Chrome मधील ब्राउझिंग डेटा हटवा

तुम्ही तुमचा Chrome चा ब्राउझिंग इतिहास आणि इतर ब्राउझिंग डेटा, जसे की सेव्ह केलेल्या फॉर्म एंट्री किंवा फक्त एका विशिष्ट तारखेचा डेटा हटवू शकता.

तुमच्या माहितीचे काय होते

हटवला जाऊ शकणारा डेटा
  • ब्राउझिंग इतिहास: तुमचा ब्राउझिंग इतिहास हटवल्यामुळे पुढील गोष्टी हटवल्या जातात:
    • तुम्ही भेट दिलेले वेब अ‍ॅड्रेस इतिहास पेजवरून काढून टाकले जातात.
    • त्या पेजचे शॉर्टकट नवीन टॅब पेजवरून काढून टाकले जातात.
    • त्या वेबसाइटसाठी आता अ‍ॅड्रेस बार पूर्वानुमाने दाखवली जात नाहीत.
  • टॅब: तुमच्या डिव्हाइसवरील उघडे टॅब बंद केले जातील.
  • कुकी आणि साइट डेटा
    • कुकी: ब्राउझिंग माहिती सेव्ह करून तुमचा ऑनलाइन अनुभव सुलभ व्हावा, यासाठी तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइटद्वारे तयार केलेल्या या फाइल आहेत. कुकी हटवल्या जातात.
    • साइट डेटा: अ‍ॅप्लिकेशन कॅशेसह HTML5 सुरू केलेले स्टोरेजचे प्रकार, वेब स्टोरेज डेटा, वेब SQL डेटाबेस डेटा आणि अनुक्रमित डेटाबेस डेटा हे हटवले आहेत.
    • मीडिया परवाने: तुम्ही प्ले किंवा डाउनलोड केलेले चित्रपट अथवा संगीत यांसारख्या HTML5 संरक्षित आशयाचे परवाने हटवले जातात.
  • कॅशे केलेल्या इमेज आणि फाइल: तुमच्या पुढील भेटीदरम्यान पेज आणखी जलद उघडण्यात मदत व्हावी, यासाठी Chrome पेजचे भाग लक्षात ठेवते. तुम्ही Chrome मध्ये भेट दिलेल्या पेजमधील मजकूर आणि इमेज काढून टाकल्या जातात.
  • सेव्ह केलेले पासवर्ड: तुम्ही सेव्ह केलेले पासवर्ड हटवले आहेत.
  • ऑटोफिल फॉर्म डेटा: ॲड्रेस आणि क्रेडिट कार्डसह, तुमच्या ऑटोफिल एंट्री हटवल्या जातात. तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेली कार्ड आणि ॲड्रेस हटवले जात नाहीत.
  • साइट सेटिंग्ज: सेटिंग्ज आणि तुम्ही वेबसाइटला दिलेल्या परवानग्या हटवल्या जातात. उदाहरणार्थ, एखादी साइट JavaScript रन करणे, तुमचा कॅमेरा वापरणे किंवा तुमचे स्थान जाणून घेणे हे करू शकत असल्यास.
हटवला न जाणारा डेटा

तुमच्या ऑनलाइन वर्तनाशी संबंधित असलेल्या डेटाचे इतर प्रकार असतात. हे डेटाचे इतर प्रकार स्वतंत्रपणे हटवले जाऊ शकतात:

तुमचे डिव्हाइस तुम्ही दुसर्‍याला देत असल्यास, तुमचा ब्राउझिंग डेटा हटवणे आणि त्यानंतर Chrome मधून साइन आउट करणे लक्षात ठेवा.

तुमचा ब्राउझिंग डेटा हटवणे

महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या Android डिव्हाइसवरून तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला डेटा हटवल्यास, तुमच्या Google खाते मध्ये जिथे साइन इन केले आहे, अशा सर्व डिव्हाइसवरून तो काढून टाकला जातो.

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर ब्राउझिंग डेटा हटवा वर टॅप करा.
    • ब्राउझिंग इतिहास (उघड्या टॅबसह) हटवण्यासाठी, कालावधी निवडा आणि डेटा हटवा वर टॅप करा. डीफॉल्ट कालावधी १५ मिनिटे आहे.
    • तुम्हाला हटवायच्या असलेल्या डेटाचे आणखी विशिष्ट प्रकार निवडण्यासाठी, आणखी पर्याय वर टॅप करा. तुम्हाला हटवायच्या असलेल्या ब्राउझिंग डेटाचे प्रकार निवडा आणि डेटा हटवा वर टॅप करा.
      • तुम्ही Chrome मध्ये साइन इन केलेले असताना कुकी हटवल्यास, तुम्हाला तुमच्या Google खाते मधून साइन आउट केले जाणार नाही.

टिपा:

स्वतंत्र आयटम हटवणे

तुमच्या ब्राउझिंग डेटाच्या संपूर्ण वर्गवार्‍या हटवण्याऐवजी, तुम्ही हटवण्यासाठी आयटम निवडू शकता:

संबंधित स्रोत

अधिक मदत आवश्‍यक?

या पुढील पायर्‍या करून पाहा:

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16067214592707113051
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false