Docs, Sheets आणि Slides मधील एंक्रिप्ट केलेल्या फाइलवर सहयोग करणे

एकाहून अधिक कोलॅबोरेटर वेगवेगळ्या वेळी एकाच फाइलवर सहयोग करू शकतात, पण तुम्ही एंक्रिप्ट केलेल्या फाइलमध्ये रीअल-टाइममध्ये सहयोग करू शकत नाही. इतर कोलॅबोरेटर असल्यास, त्यांचे आयकन नेहमीप्रमाणे सर्वात वर उजवीकडे दिसतात.

महत्त्वाचे: तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर क्लायंट-साइडच्या एंक्रिप्ट केलेल्या फाइलचे पूर्वावलोकन करण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी, तुमच्या ॲडमिनने तुम्हाला अ‍ॅक्सेस देणे आवश्यक आहे.

एकाहून अधिक कोलॅबोरेटरसोबत काम करणे

तुम्ही फाइल उघडल्यास आणि कोणीतरी ती आधीच संपादित करत असल्यास, सर्वात वर उजवीकडे, तुम्हाला “संपादित करण्यासाठी प्रतीक्षा करा” सूचना मिळते. मूळ कोलॅबोरेटरशी बोलण्यासाठी, सूचनेच्या तळाशी, त्यांच्याशी चॅट करा.

तुम्ही संपादित करत असलेली फाइल कोणीतरी उघडल्यास, सर्वात वरती उजवीकडे, तुम्हाला “कोणीतरी नुकतेच सामील झाले” अशी सूचना मिळते. नवीन कोलॅबोरेटरशी बोलण्यासाठी, सूचनेच्या तळाशी, त्यांच्याशी चॅट करा वर क्लिक करा.

तुम्हाला "संपादित करणे सुरक्षित" सूचना मिळाल्यास, तुम्ही फाइल संपादित करू शकता.

परस्परविरोधी बदल टाळा

एकाहून अधिक कोलॅबोरेटर परस्परविरोधी बदल करत असल्यास, फाइलवरील सर्व कोलॅबोरेटरना सर्वात वर सूचना मिळते. 

  • रिफ्रेश करण्यासाठी आणि नवीनतम बदल पाहण्यासाठी, रिफ्रेश करा वर क्लिक करा.
  • नवीनतम टॅबमध्ये सर्वात अलीकडील बदल उघडून तुमच्या सेव्ह न केलेल्या बदलांची तुलना करण्यासाठी, तुलना करा वर क्लिक करा. 
  • सूचना काढून टाकण्यासाठी, डिसमिस करा वर क्लिक करा. तुम्ही जुनी आवृत्ती संपादित करणे पुढे सुरू ठेवू शकत नाही.

तुम्ही तुलना करा वर क्लिक केल्यानंतर, नवीन टॅब उघडतो आणि तुम्ही मूळ टॅबमधील कोणतीही संपादने कॉपी करू शकता. तुम्ही नवीन टॅबमध्ये संपादित करणे पुढे सुरू ठेवू शकता.

संबंधित लेख

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8217258599269987934
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false