तुमचे होमपेज आणि स्टार्टअप पेज सेट करणे

होमपेज किंवा स्टार्टअप पेजसाठी कोणतेही पेज उघडण्यासाठी तुम्ही Google Chrome कस्टमाइझ करू शकता. तुम्ही ही दोन्ही पेज सारखीच असतील अशा प्रकारे सेट न केल्यास, ती तशी असणार नाहीत.

  • तुमच्या डिव्हाइसवर तुम्ही पहिल्यांदा Chrome लाँच करता, तेव्हा तुमचे स्टार्टअप पेज दिसते.
  • होम Home निवडल्यावर तुम्ही तुमच्या होमपेजवर जाता.

तुमचे स्टार्टअप पेज, होमपेज किंवा शोध इंजीन अचानक बदलले असल्यास, तुमच्याकडे नकोसे सॉफ्टवेअर असू शकते. तुमची ब्राउझर सेटिंग्ज कशी रीसेट करावीत हे जाणून घ्या.

तुमचे स्टार्टअप पेज सेट करा

तुमच्या काँप्युटरवर तुम्ही Chrome लाँच करता, तेव्हा कोणते पेज किंवा कोणती पेज दिसावे/दिसावीत हे नियंत्रित करू शकता.

नवीन टॅब उघडून ठेवा
तुम्ही कधीही नवीन विंडो उघडता, तेव्हा Chrome ला नवीन टॅब पेज उघडण्यासाठी सेट करू शकता.
  1. तुमच्या काँप्युटरवर Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. डावीकडे, स्टार्टअप झाल्यावर आणि त्यानंतर नवीन टॅब पेज उघडा निवडा.
तुम्ही पुढील काही गोष्टी वापरून तुमचे नवीन टॅब पेज कस्टमाइझ करू शकता:
  • तुमचे शॉर्टकट
  • विविध थीम
तुमचे नवीन टॅब पेज कस्टमाइझ कसे करावे हे जाणून घ्या.
तुम्ही सोडले होते तिथून पुढे सुरू करणे

तुम्ही बाहेर पडलात त्या वेळी पाहत होता तीच पेज पुन्हा उघडण्यास तुम्ही Chrome ला सांगू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. डावीकडे, स्टार्टअप झाल्यावर आणि त्यानंतर तुम्ही सोडले होते तिथून पुढे सुरू करा निवडा.

तुमच्या कुकी आणि डेटा सेव्ह केला जातो, त्यामुळे तुम्ही आधी लॉग इन केलेली कोणतीही वेबसाइट पुन्हा उघडते. तुम्हाला या पेजमध्ये आपोआप साइन इन केले जाणे नको असल्यास, खालील पायर्‍या फॉलो करा:

  1. तुमच्या काँप्युटरवर Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. डावीकडे, गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर साइट सेटिंग्ज आणि त्यानंतर अतिरिक्त आशय सेटिंग्ज निवडा.
  4. डिव्‍हाइसवरील साइट डेटा निवडा.
  5. तुम्ही सर्व विंडो बंद करता, तेव्हा तुमच्या डिव्हाइसवर साइटनी सेव्ह केलेला डेटा हटवणे सुरू करा.
विशिष्‍ट पेजचा संच उघडणे

तुम्ही Chrome ला कोणतेही वेबपेज उघडण्यास सांगू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. "स्टार्टअपच्‍या वेळी" याअंतर्गत, विशिष्‍ट पेज किंवा पेजचा संच उघडा निवडा.
  4. तुम्ही हेदेखील करू शकता:
    • नवीन पेज जोडा निवडा.
      1. वेब अ‍ॅड्रेस एंटर करा.
      2. जोडा निवडा.
    • सद्य पेज वापरा निवडा.

टीप: तुमची पेज अपडेट करण्यासाठी उजवीकडे, अधिक आणखी आणि त्यानंतर संपादित करा किंवा हटवा निवडा.

तुमच्या स्टार्टअप किंवा होमपेजबाबत समस्या

तुम्ही काँप्युटरवर असल्यास आणि तुम्हाला तुम्ही स्वतः सेट न केलेले होमपेज किंवा स्टार्टअप पेज आढळल्यास, तुमच्या काँप्युटरमध्ये मालवेअर असू शकते. नको असलेल्या जाहिराती, पॉप-अप आणि मालवेअर कसे काढून टाकावे हे जाणून घ्या.

तुम्ही ऑफिस किंवा शाळेमध्ये Chromebook वापरत असल्यास, तुमचा नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेटर हा तुमच्यासाठी तुमचे(ची) स्टार्टअप पेज किंवा होमपेज निवडू शकतो. असे असल्यास, तुम्हाला ती बदलता येणार नाहीत. अधिक माहितीसाठी, तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरला विचारणे हे करा.

तुमचे होमपेज निवडणे

तुम्ही होम Home निवडल्यावर कोणते पेज दिसावे हे तुम्ही नियंत्रित करू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. "स्वरूप" याअंतर्गत, होम बटण दाखवा सुरू करा.
  4. "होम बटण दाखवा" याअंतर्गत, नवीन टॅब पेज किंवा कस्टम पेज वापरणे निवडा

टीप: तुमच्या अ‍ॅड्रेस बारच्या डावीकडे, तुम्हाला होम Home आढळेल.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16137512316047571860
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false