Google Docs मधून टास्क असाइन करणे

Docs मधील Tasks हे फक्त ऑफिस आणि शाळांच्या पात्र खात्यांसाठी उपलब्ध आहे आणि तुम्ही सध्या साइन इन केलेले नाही. ऑफिस किंवा शाळेच्या खात्यांविषयी अधिक जाणून घ्या.

तुमच्या ऑफिस खात्यामध्ये साइन इन करणे

तुम्ही ऑफिस किंचा शाळेच्या पात्र असलेल्या खात्यावर Google Docs वापरत असल्यास, तुम्ही डोमेनमध्ये स्वतःला किंवा इतर वापरकर्त्यांना टास्क असाइन करू शकता. तुम्ही वापरकर्त्याला असाइन केलेल्या टास्क या त्यांच्या वैयक्तिक Tasks सूचीमध्ये दिसतात. शेअर केलेल्या टास्कसह काम कसे करावे याबद्दल अधिक जाणून घ्या.

Google Docs मध्ये टास्क असाइन करणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Docs मध्ये, दस्तऐवज उघडा.
  2. दस्तऐवजामध्ये, @task एंटर करा आणि एंटर दाबा.
  3. पॉप-अप विंडोमध्ये, टास्क एंटर करा.
    1. तुम्ही चेकलिस्टमधूनदेखील टास्क तयार करू शकता.
      1. पर्याय निवडा:
        • फॉरमॅट करा आणि त्यानंतर बुलेट आणि अंकानुसार क्रमाने लावणे आणि त्यानंतर चेकलिस्ट निवडा.
        • दस्तऐवजामध्ये, @checklist एंटर करा आणि एंटर दाबा.
      2. चेकलिस्टमध्ये टास्क एंटर करा.
      3. चेकलिस्ट आयटमच्या डावीकडे, Tasks मध्ये जोडा वर क्लिक करा. पॉप-अप विंडो दिसेल.
  4. "असाइनी" फील्डमध्ये, तुम्हाला ज्या वापरकर्त्याला टास्क असाइन करायची आहे त्या वापरकर्त्याचे नाव एंटर करा.
    • तुम्ही स्वतःला किंवा तुमच्या डोमेनमधील इतर वापरकर्त्यांना एखादी टास्क असाइन करू शकता.
  5. पर्यायी: टास्कसाठी तारीख सेट करण्याकरिता, तारीख वर क्लिक करा आणि कॅलेंडरमधून तारीख निवडा.
  6. टास्क असाइन करण्यासाठी, जोडा वर क्लिक करा

महत्त्वाचे:

  • तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला टास्क असाइन करता, तेव्हा त्यांना तुमचा ईमेल अ‍ॅड्रेस असलेली ईमेल सूचना मिळते. ते त्यांच्या वैयक्तिक Tasks सूचीमध्ये आणि टास्कची तारीख सेट केलेली असल्यास, Google Calendar मध्ये टास्क पाहू शकतात. शेअर केलेल्या टास्कबद्दल अधिक जाणून घ्या.
  • अज्ञात वापरकर्ते Google Docs मध्ये Tasks असाइन किंवा संपादित करू शकत नाहीत.

Docs मध्ये टास्क पाहणे किंवा संपादित करणे

  1. Google Docs मध्ये, असाइन केलेल्या टास्कसह दस्तऐवज उघडा.
    • दस्तऐवजामधून असाइन केलेल्या सर्व टास्क पाहण्यासाठी, टूल आणि त्यानंतर Tasks वर जा. टास्क तुमच्या स्क्रीनच्या उजवीकडे प्रदर्शित केल्या जातात. तुमच्या दस्तऐवजामधील टास्कवर स्क्रोल करण्यासाठी, त्यावर क्लिक करा.
  2. असाइन केलेल्या चेकलिस्ट आयटमच्या डावीकडे, कर्सर आयकनवर माउस फिरवा.
    • टास्क पूर्ण झाली असल्यास, तिच्या शीर्षकावर ती खोडलेली असेल.
  3. टास्क संपादित करण्यासाठी:
    • शीर्षक: चेकलिस्ट आयटमचा मजकूर टाइप करा आणि अपडेट करण्यासाठी टॅब दाबा. 
    • असाइनी किंवा टास्कची तारीख: टास्क कार्डच्या तळाशी डावीकडे, संपादित करा वर क्लिक करा.
      • तुम्ही ज्या वापरकर्त्याला टास्क असाइन केली आहे त्याचे नाव संपादित केल्यास, याआधीचा असाइनी आणि नवीन असाइनी दोघांनाही ईमेल सूचना मिळेल. 

Docs मध्ये टास्क पूर्ण झाली म्हणून मार्क करणे

  1. Google Docs मध्ये, असाइन केलेल्या टास्कसह दस्तऐवज उघडा.
  2. असाइन केलेला चेकलिस्ट आयटम शोधा.
  3. दस्तऐवजामधील चेकबॉक्सवर क्लिक करा.
    • दस्तऐवजामध्ये टास्क पूर्ण झाली म्हणून मार्क केलेली असल्यास, असाइनीच्या वैयक्तिक Tasks सूचीमध्ये ती पूर्ण झालेली दिसेल आणि त्यांना ईमेल सूचना मिळेल.

Docs मध्ये टास्क हटवणे

  1. Google Docs मध्ये, असाइन केलेल्या टास्कसह दस्तऐवज उघडा.
  2. असाइन केलेल्या चेकलिस्ट आयटमच्या डावीकडे, कर्सर आयकनवर निर्देशित करा.
  3. हटवा काढा आणि त्यानंतर कंफर्म करा वर क्लिक करा

टिपा

  • दस्तऐवजामध्ये टास्क हटवली असल्यास, ती असाइनीच्या वैयक्तिक Tasks सूचीमध्ये दिसणार नाही. टास्क आधीच पूर्ण केलेली नसल्यास, असाइनीला ईमेल सूचना मिळेल.
  • दस्तऐवजामध्ये चेकलिस्ट आयटम हटवला असल्यास, परंतु टास्क आधी हटवली नसल्यास, ती अजूनही असाइनीच्या वैयक्तिक Tasks सूचीमध्ये दिसेल. टास्क पाहण्यासाठी आणि हटवण्यासाठी, टूल आणि त्यानंतर Tasks वर क्लिक करा.

Docs मधील टास्कची अपडेट व्यवस्थापित करणे

चेकलिस्ट आयटमच्या डावीकडील आयकनवर, निळा बिंदू दिसू शकतो. हे पुढील बाबतीत होऊ शकते:

  • कोणीतरी दस्तऐवजामधील चेकलिस्ट आयटम अपडेट केल्यास, परंतु टास्क अपडेट न केल्यास.
  • टास्कच्या असाइनीने Tasks मध्ये टास्कचे शीर्षक अपडेट केल्यास, परंतु दस्तऐवजामधील चेकलिस्ट मजकूर अपडेट न केल्यास.
  • कोणीतरी दस्तऐवज पूर्वीच्या आवृत्तीवर रिव्हर्ट केल्यास.

समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि निळा बिंदू काढून टाकण्यासाठी:

  1. निळा बिंदू असलेल्या टास्कवर कर्सर निर्देशित करा.
  2. पॉप-अप विंडोच्या तळाशी उजवीकडे, अपडेट करा वर क्लिक करा.

टीप: असाइनीने त्यांच्या वैयक्तिक Tasks सूचीमध्ये टास्क अपडेट केली किंवा हटवली, पण त्यांच्याकडे दस्तऐवजाचा संपादन अ‍ॅक्सेस नसेल, तरीदेखील टास्क आयकनवर निळा बिंदू दिसू शकतो.

  • याचे निराकरण करण्यासाठी, कर्सर निळ्या बिंदूवर निर्देशित करा आणि होय वर क्लिक करा
  • हे रोखण्यासाठी, असाइनीकडे दस्तऐवजाचा संपादन अ‍ॅक्सेस असल्याची खात्री करा.

टास्क सूचना बदला

तुम्हाला टास्कसाठी मिळत असलेल्या सूचना तुम्ही दस्तऐवजामध्ये बदलू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Doc, Sheet, किंवा Slide उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडील कोपऱ्यात, कमेंट इतिहास उघडा टिप्पण्या उघडा वर क्लिक करा.
  3. सूचना सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. तुम्हाला सूचना केव्हा मिळवायच्या आहेत ते निवडा.
    • सर्व टिप्पण्या आणि टास्क: कोणत्याही टास्क तयार केल्या किंवा बदलल्या जातात तेव्हा.
    • तुमच्यासाठी टिप्पण्या आणि टास्क: तुम्हाला सामील केलेल्या टास्क किंवा टिप्पण्यांवर इतर लोक उत्तर देतात तेव्हा.
    • कोणतीही नाही: त्या फाइलसाठी टिप्पण्या किंवा टास्कबद्दल कधीही ईमेल मिळवू नका.

संबंधित लेख

true
Visit the Learning Center

Using Google products, like Google Docs, at work or school? Try powerful tips, tutorials, and templates. Learn to work on Office files without installing Office, create dynamic project plans and team calendars, auto-organize your inbox, and more.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11563501355507645616
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false