दस्तऐवजाचा पेज सेटअप बदलणे: पेज किंवा पेजलेस

प्रत्येक दस्तऐवजावर, तुम्ही तुमच्या पेजचा सेटअप बदलू शकता आणि खालीलपैकी एक फॉरमॅट निवडू शकता:

  • पेज: पेज आणि पेज ब्रेक वापरून तुमचा Google दस्तऐवज सेट करा. या सेटिंगमध्ये, तुम्ही हेडर आणि फूटर, पेज नंबर व आणखी बऱ्याच गोष्टी यांसारखे घटक जोडू शकता. तुम्ही पेज ओरिएंटेशन आणि समासाचा आकार यांसारखी पेज सेटिंग्ज ॲडजस्ट करणे, हेदेखील करू शकता.
  • पेजलेस: तुमचा Google दस्तऐवज सेट करा जेणेकरून, तो पेज ब्रेकशिवाय सतत स्क्रोल होईल. या सेटिंगमध्ये, इमेज या तुमच्या स्क्रीनच्या आकारासह अ‍ॅडजस्ट करतील आणि तुम्ही रुंद सारण्या तयार करू शकता व डावीकडे आणि उजवीकडे स्क्रोल करून त्या पाहू शकता. मजकुरासाठीचे लाइन ब्रेक हे तुमच्या स्क्रीनच्या आकारनुसार आणि तुम्ही झूम इन व झूम आउट कराल त्यानुसारदेखील अ‍ॅडजस्ट होतील.

दस्तऐवजामध्ये पेज आहेत की तो पेजलेस आहे हे बदलण्यासाठी:

  1. तुमच्‍या काँप्युटरवर, Google Docs मध्ये दस्‍तऐवज उघडा.
  2. फाइल आणि त्यानंतर पेज सेटअप वर जा.
  3. डायलॉग विंडोच्या सर्वात वरती, पेज किंवा पेजलेस निवडा.
  4. कन्फर्म करण्यासाठी, ओके वर क्लिक करा.

टिपा:

  • तुम्ही तयार केलेल्या कोणत्याही नवीन दस्तऐवजांमध्ये ही सेटिंग्ज लागू करण्यासाठी, डीफॉल्ट म्हणून सेट करा वर क्लिक करू शकता.
  • कधीही फॉरमॅट स्विच करण्यासाठी, सर्वात वरती, फॉरमॅट वर क्लिक करा आणि पेजलेस फॉरमॅटवर स्विच करा किंवा पेज फॉरमॅटवर स्विच करा निवडा.

महत्त्वाचे: तुमच्या दस्तऐवजामध्ये हेडर आणि फूटर किंवा वॉटरमार्क यांसारखे काही घटक असल्यास व तुम्ही तो पेजलेसवर स्विच केल्यास, तुम्हाला ते घटक दिसणार नाहीत. तुम्ही दस्तऐवज पुन्हा पेजवर स्विच केल्यास, तुम्हाला ते घटक पुन्हा दिसतील.

तसेच, पेजलेस फॉरमॅटमध्ये असलेल्या दस्तऐवजावर, तुम्हाला स्तंभ, पेज नंबर, हेडर आणि फूटर यांसारखी वैशिष्‍ट्ये व आणखी बरेच काही जोडता येणार नाहीत. ती वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, तुमचा दस्तऐवज पेज फॉरमॅटमध्ये असल्याची खात्री करा.

पेजलेस दस्तऐवजांसाठी मजकुराची रुंदी बदला

तुम्ही पेजलेस दस्तऐवज पाहता, तेव्हा अरुंद, मध्यम आणि रुंद यांसारखी मजकुराची रुंदी निवडू शकता. तुम्ही पाहता त्या सर्व पेजवर तुम्हाला मजकुराची रुंदी सारखीच दिसेल. तुमची मजकुराच्या रुंदीची निवड ही कोलॅबोरेटर तुमचे दस्तऐवज कसे पाहतात यावर परिणाम करणार नाही.

तुमच्या पेजलेस मजकुराची रुंदी बदलण्यासाठी:

  1. तुमच्‍या काँप्युटरवर, Google Docs मध्ये दस्‍तऐवज उघडा.
    1. तुमचा दस्तऐवज पेजलेस फॉरमॅटमध्ये असल्याची खात्री करा.
  2. पहा आणि त्यानंतर मजकुराची रुंदी वर जा.
  3. एखादा पर्याय निवडा.

संबंधित लेख

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1977159124247542188
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false