तुम्ही सद्य कुकी हटवणे, तृतीय पक्ष कुकीना अनुमती देणे किंवा त्या ब्लॉक करणे आणि ठरावीक वेबसाइटसाठी प्राधान्ये सेट करणे निवडू शकता.
कुकी समजून घेणे
कुकी म्हणजे तुम्ही भेट देता त्या वेबसाइटनी तयार केलेल्या फाइल. तुमच्या भेटीबद्दलची माहिती सेव्ह करून, त्या तुमचा ऑनलाइन अनुभव आणखी सोपा बनवतात. उदाहरणार्थ, साइट तुम्हाला साइन इन केलेले ठेवू शकतात, तुमची साइट प्राधान्ये लक्षात ठेवू शकतात आणि तुम्हाला स्थानिकरीत्या सुसंबद्ध आशय देऊ शकतात.
कुकी २ प्रकारच्या असतात:
- प्रथम पक्ष कुकी: तुम्ही भेट देत असलेल्या साइटद्वारे तयार केल्या जातात. साइट ही अॅड्रेस बारमध्ये दाखवली जाते.
- तृतीय पक्ष कुकी: इतर साइटद्वारे तयार केल्या जातात. तुम्ही भेट देता ती साइट इतर साइटवरील आशय एंबेड करू शकते, उदाहरणार्थ, इमेज, जाहिराती आणि मजकूर. यांपैकी कोणत्याही साइट आशय आणि जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी व तुम्ही इतर साइटवर केलेल्या कृतींविषयी जाणून घेण्यासाठी तृतीय पक्ष कुकी वापरू शकतात.
टीप: काही साइट तुम्हाला कुकी स्वीकारण्यास किंवा नाकारण्यास प्रॉम्प्ट करू शकतात.
साइट इतर मार्गांनी आशय आणि जाहिराती पर्सनलाइझ करू शकतात. Chrome मधील जाहिरातीचे विषय आणि साइटने सुचवलेल्या जाहिराती यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे साइटना तुम्हाला पर्सनलाइझ केलेला आशय दाखवता येतो. साइट आणि त्यांचे भागीदार तुमच्याबद्दल काय जाणून घेऊ शकतात हे या वैशिष्ट्यांद्वारे मर्यादित केले जाते. ही वैशिष्ट्ये व्यवस्थापित करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
सर्व कुकी हटवा
महत्त्वाचे: तुम्ही कुकी हटवल्यास, तुम्हाला लक्षात ठेवणाऱ्या साइटवरून साइन आउट केले जाऊ शकते. तुमची सेव्ह केलेली प्राधान्येदेखील हटवली जाऊ शकतात. कुकी हटवली गेल्यावर प्रत्येक वेळी हे लागू होते.
- तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
- सर्वात वरती उजवीकडे, आणखी
ब्राउझिंग डेटा हटवा
निवडा.
- मूलभूत किंवा प्रगत
कुकी आणि इतर साइट डेटा निवडा.
- "वेळेची रेंज" च्या बाजूला, ड्रॉपडाउन मेनूमधून, ब्राउझिंग डेटाची तुम्हाला हटवायची आहे ती वेळेची रेंज निवडा:
- शेवटचा तास
- शेवटचे २४ तास
- शेवटचे ७ दिवस
- शेवटचे ४ आठवडे
- आतापर्यंत
- तुम्हाला हटवायचे आहे त्या इतर आयटमवर खूण करा.
- कन्फर्म करण्यासाठी, डेटा हटवा निवडा.
ठरावीक कुकी हटवा
- तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
- सर्वात वरती उजवीकडे, आणखी
सेटिंग्ज
निवडा.
- गोपनीयता आणि सुरक्षा
तृतीय पक्ष कुकी निवडा.
- सर्व साइट डेटा आणि परवानग्या पहा निवडा.
- सर्वात वरती उजवीकडे, वेबसाइटचे नाव शोधा.
- साइटच्या उजवीकडे, हटवा
निवडा.
- कन्फर्म करण्यासाठी, हटवा निवडा.
तुमची तृतीय पक्ष कुकी सेटिंग्ज बदला
तुम्ही कोणत्याही साइटसाठी तृतीय पक्ष कुकीना अनुमती देऊ शकता किंवा त्या ब्लॉक करू शकता.
तृतीय पक्ष कुकीना अनुमती द्या किंवा ब्लॉक करामहत्त्वाचे:
- तुम्ही साइटना कुकी सेव्ह करण्याची अनुमती न दिल्यास, साइट कदाचित अपेक्षेप्रमाणे काम करणार नाहीत. प्रथम पक्ष कुकी व्यवस्थापित करण्यासाठी, Chrome मधील डिव्हाइसवरील साइट डेटाबद्दल अधिक जाणून घ्या.
- बाय डीफॉल्ट, गुप्त मोडमध्ये तृतीय पक्ष कुकी ब्लॉक केल्या जातात. गुप्त मोडमध्ये ब्राउझ कसे करावे याबद्दल जाणून घ्या.
तुम्ही बाय डीफॉल्ट तृतीय पक्ष कुकीना अनुमती देऊ शकता किंवा त्या ब्लॉक करू शकता.
- तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
- सर्वात वरती उजवीकडे, आणखी
सेटिंग्ज
निवडा.
- गोपनीयता आणि सुरक्षा
तृतीय पक्ष कुकी निवडा.
- पर्याय निवडा:
- तृतीय पक्ष कुकीना अनुमती द्या.
- तृतीय पक्ष कुकी ब्लॉक करा.
- तुम्ही तृतीय पक्ष कुकी ब्लॉक केल्यास, तुमच्या एक्सेप्शनच्या सूचीमध्ये साइटला अनुमती दिली नसल्यास, इतर साइटवरील सर्व तृतीय पक्ष कुकी ब्लॉक केल्या जातात.
महत्त्वाचे:
- तुम्ही ऑफिसमध्ये किंवा शाळेमध्ये तुमचे Chromebook वापरत असल्यास, कदाचित हे सेटिंग बदलू शकणार नाही. अधिक मदतीसाठी, तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा.
- गुप्त मोडमध्ये, तृतीय पक्ष कुकी बाय डीफॉल्ट ब्लॉक केल्या जातात.
तृतीय पक्ष कुकी ब्लॉक केल्या असल्यास, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या काही साइट कदाचित अपेक्षेप्रमाणे काम करणार नाहीत. विशिष्ट साइटसाठी तृतीय पक्ष कुकीना अनुमती देण्यासाठी, तुम्ही त्यांना तुमच्या एक्सेप्शन सूचीमध्ये जोडू शकता. या सूचीमधील साइट नियमित आणि गुप्त अशा दोन्ही ब्राउझिंग मोडमध्ये तृतीय पक्ष कुकी वापरू शकतात.
- तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
- सर्वात वरती उजवीकडे, आणखी
सेटिंग्ज निवडा.
- गोपनीयता आणि सुरक्षा
तृतीय पक्ष कुकी निवडा.
- "तृतीय पक्ष कुकी वापरण्याची अनुमती दिलेल्या साइट" अंतर्गत, जोडा निवडा.
- वेब ॲड्रेस एंटर करा.
- संपूर्ण डोमेनसाठी, एक्सेप्शन तयार करण्यासाठी, डोमेनच्या नावाआधी
[*.]वापरा. उदाहरणार्थ,[*.]google.comहेdrive.google.comआणिcalendar.google.comसह जुळेल. - तुम्ही आयपी ॲड्रेसदेखील वापरू शकता किंवा
http://ने सुरू न होणारा वेब ॲड्रेस वापरू शकता.
- संपूर्ण डोमेनसाठी, एक्सेप्शन तयार करण्यासाठी, डोमेनच्या नावाआधी
- जोडा निवडा.
तुम्हाला यापुढे नको असलेले एक्सेप्शन काढून टाकण्यासाठी, वेबसाइटच्या उजवीकडे, काढून टाका निवडा.
- तुम्ही नियमित ब्राउझिंग मोडमध्ये हे सेटिंग लागू केल्यास, साइट तुमच्या एक्सेप्शन सूचीमध्ये जोडली जाते. साइटला ९० दिवसांसाठी किंवा तुम्ही सेटिंग बंद करेपर्यंत, तृतीय पक्ष कुकी वापरण्याची अनुमती दिली जाते.
- तुम्ही गुप्त मोडमध्ये हे सेटिंग लागू केल्यास, ते सेटिंग फक्त तुमच्या गुप्त सेशनच्या कालावधीपुरतेच लागू राहते.
- तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
- ॲड्रेस बारमध्ये, सर्वात वरती डावीकडे:
- तृतीय पक्ष कुकीना अनुमती देण्यासाठी: तृतीय पक्ष कुकी ब्लॉक केल्या आहेत निवडा
आणि तृतीय पक्ष कुकी सुरू करा.
- तृतीय पक्ष कुकी ब्लॉक करण्यासाठी: तृतीय पक्ष कुकीना अनुमती दिली आहे निवडा
आणि तृतीय पक्ष कुकी बंद करा.
- तृतीय पक्ष कुकीना अनुमती देण्यासाठी: तृतीय पक्ष कुकी ब्लॉक केल्या आहेत निवडा
- डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी आणि पेज रीलोड करण्यासाठी, बंद करा
निवडा. तो बंद करण्यासाठी, तुम्ही डायलॉग बॉक्सच्या बाहेर कुठेही निवडूदेखील शकता.
- पेज रीलोड झाल्यावर, तुमच्या सेटिंग्जनुसार ॲड्रेस बारमध्ये “तृतीय पक्ष कुकीना अनुमती दिली आहे” किंवा “तृतीय पक्ष कुकी ब्लॉक केल्या आहेत” हे दिसेल.
टीप: हा पर्याय तात्पुरता असतो आणि फक्त तुम्ही ज्या साइटवर आहात त्या साइटवर लागू होतो.
acme-music.example आणि acme-video.example दरम्यान स्विच करता, तेव्हा तुम्हाला साइन इन केलेले ठेवावे असे कंपनीला वाटू शकते.संबंधित साइटना तुमची गटामधील ॲक्टिव्हिटी पाहण्याची अनुमती देण्यासाठी:
- तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
- सर्वात वरती उजवीकडे, आणखी
सेटिंग्ज निवडा.
- गोपनीयता आणि सुरक्षा
तृतीय पक्ष कुकी निवडा.
- तृतीय पक्ष कुकी ब्लॉक करा निवडा.
- संबंधित साइटना तुमची गटामधील अॅक्टिव्हिटी पाहण्याची अनुमती द्या हे सुरू किंवा बंद करा.
एकाच गटामधील संबंधित साइट दाखवण्यासाठी:
- तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
- सर्वात वरती उजवीकडे, आणखी
सेटिंग्ज निवडा.
- गोपनीयता आणि सुरक्षा
तृतीय पक्ष कुकी
सर्व साइट डेटा व परवानग्या पहा निवडा.
- साइट निवडा.
- एकाच गटामधील साइट दाखवण्यासाठी, ड्रॉप डाउन ॲरो
निवडा.
टीप: संबंधित साइट शोधण्यासाठी, ॲड्रेस बारमध्ये, साइटची माहिती पहा
कुकी आणि साइट डेटा
डिव्हाइसवरील साइट डेटा व्यवस्थापित करा निवडा.
तुम्ही भेट दिलेल्या साइट या इतर साइटवरून आशय एंबेड करू शकतात, उदाहरणार्थ, इमेज, जाहिराती, मजकूर आणि टेक्स्ट एडिटर किंवा हवामान विजेट यांसारखी वैशिष्ट्येदेखील. या इतर साइट त्यांचा आशय योग्यरीत्या काम करण्यासाठी तुमच्याविषयी सेव्ह केलेली माहिती (सहसा कुकी वापरून सेव्ह केलेली) वापरण्याची परवानगी मागू शकतात.
उदाहरणार्थ, कल्पना करा, की तुम्ही सामान्यतः docs.google.com वर दस्तऐवज तयार करता. शाळेची टास्क पूर्ण करताना, तुम्हाला Google Docs चा थेट ॲक्सेस देणाऱ्या शाळेच्या क्लास पोर्टलवरून विद्यार्थ्यांशी सहयोग करणे आवश्यक आहे. तुमच्या परवानगीने:
- तुम्ही तुमच्या शाळेची साइट वापरत असताना Google Docs त्याच्या तृतीय पक्ष कुकी ॲक्सेस करू शकते, ज्यामुळे साइट आणि Google Docs यांच्यादरम्यान कनेक्शन निर्माण होते.
- यामुळे तुम्ही कोण आहात याची पडताळणी करणे, तुमची माहिती शोधणे आणि साइटवरील दस्तऐवजामध्ये तुम्ही केलेले बदल सेव्ह करणे याची Google Docs ला अनुमती मिळू शकते.
काही बाबतीत, तुम्ही साइट ब्राउझ करत असताना, तुमची ॲक्टिव्हिटी ट्रॅक करण्यासाठी ही माहिती वापरली जाऊ शकते. तुमचा विश्वास असलेल्या साइटसाठी एंबेड केलेल्या आशयाला तुमचा डेटा ॲक्सेस करण्याची अनुमती कधी द्यावी हे तुम्ही ठरवू शकता.
टीप: कनेक्शन कुकीचा वापर करते आणि ३० दिवसांकरिता किंवा तुम्ही अॅक्टिव्ह असेपर्यंत उपलब्ध असते. तुम्ही सेटिंग्ज मध्ये कनेक्शनची अनुमती कधीही थांबवू शकता.
अनुमती देण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी
तुमच्याबद्दल सेव्ह केलेली माहिती वापरण्यासाठी एंबेड केलेल्या आशयाकरिता परवानगी देण्याशी संबंधित विनंतीचा प्रॉम्प्ट दाखवणारी साइट तुम्ही ब्राउझ करता, तेव्हा:
- साइटला तिने तुमच्याबद्दल (कुकी वापरून) सेव्ह केलेल्या माहितीचा अॅक्सेस देण्यासाठी अनुमती द्या निवडा
- अॅक्सेस नाकारण्यासाठी अनुमती देऊ नका निवडा
टिपा:
- अॅक्सेसची अनुमती थांबवण्यासाठी, साइट सेटिंग्ज परवानग्या कशा व्यवस्थापित कराव्या ते जाणून घ्या.
- तुम्ही अॅड्रेस बारच्या डाव्या बाजूला, साइटची माहिती पहा
वर क्लिक करून आणि त्यानंतर एंबेड केलेला आशय सुरू किंवा बंद करूनदेखील अॅक्सेस व्यवस्थापित करू शकता.