Google Docs, Slides आणि Drawings मध्ये मार्कडाउन वापरणे

तुमच्या Google Docs, Slides आणि Drawings यांमध्ये फॉरमॅटिंगशी संबंधित घटक झटपट जोडण्यासाठी तुम्ही मार्कडाउन वापरू शकता. मार्कडाउन वापरून तुम्ही पुढील गोष्टी जोडण्यासाठी मजकूर फॉरमॅट करू शकता:

  • आयटॅलिक 
  • ठळक
  • स्ट्राइकथ्रू
  • लिंक

Google Docs वर, तुम्ही वेगवेगळी शीर्षके तयार करण्यासाठी मार्कडाउन देखील वापरू शकता.

मार्कडाउन सुरू किंवा बंद करा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Docs, Google Slides किंवा Google Drawings मध्ये फाइल उघडा.
  2. टूल आणि त्यानंतर प्रधान्ये वर जा.
  3. “मार्कडाउन आपोआप डिटेक्ट करा” च्या बाजूच्या चौकटीत खूण करा/चौकटीतील खूण काढून टाका.

मार्कडाउन वापरून मजकूर आयटॅलिक करा, ठळक करा आणि स्ट्राइकथ्रू करा

  • मजकूर हा आयटॅलिक स्वरुपात फॉरमॅट करण्यासाठी, तो एक ताराचिन्ह किंवा अंडरस्कोअर वापरून बंद करा.
  • मजकूर हा ठळक स्वरुपात फॉरमॅट करण्यासाठी, तो दोन ताराचिन्हे किंवा अंडरस्कोअर वापरून बंद करा.
  • मजकूर हा आयटॅलिक आणि ठळक स्वरूपात फॉरमॅट करण्यासाठी, तो तीन ताराचिन्हे किंवा अंडरस्कोअर वापरून बंद करा.
  • मजकूर हा स्ट्राइकथ्रू मध्ये फॉरमॅट करण्यासाठी, तो एक टिल्ड वापरून बंद करा.

मार्कडाउन मधील मजकूर

हे कसे दिसते

हा मजकूर _आयटॅलिक_ आहे. 

हा मजकूर *आयटॅलिक* आहे.

हा मजकूर आयटॅलिक आहे.

हा मजकूर __ठळक__आहे. 

हा मजकूर **ठळक** आहे.

हा मजकूर ठळक आहे.

हा मजकूर ___आयटॅलिक आणि ठळक___. 

हा मजकूर ***आयटॅलिक आणि ठळक***.

हा मजकूर आयटॅलिक आणि ठळक आहे.

हा मजकूर ~स्ट्राइकथ्रू~ मध्ये आहे.

हा मजकूर स्ट्राइकथ्रू मध्ये आहे.

मार्कडाउन वापरून लिंक जोडणे

मार्कडाउन वापरून लिंक तयार करा: 

  1. कंसामध्ये (उदा. [Google Docs]) लिंक केलेला मजकूर लिहा.
  2. कंसातील मजकुरानंतर, कंसामध्ये URL लिहा (उदा. (https://docs.google.com/document/)).
    • महत्त्वाचे: कंसातील मजकूर आणि कंसातील URL मध्ये स्पेस देऊ नका.

मार्कडाउन मधील मजकूर

हे कसे दिसते

[Google Docs](https://docs.google.com/document/) मध्ये फाइल उघडे.

Google Docs मध्ये फाइल उघडा.

Google Docs मध्ये मार्कडाउन वापरून शीर्षके तयार करणे

तुम्ही Google Docs वर असल्यास, तुम्ही कमाल सहा वेगवेगळी शीर्षके तयार करण्यासाठी मार्कडाउन देखील वापरू शकता.

शीर्षक तयार करण्यासाठी,

  1. परिच्छेदाच्या सुरुवातीपासून सुरू करा.
  2. तुमच्या शीर्षकाच्या मजकुराच्या समोर नंबर चिन्ह (#) जोडा. तुम्ही वापरता ती संख्या ही चिन्हाच्या नंबरनुसार शीर्षकावर अवलंबून असते.
    • उदाहरणार्थ, शीर्षक २ तयार करण्यासाठी, दोन वेळा नंबर चिन्हे वापरा (उदा., ## माझे हेडर).
  3. तुमच्या शीर्षकाचा मजकूर लिहा.
    • महत्त्वाचे: तुम्ही संख्या चिन्ह(न्हे) आणि शीर्षकाचा मजकूर यांदरम्यान स्पेस दिली असल्याची खात्री करा.

मार्कडाउन मधील मजकूर

हे कसे दिसते

# शीर्षक १

शीर्षक १

## शीर्षक २

शीर्षक २

### शीर्षक ३

शीर्षक ३

#### शीर्षक ४

शीर्षक ४

##### शीर्षक ५

शीर्षक ५

###### शीर्षक ६

शीर्षक ६

संबंधित लेख

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2697036581447824632
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false