपवलेली पत्रके वर क्लिक करा. तुमच्या स्प्रेडशीटमध्ये कोणतीही लपवलेली पत्रके नसल्यास, हा पर्याय निकामी केलेला असेल.
 2. तुम्हाला यापुढे लपवलेले नको असलेल्या पत्रकावर क्लिक करा.
 3. स्प्रेडशीट पुन्हा दिसेल.
लपवलेली पत्रके असलेल्या स्प्रेडशीट इंपोर्ट आणि एक्सपोर्ट करा

तुम्ही पुढील गोष्टी केल्यास, लपवलेली पत्रके लपवलेली राहतील:

 • स्प्रेडशीट .pdf, .xls किंवा .ods फाइल म्हणून एक्सपोर्ट करणे.
 • स्प्रेडशीट .xls, .xlsx किंवा .ods फॉरमॅटमध्ये इंपोर्ट करणे.
 • स्प्रेडशीट "/htmlview" पॅरामीटरसोबत html वर एक्सपोर्ट करणे: तुम्ही URL मध्ये पेज पॅरामीटर (#gid=N) समाविष्ट केल्यास, लपवलेले पत्रक दिसेल.
 • स्प्रेडशीट प्रकाशित करा.

पत्रके संपादित करा

पत्रक कॉपी करा

तुम्ही स्प्रेडशीटमध्ये पत्रक कॉपी करू शकता. प्रती एकाच स्प्रेडशीटमध्ये किंवा वेगळ्या स्प्रेडशीटमध्ये बनवल्या जाऊ शकतात.

पत्रक दुसर्‍या स्प्रेडशीटवर कॉपी करण्यासाठी:

 1. पत्रक टॅबवर, डाउन अ‍ॅरो डाउन अ‍ॅरो वर टॅप करा.
 2. यावर कॉपी करा वर क्लिक करा.
 3. सूचीवरून गंतव्यस्थान स्प्रेडशीट निवडा.
 4. निवडा वर क्लिक करा.

स्‍प्रेडशीटमध्ये पत्रकाची प्रत बनवण्‍यासाठी:

 1. पत्रक टॅबवर, डाउन अ‍ॅरो डाउन अ‍ॅरो वर टॅप करा.
 2. डुप्लिकेट करा वर क्लिक करा.
 3. नवीन टॅबमध्ये मूळ पत्रकाच्या बाजूला डुप्लिकेट पत्रक दिसेल.
पत्रकांचा पुन्‍हा क्रम लावा

स्‍प्रेडशीटमध्‍ये पत्रकांचा क्रम बदलण्‍यासाठी, पत्रक तुम्‍हाला हव्‍या त्‍या क्रमात येईपर्यंत पत्रक टॅबवर क्लिक करा आणि तो ड्रॅग करा.

पत्रकाचे नाव बदला

स्प्रेडशीटमधील पत्रकाचे नाव बदलण्यासाठी, पत्रक टॅबवरील मजकुरावर डबल क्लिक करा आणि नवीन नाव टाइप करा.

पत्रक टॅबवर रंग जोडा

तुमचे पत्रक टॅब सहजपणे वेगळे ओळखता येण्यासाठी त्यांवर रंग जोडा.

 1. पत्रक टॅबवर, डाउन अ‍ॅरो डाउन अ‍ॅरो वर टॅप करा.
 2. रंग बदला वर क्लिक करा.
 3. रंग निवडा.
पत्रक हटवा
 1. तुम्हाला काढायच्या असलेल्या पत्रकावर क्लिक करा.
 2. पत्रक टॅबवर, डाउन अ‍ॅरो डाउन अ‍ॅरो वर टॅप करा.
 3. हटवा वर क्लिक करा.
 4. ओके वर क्लिक करा.
हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?