Google Docs वर पेज सेटिंग्ज बदलणे

तुम्ही तुमच्या पेजचा आकार आणि समास अपडेट करू शकता किंवा तुमच्या Google दस्तऐवज याच्या पेजचे ओरिएंटेशन बदलू शकता.
महत्त्वाचे: ही वैशिष्ट्ये पेजलेस फॉरमॅटमध्ये असलेल्या दस्तऐवजांमध्ये उपलब्ध नाहीत. ही वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, तुमचा दस्तऐवज पेज फॉरमॅटमध्ये आहे याची खात्री करा.

Google दस्तऐवज याचा पेज सेटअप बदला

  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, गूगल डॉक्समध्‍ये एक दस्‍तऐवज उघडा.
  2. टूलबार मध्ये, फाइल आणि त्यानंतर पेज सेटअप वर क्लिक करा.
  3. डायलॉग विंडोच्या सर्वात वरती, पेज निवडा.
  4. तुम्हाला बदलायच्या असलेल्या सेटिंगवर जा:
    • ओरिएंटेशन
    • कागदाचा आकार
    • समास
    • पेजचा रंग
  5. तुम्हाला हवे असलेले बदल करा.
  6. ओके वर क्लिक करा.
    • टीप: तुम्ही तयार केलेल्या कोणत्याही नवीन दस्तऐवजांमध्ये ही सेटिंग्ज लागू करण्यासाठी, डीफॉल्ट म्हणून सेट करा वर क्लिक करू शकता.

एकाच Google Doc मध्ये मिश्र पेज ओरिएंटेशन

विस्तृत सारण्या, चार्ट आणि ग्राफिक फिट करण्यासाठी, एका दस्तऐवजामध्ये मिश्र पोर्ट्रेट आणि लँडस्केप लेआउट समाविष्ट असू शकतात. 

निवडीचे ओरिएंटेशन बदला 
  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Docs मध्‍ये दस्‍तऐवज उघडा.
  2. तुम्हाला ओरिएंटेशन बदलायचे असलेला मजकूर किंवा इमेज हायलाइट करा आणि त्यानंतर मजकूर किंवा इमेजवरराइट क्लिक करा.
  3. पेज लॅंडस्केपवर बदलणे किंवा पेज पोर्ट्रेटवर बदलणे निवडा. 
एका विभागाचे किंवा एकाहून अधिक विभागांचे ओरिएंटेशन बदला 
  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Docs मध्‍ये दस्‍तऐवज उघडा.
  2. तुम्हाला जेथे एकाहून अधिक विभाग तयार करायचे आहेत तेथे क्लिक करा.
  3. घाला आणि त्यानंतर ब्रेक आणि त्यानंतर विभाग ब्रेक वर जा.
  4. विभागाचे ओरिएंटेशन बदलण्यासाठी, फाइल आणि त्यानंतर पेज सेटअप किंवा फॉरमॅट आणि त्यानंतर पेजचे ओरिएंटेशन वर क्लिक करा.
    1. तुम्हाला फक्त निवडलेल्या विभागावर पेज ओरिएंटेशन लागू करायचे असल्यास, "यावर लागू करा" हे “हा विभाग” वर सेट करा. तुम्हाला हा विभाग आणि पुढील सर्व विभागांवर पेज ओरिएंटेशन लागू करायचे असल्यास, 'या विभागापासून' वर सेट करा.
    2. लागू करण्यासाठी ओरिएंटेशन निवडा.
    3. ओके वर क्लिक करा

टिपा:

  • तुमच्या दस्तऐवजामध्ये विभाग ब्रेक कुठे आहेत हे दाखवण्यासाठी, पहा  आणि त्यानंतर विभाग ब्रेक दाखवा वर क्लिक करा.
  • पेज आउटलाइन दाखवण्यासाठी, पहा आणि त्यानंतर पेज लेआउट दाखवा वर क्लिक करा.
  • तुम्ही संपूर्ण दस्तऐवजाचे ओरिएंटेशनदेखील बदलू शकता. फाइल  आणि त्यानंतर पेज सेटअप  आणि त्यानंतर यावर लागू करा: संपूर्ण दस्तऐवज वर क्लिक करा.

संबंधित लेख

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8252952515442419381
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false