तुमचे संगीत, व्हिडिओ आणि बरेच काही नियंत्रित करणे

Chrome टॅबमध्ये संगीत, व्हिडिओ किंवा आवाज प्ले करते ती कोणतीही गोष्ट नियंत्रित करा. 

Chrome च्या सर्व टॅबवर संगीत किंवा आवाज प्ले करा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. टॅबमध्ये संगीत, व्हिडिओ किंवा आवाज असलेली कोणतीही गोष्ट प्ले करा. तुम्ही त्याच टॅबवर राहू शकता किंवा दुसऱ्यावर नेव्हिगेट करू शकता. 
  3. आवाज नियंत्रित करण्यासाठी, सर्वात वरती उजवीकडे, मीडिया नियंत्रण Media control वर क्लिक करा. 
  4. तुम्ही थांबवू शकता, पुढील गाणे किंवा व्हिडिओवर जाऊ शकता अथवा गाणे वा व्हिडिओ प्ले होत असलेल्या टॅबवर परत जाण्यासाठी क्लिक करू शकता. 

टीप: तुम्ही त्याच टॅबमध्ये राहिलात किंवा दुसऱ्या टॅबवर गेलात, तरीही तुमचा मीडिया प्ले होत राहील. 

तुमच्या कॉंप्युटरवर तुमच्या डीफॉल्ट आवाज परवानग्या बदला

तुम्ही साइटना भेट दिल्यावर, त्यांना आवाज प्ले करू देण्यासाठी:
  1. Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा. 
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर साइट सेटिंग्ज आणि त्यानंतर आवाज वर क्लिक करा.
  4. तुम्हाला तुमचे डीफॉल्ट सेटिंग म्हणून हवा असलेला पर्याय निवडा.

Chrome च्या सर्व टॅबवर व्हिडिओ पाहा

तुम्ही ब्राउझ करत असलेल्या इतर टॅबच्या वरती लहान विंडोमध्ये, एका टॅबमधून व्हिडिओ प्ले करू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. टॅबमध्ये व्हिडिओ प्ले करा.
  3. इतर टॅबवर ब्राउझ करताना व्हिडिओ पाहण्यासाठी, सर्वात वरती उजवीकडे, मीडिया नियंत्रण Media control आणि त्यानंतर चित्रात-चित्र एंटर करा Enter picture-in-picture वर क्लिक करा. 

टीप: जागा पुन्हा बदलण्यासाठी, व्हिडिओच्या विंडोवर क्लिक करा आणि ड्रॅग करा.

उपलब्ध डिव्हाइसवर मीडिया कास्ट करा

महत्त्वाचे: डिव्हाइस उपलब्ध असतात, तेव्हाच कास्ट करा हा आयकन दिसतो.
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. टॅबमध्ये संगीत, व्हिडिओ किंवा आवाज असलेली कोणतीही गोष्ट प्ले करा. तुम्ही त्याच टॅबवर राहू शकता किंवा दुसऱ्यावर नेव्हिगेट करू शकता. 
  3. मीडिया नियंत्रणे उघडण्यासाठी, अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, मीडिया नियंत्रण Media control वर क्लिक करा. 
  4. पॉप-अपच्या तळाशी डाव्या कोपऱ्यात, डिव्हाइसवर कास्ट करा वर क्लिक करा.
  5. तुम्हाला ज्या डिव्हाइसवर कास्ट करायचे आहे ते निवडा.

तुमच्याकडे या वैशिष्‍ट्याविषयी फीडबॅक असल्यास, Chrome मध्ये फीडबॅक कसा पाठवायचा ते जाणून घ्या. Google Cast शी संबंधित फीडबॅक सबमिट करण्यासाठी, chrome://cast-feedback वर जा.

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13559651177079674056
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false