एरर आणि क्रॅश यांचा आपोआप अहवाल देणे सुरू करणे किंवा थांबवणे

आम्हाला आपोआप अहवाल पाठवण्याची Chrome ला अनुमती दिल्यामुळे, आम्हाला Chrome मध्ये कशाचे निराकरण करायचे आहे आणि कशामध्ये सुधारणा करायची आहे यांना प्राधान्य देण्यात मदत होते. या अहवालांमध्ये Chrome केव्हा क्रॅश होते, तुम्ही किती मेमरी वापरता आणि काही वैयक्तिक माहिती यांचा समावेश असू शकतो.

तुम्ही या अहवालांना कधीही अनुमती देणे सुरू करू किंवा थांबवू शकता.

काँप्युटर

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखीआणि त्यानंतरसेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. तुम्ही आणि Google आणि त्यानंतर सिंक व Google सेवा वर क्लिक करा.
  4. Chrome ची वैशिष्ट्ये आणि परफॉर्मन्स यांमध्ये सुधारणा करण्यात मदत करा हे सुरू किंवा बंद करा.

Chromebook

  1. तळाशी उजवीकडे, वेळ निवडा.
  2. सेटिंग्ज निवडा.
  3. डावीकडे, सुरक्षा आणि गोपनीयता वर क्लिक करा.
  4. ChromeOS ची वैशिष्ट्ये आणि परफॉर्मन्स यांमध्ये सुधारणा करण्यात मदत करा हे सुरू किंवा बंद करा.

टीप: तुम्ही तुमचे Chromebook ऑफिस किंवा शाळेमध्ये वापरत असल्यास, तुम्ही कदाचित हे सेटिंग बदलू शकणार नाही. अधिक मदतीसाठी, तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधणे हे करा.

या अहवालांमध्ये कशाचा समावेश आहे

Chrome क्रॅश झाल्यास, अहवालामध्ये काही वैयक्तिक माहितीचा समावेश केला जाऊ शकतो. या अहवालांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • क्रॅशसंबंधित मेमरी, ज्यामध्ये पेजचे आशय, पेमेंट माहिती आणि पासवर्ड यांचा समावेश असू शकतो
  • तुमची Chrome सेटिंग्ज
  • तुम्ही इंस्टॉल केलेली एक्स्टेंशन
  • क्रॅशच्या वेळी तुम्ही भेट देत असलेले वेब पेज
  • तुमच्या डिव्हाइसची ऑपरेटिंग सिस्टीम, उत्पादक आणि मॉडेल
  • तुम्ही ज्या देशामध्ये Chrome वापरता तो देश
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13348476736000214225
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false