गुप्त मोडमध्ये ब्राउझ करणे

तुम्ही गुप्त मोडमध्ये आणखी खाजगीरीत्या वेबवर ब्राउझ करू शकता.
 
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Chrome Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर नवीन गुप्त टॅब वर टॅप करा.
  3. एक नवीन विंडो उघडते. सर्वात वरती डावीकडे, गुप्त आयकन गुप्त शोधा.

"अ‍ॅप किंवा तुमच्या संस्थेद्वारे स्क्रीनशॉट घेण्याची अनुमती नाही" असा मेसेज तुम्हाला दिसल्यास, सामान्य Chrome टॅबमध्ये वेबपेज उघडा.

तुम्ही गुप्त टॅब आणि नियमित Chrome टॅब यांदरम्यान स्विच करू शकता. तुम्ही गुप्त टॅब वापरता, फक्त तेव्हा खाजगीमध्ये ब्राउज करता.

तुम्ही नवीन गुप्त विंडो उघडता, तेव्हा तृतीय पक्ष कुकी ब्लॉक करणेदेखील निवडू शकता. कुकीबद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्ही Chrome बंद करता, तेव्हा गुप्त टॅब लॉक करणे

तुमचे डिव्हाइस वापरणारे कोणीही तुम्ही उघडे ठेवलेले गुप्त टॅब अ‍ॅक्सेस करू शकते. तुमचे गुप्त टॅब उघडे ठेवण्यासाठी आणि डिव्हाइसच्या इतर वापरकर्त्यांपासून लपवून ठेवण्यासाठी, तुम्ही ते लॉक करू शकता.

महत्त्वाचे: यांपैकी काही पायर्‍या फक्त Android 11 आणि त्यावरील आवृत्त्यांवर काम करतात. तुमची Android आवृत्ती कशी तपासायची ते जाणून घ्या.

  1. तुमच्या Android फोनवर, Chrome Chrome उघडा.
  2. आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा वर टॅप करा.
  4. तुम्ही Chrome बंद करता, तेव्हा गुप्त टॅब लॉक करा सुरू करा.

गुप्त मोड बंद करणे

तुम्ही गुप्त टॅब उघडलेला असल्यास आणि तुम्ही दुसरा गुप्त टॅब उघडल्यास, तुमचे खाजगी ब्राउझिंग सेशन नवीन टॅबमध्ये सुरू राहील. गुप्त मोडमधून बाहेर पडण्यासाठी, सर्व गुप्त टॅब बंद करा.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Chrome Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, टॅब स्विच करा Switch tabs वर टॅप करा. उजवीकडे, तुम्हाला तुमचे उघडे गुप्त टॅब दिसतील.
  3. तुमच्या गुप्त टॅबच्या सर्वात वरती उजवीकडे, बंद करा Close वर टॅप करा.

संबंधित लेख

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15341539884606156738
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false