Chrome चा जाहिरात ब्लॉकर बंद करून साइटला भेट देणे

तुम्हाला यांसारखे खराब जाहिरात अनुभव असलेल्या वेबसाइटवर जाहिराती मिळणार नाहीत:

  • खूप जास्त जाहिराती
  • फ्लॅशिंग ग्राफिक किंवा ऑटोप्ले होणारा ऑडिओ असलेल्या त्रासदायक जाहिराती
  • तुम्हाला आशय शोधता येण्याआधी जाहिरात वॉल

या जाहिराती ब्लॉक केल्यावर, तुम्हाला "नको असलेल्या जाहिराती ब्लॉक केल्या" हा मेसेज मिळेल. नको असलेल्या जाहिराती या पेजवरून काढून टाकल्या जातील.

Google blog मध्ये Chrome जाहिराती ब्लॉक का करते त्याबद्दल अधिक जाणून घ्या.

जाहिरात ब्लॉकर बंद करणे

सर्व साइटवर जाहिरातींना अनुमती देण्यासाठी, तुम्ही तुमची सेटिंग्ज बदलू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर साइट सेटिंग्ज निवडा.
  4. “आशय” अंतर्गत, अतिरिक्त आशय सेटिंग्ज आणि त्यानंतर नको असलेल्या जाहिराती निवडा.
  5. “डीफॉल्ट वर्तन” अंतर्गत,तुम्ही भेट देता ती कोणतीही साइट तुम्हाला कोणतीही जाहिरात दाखवू शकते निवडा.

विशिष्ट साइटवर जाहिरातींना अनुमती देणे

तुम्ही भेट देता त्या कोणत्याही साइटला तुम्हाला कोणतीही जाहिरात दाखवण्याची अनुमती देऊ शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. तुमचा विश्वास असलेल्या, जाहिराती ब्लॉक केलेल्या पेजवर जा.
  3. वेब अ‍ॅड्रेसच्या डावीकडे, साइटशी संबंधित माहिती पहा Default (Secure) आणि त्यानंतर साइट सेटिंग्ज निवडा.
  4. “नको असलेल्या जाहिराती” च्या बाजूला, “परवानग्या” अंतर्गत, अनुमती द्या निवडा.
  5. वेब पेज रीलोड करा.

Chrome ला तुमच्या साइटवरील जाहिराती ब्लॉक करण्यापासून थांबवणे

Chrome अधिक चांगल्या जाहिरातींची मानके यांचे उल्लंघन करणार्‍या जाहिराती वेबसाइटवरून काढून टाकते. ही मानके लोकांसाठी विशेषतः त्रासदायक असलेल्या जाहिरातींच्या प्रकारांना परावृत्त करतात.

तुमच्या मालकीच्या साइटवरून जाहिराती काढून टाकल्या जात असल्यास, जाहिरात अनुभव अहवाल याला भेट द्या. अहवालामध्ये, तुम्ही तुमच्या साइटमधील कोणत्याही समस्यांबद्दल आणि त्या कशा हाताळायच्या याबद्दल जाणून घ्याल.

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10443425000487211219
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false