तुमचे डीफॉल्ट शोध इंजीन आणि साइट शोधण्यासाठीचे शॉर्टकट सेट करणे

तुम्ही वेब शोधण्यासाठी अ‍ॅड्रेस बार (ओम्निबॉक्स) वापरू शकता. काही देशांमध्ये Google Search हे Chrome चे डीफॉल्ट शोध इंजीन आहे. इतर ठिकाणी तुम्हाला तुमचे डीफॉल्ट शोध इंजीन निवडण्यास सांगितले जाऊ शकते. तुम्ही तुमचे डीफॉल्ट शोध इंजीन कधीही बदलू शकता.

तुम्हाला तुमच्या शोध इंजीनमध्ये अनपेक्षित बदल आढळल्यास, त्यामध्ये मालवेअर असू शकते. मालवेअर कसे काढून टाकावे ते जाणून घ्या.

तुमचे डीफॉल्ट शोध इंजीन सेट करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. शोध इंजीन निवडा.
  4. "अ‍ॅड्रेस बारमध्ये वापरलेले शोध इंजीन" च्या बाजूला, डाउन अ‍ॅरो Down arrow निवडा.
  5. नवीन डीफॉल्ट शोध इंजीन निवडा.

टिपा:

शोध इंजीन आणि साइट शॉर्टकट व्यवस्थापित करणे

तुम्ही साइट शोधण्यासाठीचे शॉर्टकट जोडू शकता, संपादित करू शकता किंवा काढून टाकू शकता आणि डीफॉल्ट शोध इंजीन सेट करू शकता.
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. डावीकडे, शोध इंजीन आणि त्यानंतर शोध इंजीन आणि साइट शोध व्यवस्थापित करा निवडा.
  4. साइट शोधण्यासाठीचे शॉर्टकट बदलण्याकरिता:
    • जोडणे: "साइट शोध" च्या उजवीकडे, जोडा निवडा. तुम्ही मजकूर फील्ड भरल्यानंतर, जोडा निवडा.
    • संपादित करणे: साइट शोधण्यासाठीच्या शॉर्टकटच्या उजवीकडे, संपादित करा संपादित करा निवडा.
    • डीफॉल्ट म्हणून सेट करणे: साइट शोधण्यासाठीच्या शॉर्टकटच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर डीफॉल्ट बनवा निवडा.
    • डीॲक्टिव्हेट करणे: साइट शोधण्यासाठीच्या शॉर्टकटच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर डीॲक्टिव्हेट करा निवडा.
    • हटवणे: साइट शोधण्यासाठीच्या शॉर्टकटच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर हटवा निवडा.

टिपा:

  • विशिष्ट साइट शोधण्यासाठी तुम्ही शॉर्टकट सेट करू शकता.
  • तुमचे उघडे असलेले टॅब, बुकमार्क आणि ब्राउझिंग इतिहासासाठीचे शॉर्टकट हे तुमच्या साइट शोधांमध्ये समाविष्ट केलेले आहेत. तुम्ही हे शॉर्टकट संपादित किंवा बंद करू शकता, पण ते हटवले जाऊ शकत नाहीत.
  • तुम्ही साइट शोधण्यासाठीचा शॉर्टकट डीॲक्टिव्हेट करता, तेव्हा तो "इनॅक्टिव्ह शॉर्टकट" विभागामध्ये हलवला जातो.
  • "इनॅक्टिव्ह शॉर्टकट" विभागामध्ये तुम्हाला सुचवलेल्या इतर साइटदेखील सूचीबद्ध केलेल्या दिसू शकतात. त्या तुमच्या साइट शोधण्यासाठीच्या शॉर्टकटमध्ये जोडण्याकरिता, ॲक्टिव्हेट करा निवडा.
    • काही शोध साइटच्या बाबतीत, तुम्ही त्या साइटवर शोधल्यानंतरच ती "इनॅक्टिव्ह शॉर्टकट" विभागामध्ये दिसते.

मजकूर फील्ड भरणे

"शोध इंजीन" फील्ड

शोध इंजीनसाठी लेबल किंवा नाव एंटर करा.

"शॉर्टकट" फील्ड

शोध इंजीनसाठी तुम्हाला वापरायचा असलेला मजकूर शॉर्टकट एंटर करा. तुम्ही शोध इंजीन पटकन वापरण्यासाठी तुमच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये कीवर्ड एंटर करू शकता.

"क्वेरीच्या जागेवर %s सह URL" फील्ड

शोध इंजीनच्या परिणाम पेजसाठी वेब अ‍ॅड्रेस एंटर करा आणि क्वेरी जाईल तेथे %s वापरा.

परिणाम पेजचा वेब अ‍ॅड्रेस शोधण्यासाठी आणि तो संपादित करण्यासाठी:

  1. तुम्हाला जोडायचे असलेल्या शोध इंजीनवर जा.
  2. शोधा.
  3. शोध परिणाम पेजचा वेब अ‍ॅड्रेस URL फील्डमध्ये कॉपी करून पेस्ट करा. शोध परिणाम पेजचा अ‍ॅड्रेस आणि वेबसाइट अ‍ॅड्रेस वेगळा आहे.
    • उदाहरणार्थ, तुम्ही "फुटबॉल" शोधल्यास, http://www.google.com/search?q=soccer ही Google शोध परिणाम URL असेल.
  4. URL मध्ये शोध संज्ञा %s ने बदला.
    • उदाहरणार्थ, तुम्ही Google शोध परिणाम URL वापरत असल्यास, तुमचा शोध इंजीन अ‍ॅड्रेस http://www.google.com/search?q=%s हा असेल.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9157989581521621015
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false