तुमचा Chrome चा ब्राउझिंग इतिहास तपासणे आणि हटवणे

तुम्ही Chrome मध्ये तुमचा ब्राउझिंग इतिहास तपासू शकता. तुम्ही आधीपासून डेस्कटॉप किंवा लॅपटॉप कॉंप्युटरवर जे ब्राउझ करणे सुरू केले आहे ते पुढे सुरूदेखील ठेवू शकता आणि संबंधित शोध पाहू शकता.

तुम्ही Chrome मध्ये भेट दिलेल्या पेजचा रेकॉर्ड तुम्हाला नको असल्यास, तुम्ही तुमचा सर्व किंवा थोडा ब्राउझिंग इतिहास हटवू शकता. तुम्ही तुमचा ब्राउझिंग इतिहास हटवल्यास, तुम्ही Chrome मध्ये साइन इन केलेल्या आणि तुमच्या Google खाते वर तुमचा इतिहास सिंक केलेल्या सर्व डिव्हाइसवर ते लागू होते.

स्वतंत्रपणे, तुम्ही तुमच्या खात्यामधून तुमचा Google शोध इतिहास हटवणे हेदेखील करू शकता.

तुमच्या इतिहासामध्ये काय सूचिबद्ध असते

तुमच्या इतिहासामध्ये तुम्ही मागील ९० दिवसांमध्ये Chrome वर भेट दिलेली पेज सूचिबद्ध असतात. यामध्ये पुढील गोष्टी स्टोअर होत नाहीत: 

  • Chrome पेज जसे की chrome://settings
  • खाजगी ब्राउझिंगमधून तुम्ही भेट दिलेली पेज
  • तुमच्या ब्राउझिंग इतिहासामधून हटवलेली पेज

टीप: तुम्ही Chrome मध्ये साइन इन केले असल्यास आणि तुमचा इतिहास सिंक केल्यास, तुमच्या सिंक केलेल्या डिव्हाइसवर तुमचा इतिहासदेखील तुम्ही भेट दिलेली पेज दाखवतो.

तुमचा इतिहास पाहणे
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Chrome अ‍ॅप Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर इतिहास वर टॅप करा.
    • तुमचा अ‍ॅड्रेस बार तळाशी असल्यास, अ‍ॅड्रेस बारवर वरच्या दिशेने स्वाइप करा. इतिहास History वर टॅप करा.
  3. साइटला भेट देण्यासाठी, एंट्रीवर टॅप करा.
    • नवीन टॅबमध्ये साइट उघडण्यासाठी, एंट्रीला स्‍पर्श करा आणि धरून ठेवा. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर नवीन टॅबमध्ये उघडा वर टॅप करा.
    • साइट कॉपी करण्यासाठी, एंट्रीला स्‍पर्श करा आणि धरून ठेवा. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर लिंक कॉपी करा वर टॅप करा.
तुमचा इतिहास हटवा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Chrome अ‍ॅप Chrome उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, आणखीआणखीआणि त्यानंतर इतिहास वर टॅप करा.
    • तुमचा अ‍ॅड्रेस बार तळाशी असल्यास, अ‍ॅड्रेस बारवर वरच्या दिशेने स्वाइप करा. इतिहास History वर टॅप करा.
  3. ब्राउझिंग डेटा साफ करा वर टॅप करा.
  4. "वेळेची रेंज" च्या बाजूला:
    • तुमच्या इतिहासाचा एखादा भाग हटवण्यासाठी, तारखा निवडा.
    • सर्व हटवण्यासाठी, सर्व वेळ वर टॅप करा.
  5. "ब्राउझिंग इतिहास" च्या बाजूच्या चौकटीत खूण करा.
  6. तुम्हाला हटवायच्या नसलेल्या इतर कोणत्याही डेटाच्या चौकटीतली खूण काढा.
  7. डेटा साफ करा वर टॅप करा.

तुमचा शोध इतिहास कसा हटवावा ते जाणून घ्या.

तुमच्या इतिहासामधून एखादा आयटम हटवा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Chrome अ‍ॅप Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर इतिहास वर टॅप करा.
    • तुमचा अ‍ॅड्रेस बार तळाशी असल्यास, तुम्ही इतिहास History यावर टॅप करण्यापूर्वी अ‍ॅड्रेस बारवर वरच्या दिशेने स्वाइप करा.
  3. तुम्हाला हटवायच्या असलेल्या एंट्री शोधा.
  4. उजवीकडे, काढून टाका Remove वर टॅप करा.

एकाहून अधिक आयटम हटवण्यासाठी:

  1.  एखाद्या एंट्रीवर स्‍पर्श करून धरून ठेवा.
  2. तुम्हाला हटवायच्या असलेल्या इतर एंट्री निवडा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, काढून टाका Remove वर टॅप करा.
टिपा:
  • काही विशिष्ट गोष्टी शोधण्यासाठी, सर्वात वरती उजवीकडे, शोधा Search वर टॅप करा.
  • तुम्ही एखाद्या साइटवर असताना त्या विशिष्ट साइटच्या इतिहासामधून एखादा आयटम काढून टाकू शकता:
    • पेजची माहिती Default (Secure) आणि त्यानंतर शेवटची भेट दिलेली History आणि त्यानंतर काढून टाका Remove वर टॅप करा.

नवीन टॅब पेजवरून इमेज काढून टाका

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, नवीन टॅब उघडा.
  2. इमेज काढून टाकण्यासाठी, तिला स्‍पर्श करून धरून ठेवा.
  3. काढून टाका निवडा.

खाजगीरीत्या ब्राउझ करणे

Chrome ने तुमचा ब्राउझिंग इतिहास अजिबात सेव्ह करू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही गुप्त मोडसह खाजगीरीत्या ब्राउझ करणे हे करू शकता.

तुम्ही ऑफिस किंवा शाळेमध्ये Chromebook वापरत असल्यास, तुमचा नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेटर हा ब्राउझिंग इतिहास बंद करू शकतो. इतिहास बंद असल्यास, तुमचा इतिहास तुम्ही भेट दिलेली पेज सूचीबद्ध करणार नाही. व्यवस्थापित केलेले Chrome डिव्हाइस वापरण्याबद्दल जाणून घ्या.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
777051834650226455
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false