गुप्त मोडमध्ये ब्राउझ करणे

तुम्ही गुप्त मोडमध्ये आणखी खाजगीरीत्या वेबवर ब्राउझ करू शकता.
 
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome Chrome उघडा.
  2. आणखी More आणि त्यानंतर नवीन गुप्त टॅब वर टॅप करा. नवीन गुप्त टॅब उघडतो.
टिपा:
  • तुम्ही खाजगीरीत्या ब्राउझ करत आहात का ते तपासण्यासाठी, टॅब स्विच करा Switch tabs वर टॅप करा.
  • तुमच्याकडे कोणतेही गुप्त टॅब उघडे आहेत का ते पाहण्यासाठी उजवीकडे स्‍वाइप करा. गुप्त टॅबला सर्वात वरती गुप्त मोड आयकन असतो.
  • तुम्ही गुप्त टॅबमध्ये असता, तेव्हाच तुमची ब्राउझिंग अ‍ॅक्टिव्हिटी खाजगी असते.

तुम्ही गुप्त टॅब आणि नियमित Chrome टॅब यांदरम्यान स्विच करू शकता:

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome Chrome उघडा.
  2. तळाशी, टॅब स्विच करा Switch tabs वर टॅप करा.
    • तुमच्या iPhone वर, तुम्हाला पुढील गोष्टी दिसतील:
      • तळाशी टॅब स्विच करा Switch tabs.
      • तळाशी उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज.
    • तुमच्या iPad वर, तुम्हाला पुढील गोष्टी दिसतील:
      • सर्वात वरती, टॅब स्विच करा Switch tabs.
      • सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज.
  3. गुप्त टॅब आणि नियमित Chrome टॅब यांदरम्यान स्विच करण्यासाठी उजवीकडे किंवा डावीकडे स्‍वाइप करा.

गुप्त मोडमध्ये लिंक उघडणे

तुम्ही दुसर्‍या अ‍ॅपवरून किंवा एसएमएसवरून लिंक उघडता, तेव्हा तुम्ही Chrome मधील गुप्त टॅबमध्ये लिंक उघडणे निवडू शकता. हे सेटिंग बदलण्यासाठी:

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome Chrome उघडा.
  2. आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर गोपनीयता आणि सुरक्षा वर टॅप करा.
  3. इतर अ‍ॅप्स मधील लिंक गुप्त मोड मध्ये उघडण्याची विनंती करा सुरू किंवा बंद करा.
गुप्त मोड वापरून लिंक उघडणे
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, तुम्हाला Chrome Chrome मध्ये उघडायच्या असलेल्या लिंकवर टॅप करा.
  2. Chrome गुप्त मोड मध्ये उघडा वर टॅप करा.

तुम्ही अ‍ॅप्सदरम्यान स्विच करता, तेव्हा गुप्त टॅब लॉक करणे

तुमचे डिव्हाइस वापरणारे कोणीही तुम्ही उघडे ठेवलेले गुप्त टॅब अ‍ॅक्सेस करू शकते. गुप्त टॅब उघडे ठेवण्यासाठी आणि खाजगी ठेवण्यासाठी, तुम्ही तुमचे गुप्त टॅब लॉक करू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome Chrome उघडा.
  2. आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा वर टॅप करा.
  4. तुम्ही Chrome बंद करता, तेव्हा गुप्त टॅब लॉक करा सुरू करा.

गुप्त मोड बंद करणे

तुम्ही गुप्त टॅब उघडलेला असल्यास आणि तुम्ही दुसरा गुप्त टॅब उघडल्यास, तुमचे खाजगी ब्राउझिंग सेशन नवीन टॅबमध्ये सुरू राहील. बाहेर पडण्यासाठी, सर्व गुप्त टॅब बंद करा.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome Chrome उघडा.
  2. तळाशी, टॅब स्विच करा Switch tabs वर टॅप करा.
  3. तुमचे उघडे असलेले गुप्त टॅब पाहण्यासाठी उजवीकडे स्‍वाइप करा.
  4. तुम्हाला बंद करायचा असलेला टॅब निवडा. टॅबच्या सर्वात वरती उजवीकडे, बंद करा Close वर टॅप करा.

संबंधित लेख

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13339079282816996974
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false