तुमचा हरवलेला फोन किंवा कॉंप्युटर लॉक करणे अथवा त्यामधील डेटा मिटवणे

तुमचा फोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप हरवल्यास अथवा चोरीला गेल्यास, तुमचे डिव्हाइस सुरक्षित करण्यासाठी या पायऱ्या फॉलो करा.

तुम्हाला तुमचे डिव्हाइस परत मिळू शकत नसल्यास, त्वरित काही पावले उचलल्यास, तुमच्या माहितीचे संरक्षण करण्यात मदत होऊ शकते.

पहिली पायरी: तुमचा हरवलेला फोन, टॅबलेट किंवा Chromebook सुरक्षित करा

तुम्ही रिंग करणे, लॉक करणे किंवा तुमच्या डिव्हाइसवर साइन आउट करणे यांसारख्या काही रिमोट कृती करू शकता.

Windows, Mac किंवा Linux कॉंप्युटर हरवला आहे का? "तुमचा फोन शोधा" या अंतर्गत कॉंप्युटर सूचीबद्ध केलेले नाहीत. तुमचा Google खाते पासवर्ड बदलणे वर जा.

  1. Chrome Chrome यासारखे ब्राउझर उघडा. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचे डिव्हाइस वापरत असल्यास, खाजगी ब्राउझिंग मोड वापरा.
  2. तुमचे Google खाते उघडा.
  3. "सुरक्षा" विभागामध्ये, "तुमची डिव्हाइस" शोधा. डिव्हाइस व्यवस्थापित करा निवडा.
  4. हरवलेला फोन, टॅबलेट किंवा Chromebook निवडा. तुम्हाला तुमचे डिव्हाइस शेवटचे कधी आणि कोणत्या शहरात वापरले होते ते दिसेल.
  5. "खाते अ‍ॅक्सेस" च्या बाजूला, साइन आउट करा निवडा. तुमच्या Google खाते शी आणि तुमच्या डिव्हाइसशी कनेक्ट केलेल्या अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस काढून टाकण्यासाठी ऑन-स्क्रीन सूचना फॉलो करा.
    • तुम्हाला तुमचे डिव्हाइस सापडल्यास, तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये पुन्हा साइन इन करू शकता.

तुम्ही हरवलेला फोन किंवा टॅबलेट शोधण्याचा प्रयत्न करत असल्यास, तुम्ही हरवलेले डिव्हाइस शोधा हेदेखील निवडू शकता. तुमचे डिव्हाइस शोधण्याच्या किंवा सुरक्षित करण्याच्या आणखी मार्गांसाठी ऑनस्क्रीन सूचना फॉलो करा.

तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचे डिव्हाइस वापरत असल्यास, ते वापरून झाल्यानंतर, खाजगी ब्राउझिंग मोड बंद करून साइन आउट करा.

अधिक मदत मिळवा

  • हरवलेल्या iPhone साठी, तुमचे डिव्हाइस iCloud वापरून शोधण्याचे आणि सुरक्षित करण्याचे मार्ग यांबद्दल जाणून घ्या.
  • तुमचा मोबाइल वाहक कदाचित तुम्हाला पुढील काही मार्गांनी मदत करू शकतो, जसे की:
    • तुमचे कॉल वेगळ्या नंबरवर रीडिरेक्ट करणे
    • नवीन सिम कार्ड ऑर्डर करणे
    • तुमचे सिम कार्ड वापरून इतर कोणीही कॉल किंवा मेसेज पाठवू नये यासाठी ते बंद करणे

तुमचे डिव्हाइस सूचीबद्ध केलेले नाही

तुम्ही सध्या वापरत असलेल्या डिव्हाइसवर योग्य Google खाते मध्ये साइन इन केल्याची खात्री करा.

  • तुमचे हरवलेले डिव्हाइस Gmail किंवा YouTube यांसारख्या Google अ‍ॅपवर तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केलेले असणे आवश्यक आहे.
  • "तुमचा फोन शोधा" या अंतर्गत Windows, Mac आणि Linux कॉंप्युटर व Chromebook सूचीबद्ध केलेले नाहीत.

तुमचे डिव्हाइस अद्याप सूचीबद्ध केले नसल्यास, तुमचा Google खाते पासवर्ड बदलणे यावर जा.

दुसरी पायरी: तुमचा Google खाते पासवर्ड बदला

तुमचा Google खाते पासवर्ड हा तोच पासवर्ड आहे जो तुम्ही Chrome आणि Gmail व YouTube यांसारख्या इतर Google उत्पादनांसाठी वापरता. क्लिष्ट पासवर्ड तयार करणे हे कसे करावे याबद्दल जाणून घ्या.

  1. तुमचे Google खाते उघडा. तुम्हाला साइन इन करावे लागू शकते.
  2. "सुरक्षा" विभागामध्ये, Google मध्ये साइन इन करा निवडा.
  3. पासवर्ड निवडा. तुम्हाला पुन्हा साइन इन करावे लागू शकते.
  4. तुमचा नवीन पासवर्ड एंटर करा, त्यानंतर पासवर्ड बदला निवडा.
  5. पासवर्ड बदला

तिसरी पायरी: तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड बदला

इतर कोणाला तुमचे हरवलेले डिव्हाइस सापडल्यास, तुमच्या डिव्हाइस किंवा Google खाते मध्ये सेव्ह केलेले पासवर्ड बदलण्याचा विचार करा.

  1. passwords.google.com उघडा.
  2. तुमच्या Google खाते मध्ये साइन करा.
  3. "सेव्ह केलेले पासवर्ड" ही सूची पाहा.
    • या सूचीमध्ये फक्त तुमच्या खाते मध्ये सेव्ह केलेले पासवर्ड समाविष्ट आहेत, तुमच्या हरवलेल्या डिव्हाइसमधील नाहीत.
  4. तुम्हाला बदलायच्या असलेल्या प्रत्येक पासवर्डसाठी, अ‍ॅप उघडा किंवा साइटवर जा.
  5. तुमचा पासवर्ड बदला.

टीप: घोटाळ्यापासून सावध राहण्यासाठी तुमच्या खात्याचे निरीक्षण करा. तुमच्या क्रेडिट कार्ड विवरणांवर लक्ष ठेवा आणि तुमच्या क्रेडिट कार्ड कंपनीला कोणत्याही फसव्या खरेदीची तक्रार करा.

संबंधित लिंक

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18269051649890866079
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false