अतिथी म्हणून Chrome ब्राउझ करणे

महत्त्वाचे: तुमचा विश्वास असलेल्या लोकांच्या डिव्‍हाइसवरच संवेदनशील वेबसाइटमध्ये लॉग इन करा. मालकांना कदाचित तुमच्या डेटाचा अ‍ॅक्सेस मिळेल.

अतिथी मोडमध्ये तुम्ही इतर कोणत्याही Chrome प्रोफाइलची माहिती पाहू शकणार नाही किंवा त्यामध्ये बदल करू शकणार नाही. तुम्ही अतिथी मोडमधून बाहेर पडता, तेव्हा तुमची ब्राउझिंग अ‍ॅक्टिव्हिटी कॉंप्युटरमधून हटवली जाते.

पुढील गोष्टींसाठी अतिथी मोड वापरा:

  • तुमचा कॉंप्युटर इतरांना वापरू देणे किंवा तुम्ही इतर व्यक्तीचा कॉंप्युटर वापरणे.
  • लायब्ररी किंवा कॅफे यांसारख्या ठिकाणी सार्वजनिक कॉंप्युटर वापरणे.

तुम्हाला तुमच्या कॉंप्युटरवर खाजगीरीत्या ब्राउझ करायचे असल्यास, गुप्त मोड वापरा. तुम्हाला कोणताही ब्राउझिंग इतिहास सेव्ह न करता, तुमची माहिती आणि सेटिंग्ज दिसतील.

अतिथी मोड उघडा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल Profile वर क्लिक करा.
  3. अतिथी वर क्लिक करा.

टिपा:

अतिथी मोड मधून बाहेर पडणे

अतिथी मोड ब्राउझिंग विंडो बंद करा.

तुमचा ब्राउझिंग इतिहास, कुकी आणि साइट डेटा हटवला जाईल.

इतरांना काही माहिती दिसू शकते

अतिथी मोड हा Chrome ला तुमची ब्राउझिंग अ‍ॅक्टिव्हिटी तुमच्या स्थानिक इतिहासामध्ये सेव्ह करू देत नाही, मात्र तुम्ही तुमचा विश्वास असलेल्या लोकांच्या डिव्‍हाइसवरच संवेदनशील वेबसाइटमध्ये लॉग इन केले पाहिजे. डिव्हाइसच्या मालकांना कदाचित तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी आणि स्थान यांसारख्या डेटाचा अ‍ॅक्सेस मिळेल. हा डेटा कदाचित अजूनही दृश्यमान असेल:

  • तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइटसह त्यावर वापरलेल्या जाहिराती व स्रोतांसह
  • तुम्ही साइन इन केलेल्या वेबसाइट
  • तुमचा नियोक्ता, शाळा किंवा तुम्ही वापरत असलेले नेटवर्क रन करणारी कोणतीही व्यक्ती
  • तुमचा इंटरनेट सेवा पुरवठादार
  • शोध इंजीन
    • तुमच्या स्थानाच्या किंवा तुमच्या सध्याच्या गुप्त ब्राउझिंग सेशनमधील अ‍ॅक्टिव्हिटीच्या आधारे शोध इंजीन तुम्हाला शोध सूचना दाखवू शकतात. तुम्ही Google वर शोध घेता तेव्हा तुम्ही शोधत असलेल्या सर्वसाधारण भागाचा Google नेहमीच अंदाज लावेल. तुम्ही Google वर शोधता तेव्हा स्थानाबद्दल अधिक जाणून घ्या.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7036459882180142976
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false