Chrome मध्ये कुकी हटवणे, त्यांना अनुमती देणे आणि त्या व्यवस्थापित करणे

तुम्ही अस्तित्वात असलेल्या कुकी हटवणे, सर्व कुकीना अनुमती देणे किंवा ब्लॉक करणे आणि ठरावीक वेबसाइटसाठी प्राधान्ये सेट करणे निवडू शकता.

महत्त्वाचे: तुम्ही ट्रॅकिंगपासून संरक्षण चाचणी गटाचा भाग असल्यास, तुम्हाला "ट्रॅकिंगपासून संरक्षण" या तृतीय पक्ष कुकी व्यवस्थापित करण्यासाठी नवीन Chrome सेटिंग दिसेल. ट्रॅकिंगपासून संरक्षण याबद्दल अधिक जाणून घ्या.

कुकी म्हणजे काय

कुकी म्हणजे तुम्ही भेट देत असलेल्या वेबसाइटनी तयार केलेल्या फाइल. तुमच्या भेटीबद्दलची माहिती सेव्ह करून, त्या तुमचा ऑनलाइन अनुभव आणखी सोपा बनवतात. उदाहरणार्थ, साइट तुम्हाला साइन इन केलेले ठेवू शकतात, तुमची साइट प्राधान्ये लक्षात ठेवू शकतात आणि तुम्हाला स्थानिकरीत्या सुसंबद्ध आशय देऊ शकतात.

कुकी २ प्रकारच्या असतात:

  • प्रथम पक्ष कुकी: तुम्ही भेट देत असलेल्या साइटद्वारे तयार केल्या जातात. साइट ही अ‍ॅड्रेस बारमध्ये दाखवली जाते.
  • तृतीय पक्ष कुकी: इतर साइटद्वारे तयार केल्या जातात. तुम्ही भेट दिलेली साइट ही इतर साइटवरून आशय एंबेड करू शकते, उदाहरणार्थ, इमेज, जाहिराती आणि मजकूर. तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी, यांपैकी इतर कोणत्याही साइट कुकी आणि इतर डेटा सेव्ह करू शकतात.

सर्व कुकी साफ करा

तुम्ही कुकी काढून टाकल्यास, तुम्हाला वेबसाइटमधून साइन आउट केले जाईल आणि तुमची सेव्ह केलेली प्राधान्ये हटवली जाऊ शकतील.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome Chrome उघडा.
  2. आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्जसेटिंग्ज वर टॅप करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर ब्राउझिंग डेटा साफ करा वर टॅप करा.
  4. कुकी, साइट डेटा तपासा. 
  5. इतर आयटमच्या चौकटीतली खूण काढा.
  6. ब्राउझिंग डेटा साफ करा आणि त्यानंतर ब्राउझिंग डेटा साफ करा वर टॅप करा.
  7. पूर्ण झाले वर टॅप करा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7426764456204581207
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false