साइटचे कनेक्शन सुरक्षित आहे का ते तपासणे

भेट देण्यास असुरक्षित असलेली साइट डिटेक्ट करते, तेव्हा Chrome तुम्हाला सावध करून अधिक सुरक्षितपणे ब्राउझ करण्यात मदत करते. एखादी साइट असुरक्षित असू शकते, तेव्हा Chrome साइट अ‍ॅड्रेसच्या बाजूचा आयकन बदलते.

  1. Chrome मध्ये, वेब पेज उघडा.
  2. साइटची सुरक्षा तपासण्यासाठी, वेब अ‍ॅड्रेसच्या डावीकडे, सुरक्षा स्टेटस चिन्ह पहा:
    • Default (Secure) डीफॉल्ट (सुरक्षित)
    • View site information माहिती किंवा सुरक्षित नाही
    • Dangerous सुरक्षित नाही किंवा धोकादायक
  3. साइटचा गोपनीयता तपशील आणि परवानग्यांचा सारांश शोधण्यासाठी, आयकनवर क्लिक करा.

टिपा:

  • तुम्ही असुरक्षित कनेक्शन वापरण्यापूर्वी Chrome ने तुम्हाला विचारावे असे तुम्हाला वाटत असल्यास, नेहमी सुरक्षित कनेक्शन वापरा सुरू करा.
  • नेहमी सुरक्षित कनेक्शन वापरा सुरू असते, तेव्हा साइटने HTTPS ला सपोर्ट न केल्यास, Chrome "कनेक्शन सुरक्षित नाही" अशी चेतावणी दाखवते. नेहमी सुरक्षित कनेक्शन वापराबद्दल अधिक जाणून घ्या.

प्रत्येक सुरक्षा चिन्हाचा अर्थ काय आहे

ही चिन्हे Chrome ने साइटसोबत सुरक्षित आणि खाजगी कनेक्शन प्रस्थापित केले आहे किंवा नाही हे सूचित करतात.

Default (Secure) डीफॉल्ट (सुरक्षित)

तुम्ही साइटद्वारे पाठवलेली किंवा मिळवलेली माहिती ही तुम्ही आणि साइट यांच्यादरम्यान खाजगी असते.

एखाद्या साइटशी सुरक्षितपणे कनेक्ट केल्यावरही तुम्ही संवेदनशील किंवा वैयक्तिक माहिती शेअर करताना नेहमी काळजी घ्या. तुम्हाला भेट द्यायच्या असलेल्या साइटवर तुम्ही आहात याची खात्री करण्यासाठी अ‍ॅड्रेस बारमधील साइटचे नाव तपासून पहा.

View site information माहिती किंवा सुरक्षित नाही

ही साइट खाजगी कनेक्शन वापरत नाही. तुम्ही या साइटद्वारे पाठवलेली आणि मिळवलेली माहिती एखादी व्यक्ती पाहू शकते व ती बदलू शकते.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी साइटच्या मालकाने साइट आणि तुमचा डेटा HTTPS वापरून सुरक्षित करणे आवश्यक आहे.

Dangerous सुरक्षित नाही किंवा धोकादायक

तुम्ही या पेजवर कोणतीही खाजगी किंवा वैयक्तिक माहिती एंटर करू नये अशी आम्ही शिफारस करतो. शक्य असल्यास, साइट वापरू नका.

सुरक्षित नाही: सावधगिरीने पुढे सुरू ठेवा. या साइटच्या कनेक्शनच्या गोपनीयतेमध्ये काहीतरी चुकीचे आहे. तुम्ही या साइटद्वारे पाठवलेली किंवा मिळवलेली माहिती एखादी व्यक्ती शोधू शकते.

धोकादायक: ही साइट वापरू नका. तुम्हाला संपूर्ण पेज लाल रंगातील चेतावणी स्क्रीन दिसत असल्यास, साइट सुरक्षित ब्राउझिंग द्वारे असुरक्षित म्हणून फ्लॅग केलेली आहे. ही साइट तिला मिळालेल्या कोणत्याही माहितीचा गैरवापर करू शकते आणि तुमच्या कॉंप्युटरवर हानिकारक सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्याचा संभाव्य प्रयत्न करू शकते. तुम्ही या साइटचा वापर करता, तेव्हा ती तुमची गोपनीयता आणि सुरक्षा धोक्यात आणते.

"तुमचे कनेक्शन खाजगी नाही" या एररचे निराकरण करणे
तुम्हाला संपूर्ण पेजवर "तुमचे कनेक्शन खाजगी नाही" असा एरर मेसेज मिळाल्यास, त्या साइटमध्ये, नेटवर्कमध्ये किंवा तुमच्या डिव्हाइसमध्ये समस्या असू शकते. "तुमचे कनेक्शन खाजगी नाही" एररना ट्रबलशूट कसे करावे हे जाणून घ्या.
Mac आणि Windows वर डिव्हाइस सर्टिफिकेट व्यवस्थापित करणे

Chrome हे वेबसाइट सर्टिफिकेटसह HTTPS कनेक्शन ऑथेंटिकेट आणि सुरक्षित करते. ही सर्टिफिकेट साइट आणि तुमच्या ब्राउझरमधील लिंक एन्क्रिप्ट करतात.

Chrome Root Program हा HTTPS साइट ऑथेंटिकेट करण्यासाठी Chrome द्वारे विश्वसनीय रूट सर्टिफिकेट यांची सूची देतो. Chrome Root Program बद्दल अधिक जाणून घ्या.

Chrome हे तुमच्या कॉंप्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे वापरलेल्या सर्टिफिकेटमधून कस्टम रूट सर्टिफिकेट जोडेल. तुमच्या डिव्हाइसवर सर्टिफिकेटचे पुनरावलोकन करण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर सुरक्षा वर क्लिक करा.
  4. “प्रगत” याच्या अंतर्गत, डिव्हाइस सर्टिफिकेट व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17603103989944469901
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false