Chrome वर इमेजची वर्णने मिळवणे

तुम्ही Chrome वर स्क्रीन रीडर वापरता तेव्हा तुम्हाला लेबल न केलेल्या इमेजची वर्णने मिळू शकतात उदाहरणार्थ, ऑल्ट टेक्स्ट नसलेल्या इमेज.  

वर्णने तयार करण्यासाठी इमेज Google कडे पाठवल्या जातात. Google हे एखाद्या इमेजचे वर्णन करू न शकल्यास, स्क्रीन रीडर "कोणतेही वर्णन उपलब्ध नाही" असे म्हणेल. 

महत्त्वाचे: इमेजची वर्णने ही क्रोएशियन, झेक, डच, इंग्रजी, फिन्निश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इंडोनेशियन, इटालियन, नॉर्वेजियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश, स्वीडिश आणि तुर्की या भाषांमध्ये उपलब्ध आहेत.

इमेजची वर्णने सुरू किंवा बंद करा

तुम्ही Chrome सेटिंग्ज मध्ये किंवा तुम्ही ज्या पेजवर आधीपासून आहात त्यावर इमेजची वर्णने सुरू करू शकता.

Google मधील कॉंटेक्स्ट मेनूमध्ये इमेजची वर्णने सुरू करा

तुम्ही सर्व पेज किंवा फक्त एका ठरावीक पेजसाठी इमेजची वर्णने सुरू करू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Chrome ब्राउझर उघडा.
  2. कॉंटेक्स्ट मेनू उघडा.
    • Windows: Shift+F10.
    • Mac: VoiceOver+Shift+ m किंवा Ctrl + Alt + Shift + m.
    • Chromebook: Search  m. किंवा लाँचर  + m.
  3. "Google वरून इमेजची वर्णने मिळवा" निवडण्यासाठी अप किंवा डाउन अ‍ॅरो की वापरा.
  4. इमेज वर्णन मेनू उघडण्यासाठी राइट किंवा लेफ्ट अ‍ॅरो वापरा.
  5. तुम्ही इमेजची वर्णने सुरू किंवा बंद करता तेव्हा, तुम्हाला Google कडील इमेजच्या वर्णनांशी सहमत होण्यासाठी विचारले जाऊ शकते. इमेजची वर्णने सुरू किंवा बंद करा:
    • एका पेजसाठी:फक्त एकदा निवडण्यासाठी स्पेस दाबा.
    • सर्व पेजसाठी: नेहमी निवडण्यासाठी स्पेस दाबा. 

तुमच्याकडे फक्त एका पेजसाठी इमेजची वर्णने सुरू करण्याची अनुमती असल्यास, ती बंद करण्यासाठी पेजमधून बाहेर पडा किंवा रिफ्रेश करा.

सर्व पेजसाठी “Google वरून इमेजची वर्णने मिळवा” सुरू केलेले असल्यास, कॉंटेक्स्ट मेनूमध्ये पर्यायाशेजारी बरोबरची खूण आहे.

तुम्ही साइन इन केलेले असल्यास आणि Chrome शी सिंक करत असल्यास, तुम्हाला सर्व साइन इन केलेल्या आणि सिंक केलेल्या डिव्हाइसवर इमेजची वर्णने मिळतील.

Chrome सेटिंग्जमध्ये इमेजची वर्णने सुरू करा

तुम्ही Chrome सेटिंग्जमध्ये सर्व पेजसाठी इमेजची वर्णने सुरू किंवा बंददेखील करू शकता. इमेजची वर्णने सेटिंग्ज किंवा कॉंटेक्स्ट मेनूमध्ये सुरू केल्यास, ती सर्व पेजसाठी एकसारखीच काम करतात.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. सेटिंग्ज पेजच्या तळाशी, प्रगत आणि त्यानंतर अ‍ॅक्सेसिबिलिटी वर क्लिक करा.
  4. Google कडून इमेजची वर्णने मिळवा हे सुरू किंवा बंद करा.

“Google वरून इमेजची वर्णने मिळवा” सुरू केलेले असल्यास, वैशिष्ट्याशेजारी बरोबरची खूण आहे.

इमेजची वर्णने फक्त स्क्रीन रीडर वापरकर्त्यांना वाचिक फीडबॅक किंवा ब्रेलमार्फत उपलब्ध आहेत आणि ती स्क्रीनवर व्हिज्युअल पद्धतीने दिसत नाहीत. इमेजची वर्णने कदाचित पूर्णपणे अचूक असणार नाहीत.

तुम्हाला फीडबॅक द्यायचा असल्यास, आमच्या Google अ‍ॅक्सेसिबिलिटी सपोर्ट टीम शी संपर्क साधा.

वर्णन देण्यासाठी Google सर्व्हरला इमेज पाठवल्या जातात, पण Google त्या सेव्ह करत नाही. Google एखाद्या इमेजचे वर्णन करते तेव्हा Google कधीही वेब पेजमध्ये बदल करत नाही. तुमच्या गोपनीयतेसाठी, हे वैशिष्ट्य अशा प्रकारे डिझाइन केले आहे, की ते वापरले जात असल्याचे एखाद्या साइटला, तुमच्या स्क्रीन रीडरला आणि तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमला कळणार नाही. अधिक जाणून घेण्यासाठी, आमचे Google गोपनीयता धोरण याचे पुनरावलोकन करा.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10447000821244721439
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false